✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/03/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक रंगभूमी दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १८९३ - केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली १९९२ - ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान. २००० - चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर. २००१ - लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. २००४- नासा या अमेरिकेच्यासंशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली 💥 जन्म :- १९४१ - इव्हान गास्पारोविच, स्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष. १९६३ - क्वेंटिन टारान्टिनो, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक. १९७० - मरायाह केरी, अमेरिकन गायिका. 💥 मृत्यू :- १९६८-युरी गागारीन,पृथ्वी प्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर १९८१ - माओ दुन, चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार. १९९२ - प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय. १९९७ - भार्गवराम आचरेकर, मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई - निवडणूक काळात सोशल मीडियासाठी नियमावली तयार करण्यास हरकत काय, मुंबई हायकोर्टाचा केंद्रीय निवडणूक आयोगाला सवाल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *जळगाव : एमआयडीसीतील स्मार्ट फार्मास्युटीकल या कंपनीतील उत्पादन विभागातील रिअॅक्टरला आग, एक कोटी ३० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शैलेंद्र हंडा यांची निवडणूक आयोगाकडून गुजरात आणि महाराष्ट्राचे विशेष खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *परभणी - रासप नेते रत्नाकर गुट्टे यांना गंगाखेड कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी, शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *तामिळनाडूमध्ये खासगी इमारतीच्या मलनिस्सारन टाकीमध्ये गुदमरून सहा स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *गडचिरोली : पोलिसांनी उधळला घातपाताचा डाव, नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेला 5 किलोचा भुसुरुंग केला निकामी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *IPL 2019 : चेन्नईची दिल्ली कॅपिटलवर सहा विकेट्स राखून मात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नजर हटी, दुर्घटना घटी* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील ब्लॉगला क्लिक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_29.html - नागोराव सा. येवतीकर, 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *केशवसुत* कृष्णाजी केशव दामले ( ७ ऑक्टोबर १८६६:मालगुंड - ०७ नोव्हेंबर १९०५) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात. वर्षानुवर्षे एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणा-या कवितेला स्वच्छंद आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते. आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता आहेत. इंग्रजी काव्य परंपरेतील रोमॅण्टिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मन केशवसुतांकडे जातो. कवीप्रतिभा स्वतंत्र असावी, कवीच्या अंतःस्फूर्तीखेरीज ती अन्य बाह्य प्रभावात ती असू नये, असे त्यांचे म्हणणे होते. काव्य हुकुमानुसार नसते, नसावे, हा वास्तववाद मराठीत त्यांनीच आधुनिक परिभाषेत मांडला. त्यांच्या काव्य विचारांवर वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव होता, पण त्यांची आविष्कार शैली भारतीय होती. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यांच्या या अल्पसंख्य कवितांमध्ये अनेक विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी सहजी हाताळले आहेत. गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकरयांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुले म्हणजे नवजगाची आशा-उद्याचे जग बनविणारी थोर शक्ति म्हणजे मुले. – साने गुरुजी. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रातील पहिल्या मुख्याध्यापिका कोण ?* सावित्रीबाई फुले 2) *शून्याचा शोध कोणत्या देशाने लावला ?* भारत 3) *भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?* फुलटोचा 4) *भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?* सारस 5) *टेलिफोनचा शोध कोणी लावला ?* अलेक्झांडर ग्रॅहम बेल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • धनंजय मांजरमकर • वैदेही चिलका • जगदीश्वर भूमन्ना • प्रमोद मोहिते • साईनाथ कल्याणकर • प्रकाश शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बेडूक* बेडूक कितीही फूगला तरी बैल होत नाही मगर मिठी कोणालाच कधी सैल होत नाही जास्त फुगल्यास बेडूक फटकन फुटू शकतो फुगण्याच्या नादात उगी आयुष्यातून उठू शकतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.* *स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--* *तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।* *तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर सतगुर ना मिल्या , रही अधूरी सीश | स्वांग जाति का पहरी कर , घरी घरी मांगे भीष || अर्थ : महात्मा कबीर गुरूचे जीवनातील अनन्य साधारण असणारे महत्त्व सांगताना म्हणतात की, जीवन जगताना असो की शिक्षण घेताना असो गुरू असलाच पाहिजे. गुरू (मार्गदर्शक) भेटला नाही ज्ञानाची अर्धवट प्राप्ती होते. अर्धवट ज्ञान आत्मघातकी ठरतं. ते जीवनाच्या वाटेवर सर्वात घातक ठरू शकते. महाभारतातील अभिमन्यूचा प्रसंग समजून घेतला तरी अर्धवट ज्ञान किती धोकादायक ठरतं हे पुढील पिढ्यांच्या ध्यानी यायला वेळ लागणार नाही. अभिमन्यू कुशल योद्धा होता. चक्रव्युहात घुसणे जाणत होता परंतु चक्रव्पुह भेदण्याची कला त्याला जमत नव्हती. त्यातच त्याला प्राण गमवावा लागला. अर्धवट ज्ञानी पारंगत असल्याचं ढोंग करतो. या ढोंगापायी त्याला नकल करावी लागते. नकल करणारा परिपूर्ण असत नाही. अशा व्यक्तींच्या माध्यमातूनच अंधश्रद्धा व चुकीच्या रुढी समाजात पसरवल्या जातात. ही अर्धशिक्षित फौजच समाजाला चुकीच्या दिशेनं नेते. संभ्रम निर्माण करीत असतात. स्वतःच्या मार्गाला विवेकाची जोड नसल्याने स्वतःचीच फसगत करून घेतात. प्रसंगी पथ भरकटून भीक मागण्याचेही त्यांच्या नशिबी येते. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनात जर तुम्हाला काही करुन दाखवायचे असेल तर खालील गोष्टींना कधीच प्राधान्य देऊ नका. आळस,अज्ञान, खोटेपणा आणि स्वार्थीपणा. आळसाने कोणतेही काम पूर्ण होत नाही,अज्ञानाने काय खरे आणि काय खोटे हे कळत नाही,खोटे बोलण्याने आपली प्रतिष्ठा जनमानसात चांगली निर्माण होत नाही तर स्वार्थामुळे आपण एकाकीपणे पडतो त्यामुळे आपली किंमतही कोणी करत नाही. म्हणून यांना केव्हाही तुमच्या जीवनामध्ये कसलेही स्थान देऊ नका.जर तुमच्या जीवनात स्थान दिलात किंवा प्रवेश करु दिलