✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/09/2019 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~ https://fmbuletin2019.blogspot.com/2019/09/4-0650-0700.html •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय हिंदी दिवस* 💥 ठळक घडामोडी :- ◆२००० - मायक्रोसॉफ्टने आपल्या एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. याचबरोबर विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू केले. ◆१९६०- OPEC ( Organisation Of The Petroleum Exporting Countries) ची स्थापना . ◆१९५९-सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले.चंद्रावर पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती. 💥 जन्म :- ●१९२३- स्व. राम जेठमलानी , माजी केंद्रीय कायदामंत्री,कायदेपंडित. ●१९१९ - न्यालचंद शाह, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● १९६३ - रॉबिन सिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ●२०११ - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर व प्रशिक्षक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात, 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये होणार समारोप* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंचा उद्या दिल्लीत भाजप प्रवेश, राजेंची ट्विटरद्वारे माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मंत्रिमंडळ विस्तारप्रकरणी राज्य सरकारला अखेर मोठा दिलासा, मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचा फैसला आगामी निवडणुकीत मतदारच करतील, सुनावणीदरम्यान हायकोर्टाचं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *निवड रद्द झालेल्या 118 सहायक मोटार वाहन निरीक्षकांची अतिरिक्त पदावर नियुक्ती करणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *येत्या 31 डिसेंबरपर्यंत बांद्रा स्कायवॉकची दुरुस्ती करुन तो पुन्हा खुला करणार, मुंबई महापालिका प्रशासनाची उच्च न्यायालयात ग्वाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, बोट उलटून 11 जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *10 सरकारी बँकांच्या विलिनिकरणाच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांच्या चार संघटनांनी 26 आणि 27 सप्टेंबर रोजी संपाचा दिला इशारा, चौथा शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसांना जोडून हा संप पुकारण्यात आल्यानं बँकेचे कामकाज चार दिवस ठप्प राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राष्ट्रीय हिंदी दिवस* देश में 14 सितंबर 1953 को पहली बार हिंदी दिवस मनाया गया और उसके बाद से ही हर साल 14 सितंबर को पूरे देश में हिंदी दिवस बड़े ही उत्साह के साथ मनाया जाने लगा. हिंदी ने हमें दुनियाभर में पहचान दिलाई है. भारत ही नहीं बल्कि दुनिया भर के कई देशों में हिंदी बोली जाती है. हिंदी विश्व की प्राचीन, समृद्ध और सरल भाषा है. राष्ट्रपिता महात्मा गांधी ने हिंदी को जनमानस की भाषा कहा था. उन्होंने 1918 में आयोजित हिंदी साहित्य सम्मेलन में हिंदी को राष्ट्र भाषा बनाने के लिए कहा था. भारत सालों तक अंग्रेजों का गुलाम रहा. इसी वजह से उस गुलामी का असर लंबे समय तक देखने को मिला. यहां तक कि इसका प्रभाव भाषा में भी पड़ा. वैसे तो हिंदी दुनिया की तीसरी ऐसी भाषा है जिसे सबसे ज्यादा लोग बोलते हैं लेकिन इसके बावजूद हिंदी को अपने ही देश में हीन भावना से देखा जाता है. आमतौर पर हिंदी बोलने वाले को पिछड़ा और अंग्रेजी में अपनी बात कहने वाले को आधुनिक कहा जाता है. इसे हिंदी का दुर्भाग्य ही कहा जाएगा कि इतनी समृद्ध भाषा कोष होने के बावजूद आज हिंदी लिखते और बोलते वक्त ज्यादातर अंग्रेजी भाषा के शब्दों का इस्तेमाल किया जाता है. और तो और हिंदी के कई शब्द चलन से ही हट गए. ऐसे में हिंदी दिवस को मनाना जरूरी है ताकि लोगों को यह याद रहे कि हिंदी उनकी राजभाषा है और उसका सम्मान व प्रचार-प्रसार करना उनका कर्तव्य है. हिंदी दिवस मनाने के पीछे मंशा यही है कि लोगों को एहसास दिलाया जा सके कि जब तक वे इसका इस्तेमाल नहीं करेंगे तब तक इस भाषा का विकास नहीं होगा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ संकलन :- *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मेहंदीने हात कसे रंगतात ?* 📙 मुलीचे हात पिवळे केले की सुटलो. असं पूर्वीचे वधुपिते म्हणत असत. कारण पारंपारिकरित्या लग्नाच्या आधी नवऱ्या मुलीला आणि मुलालाही हळद लावून स्नान घालण्याचा प्रघात आहे. अजूनही तो चालू आहे. पण आजकालच्या लग्नात नवर्या मुलीचे आणि तिच्या बरोबर इतर महिलांचेही हातपाय मेहंदीने रंगून काढण्याची प्रथा वाढीला आलेली आहे. अनेक बारीक बारीक नक्षीदार मेहंदींनं हात पावलं आणि कपाळ किंवा गालही रंगवण्यासाठी खास कलाकारांना आमंत्रण दिलं जातं. या मेंदीचा लालसर रंग गोऱ्या आणि सावळ्याही कातडीवर खुलून दिसतो. पण ही किमया नेमकी साध्य होते कशी? लाॅसोनिया इनर्मिस या वैज्ञानिक नावांनं ओळखल्या जाणाऱ्या झुडपांची पानं यासाठी वापरली जातात. मध्यपूर्वेत याला हिना म्हणतात आणि भारत उपखंड वगळल्यास इतरत्र हेच नाव जास्त प्रचलित आहे. ही पानं इतर पत्री सारखी हिरवी असली तरी त्यांच्यामध्ये लाॅसोनिया या नावाचं लाल शेंदरी रंगाचं रंगद्रव्य असतं. नेपाळच्या जातकुळीतला या रसायनाचा रेणू अमिनो आम्लापेक्षा थोडासा मोठा आणि ग्लुकोज सारख्या प्राथमिक शर्करेच्या रेणूपेक्षा थोडासा लहान असतो. मेहंदीच्या झुडपांच्याही वेगवेगळ्या जाती आहेत. प्रत्येक जातीतील रंगद्रव्यात थोडाफार फरक असल्याने त्या रंगांचा छटेमध्येही फरक आढळतो. सामान्यत: हा रंग लाल नारिंगी असला तरी बुर्गुडी मद्दयासारखा दालचिनी सारखा तपकिरी, काळसर चॉकलेटी चेरी सारखा गडद लाल, अशा वेगवेगळ्या रंगांची मेंदी मिळते. आपल्या कातडीच्या वरच्या थरातल्या पेशींच्या बाह्य आवरणामधील फाॅस्फोलिपीड रसायनाच्या किंवा त्या पेशीला प्रथिनांच्या रेणूपेक्षा या रसायनाचे रेणू लहान असतात. व सहजगत्या त्यांच्यात मिसळून जातात. प्रथिनांच्या रेणूंना ते मिठी मारून बसतात. केसांमधल्या कॅरॅटीन या प्रथिनाशी त्यांची प्रक्रिया होते. जर केसांमध्ये कॅरेटीनचं प्रमाण जास्त असेल तर लाॅसोनियाही जास्त प्रमाणात तिथं रुतून बसतो व केसांचा रंग लक्षणीयरित्या पालटतो. साधारणत: अठ्ठेचाळीस तासानंतर तो काळसर होऊ लागतो. पानांमधला रंग उतरून कातडी मध्ये किंवा केसांमध्ये जिरावा यासाठी त्या पानांच्या वाटण्यात लिंबाचा रंग मिसळला जातो. त्यातला सायट्रिक आम्ल रंग अधिक गडद करतं. तळहातावरच्या किंवा तळपायावरच्या कातडीत शिरलेल्याल्या लाॅसोनियाला जर वाफेचा स्पर्श झाला तर त्याचा रंग गडद तपकिरी किंवा काळसर बनतो. *बाळ फोंडके यांच्या 'कसं' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *हिंदी दिवस केव्हा साजरा केला जातो ?* 14 सप्टेंबर 2) *केळीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते ?* तामिळनाडू 3) *भारतातील सर्वात लांब धरण कोणते ?* हिराकुंड 4) *कोणत्या प्राण्याचे ह्रदय सर्वात मोठे असते ?* जिराफ 5) *आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे ?* वाशिंग्टन *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सायन्ना गुरुजी येवतीकर ● विवेक जैपाल ठाकूर ● मेधा पुराणिक देसाई ● अशोक चव्हाण, माहूर ● सदाशिव जाधव ● अनिल लांडगे ● नितीन भोसले ● सतीश कोटगीरे ● बालाजी कुदाळे ● उषा नळगीरे ● मधुसूदन कुलकर्णी *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मृत्यूपूर्वी आपण आपला मृत्यूदिन जाणू शकत नाही. मरण पावल्यानंतर आपली पुण्यतिथी, आपल्याकडे पाप्याचीही मेल्यावर पापतिथी नव्हे, पुण्यतिथीच कशी पार पडेल, हा प्रश्नच अर्थशून्य आहे. आप मर गये, दुनिया डुब गयी ॥ मृत्यू झाल्यानंतर मुक्ती मिळावी अशी तीव्र इच्छा असते. मरणापूर्वी एकदातरी देवाचे दर्शन व्हावे अशी भक्तांची आंतरिक ओढ असते. परंतु संत तुकारामांप्रमाणे सदेह स्वर्गात जाण्यासाठीचा स्वर्गाचा व्हिसा इतर कुणासही लागू नाही.* *पुण्यकर्मे केल्याने मोक्ष मिळतो का? अहो, एकदाचा सोक्षमोक्ष झाल्यावर कसला मोक्ष? भक्तिभावे सतत नामस्मरण केल्यानेही मृत्यू सुखद होतो काय? नाही...! तुम्ही देवभक्त आहात की दैत्यभक्त याच्याशी मृत्यूला कर्तव्य नाही. मृत्यू स्थितप्रज्ञ आहे. पापपुण्य, सुख-दु:ख, खरे-खोटे, राव-रंक सर्व मनुष्यनिर्मित आहेत. भूकंप आस्तिक-नास्तिक पाहात नाही. सर्वांना एकाच वेळी भुईत दफन करतो. तुफान सज्जन-दुर्जन असा भेद मुळीच ठेवत नाही. मृत्यू हाच एकमेव पूर्ण आणि अंतिम सत्य आहे. पण हा मृत्यू कसा अनुभवायचा? मृत्यूचा अनुभव सांगायला मृत व्यक्ति कुठे उपलब्ध असते. परंतु मृत्यू अनुभवत मृत्यूच्या सर्वोच्च परमानंदासह विश्वरूपाशी एकरूप होता येते, संत ज्ञानेश्वर, संत विनोबा भावे, स्वा. सावरकर हे या अनुभवांसह शून्यरूप झालेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀🌟☀☀☀☀☀☀ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *दोस्त दोस्त ना रहा,प्यार प्यार ना रहा।* *जिंदगी हमे तेरा एतबार ना रहा।* *🕺असे उदास चेहरे रस्त्या-रस्त्यावर* *हल्ली बघायला* *मिळतात.सन्मार्ग* *दाखवणारे वाटाडे कुठे दिसत नाही.* *आज, साधू साधनेत कमी आणि* *साधनात जास्त प्रमाणात* *वावरतांना आपण* *पाहतो.फक्त पाहत नाही तर त्याच्या* *अंधश्रधारूपी विषारी* *वृक्षांना खत पाणी घालतो आणि* *आपल्याच विनाशासाठी* *वाढवतो.तारूण्य आणि संगत यांचे* *महत्व विशद करताना* *डॉ* *.कलाम 'आपले मित्र, चित्र आंणि* *चरित्र नेहमी पवित्र ठेवा; असे सांगतात.कारण तेच खरे जीवनाचे* *अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन* *होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात* *असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट* *करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे* *ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर* *स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर* *करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त* *राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा* *कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे* *घालविला जातो.** *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाच्या जीवनात निराशा ही सवतीसारखी नेहमी मनाला छळत असते.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मनाला विचलीत करते.अशा स्थितीतून तिला हद्दपार करण्यासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी तो आशेकडे धावतो आणि त्यातुन सुटका करून घेतो.अर्थात जीवनात निराशेने घर केले तर नक्कीच आशेचा शोध घेऊन निराशेला बाजूला सारतो आणि जीवन निराशेतून मुक्त करतो.निराशा जरी जीवनात आली तरी घाबरायचे नाही तिला हिमतीने तोंड देत आशेचा शोध घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.हीच आपल्या जीवनाची खरी परीक्षा आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🥗•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विद्या विनियेन शोभते* राजा ज्ञानसेनच्या दरबारात दररोज शास्त्रार्थ केला जात असे. विद्वान लोक तेथे शास्त्रासंबंधी चर्चा करण्यासाठी येत असत. जे विद्वान लोक शास्त्रात पारंगत किंवा वादविवादात जिंकत असत ते विजयी म्हणून घोषित केले जात असत त्यांना राजा धन आणि मान देऊन सन्मानित करत असे. एक दिवस राजा ज्ञानसेनाच्या दरबारात असाच शास्त्रार्थ चालला होता. त्या सभेत पंडित भारवी याला विजयी घोषित करण्यात आले. राजाने त्याचा भरसभेत सत्कार केला व मान देण्यासाठी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्याच्या विद्वत्तेच्या सन्मानार्थ राजा स्वत: त्याला चव-या ढाळत त्याला घरापर्यंत सोडण्यास आला. भारवी एवढ्या मोठ्या सन्मानाने घरी आला हे पाहून भारवीच्या आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले. घरी आल्याबरोबर भारवीने मातेला साष्टांग नमस्कार केला पण पित्याला मात्र उपेक्षेने उभ्याउभ्याच नमस्कार केला. त्याच्या वर्तनात हे साफ दिसून येत होते की जणू काही पित्याला हे सुचवित होता बघा माझा किती सन्मान झाला आहे, माझ्या ज्ञानाला किती किंमत मिळते आहे, स्वत: राजा हत्तीवर चव-या ढाळत मला सोडायला घरी आला आहे. पित्याने त्याच्या त्याही नमस्काराचा स्वीकार केला आणि त्याला चिरंजीवी भव असे म्हटले. गोष्ट इथेच संपली असे नाही. मात्यापित्यांला हे भारवीचे वागणे खटकले. ते दोघेही उदास राहू लागले. भारवीच्या यशाने ते जेवढे आनंदी राहायला पाहिजे होते तितके ते आनंदी नव्हते. याचे कारणही स्पष्ट होते की भारवीला यश पचविता आले नव्हते व तो ते आईवडीलांना दर्शवित होता. तो यशाच्या धुंदीत शिष्टाचार आणि विनम्रतेला विसरून गेला होता. थोड्या दिवसांनी माता आणि पित्याला उदास पाहून भारवीने मातेला याचे कारण विचारले असता माता म्हणाली,’’ तू विजयी होऊन आलास हे ठीक आहे, पण तू विजयी होण्यासाठी तुझ्या वडीलांनी घेतलेले परिश्रम तू विसरलास. तू शास्त्रार्थ करायला जाणार होतास त्याआधी दहा दिवस तुझ्यासाठी निर्जळी उपवास केले होते व त्या काळात ते परमेश्वराकडे एकच मागणे मागत होते माझ्या मुलाला यश मिळवून दे. लहानपणापासून केवळ तुझ्या यशासाठी त्यांनी कितीतरी स्वत:च्या इच्छा दाबून ठेवल्या व तुला शास्त्रपंडीत बनविले आणि केवळ एकाच यशाने उन्मत्त होऊन तू त्यांची उपेक्षा केलीस हेच आम्हा दोघांच्या खिन्नतेचे कारण आहे.’’ हे ऐकताच भारवीला आपली चूक समजली त्याने मातापित्याच्या चरणावर अक्षरश: लोळण घेतली. अनेकवेळा क्षमायाचना केली व आयुष्यात पुन्हा कधीही त्याने मातापित्यांची सेवा करण्यात कसूर केली नाही. तात्पर्य :- आयुष्यात आपल्याला कितीही मोठी यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास मिळाली तरी त्यापाठीमागे आपल्या आईवडीलांची पुण्याई असते हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे. यश कितीही मिळाले तरी उन्मत्त होऊ नये कारण विद्या ही नेहमी विनय असणा-यांकडेच शोभून दिसते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment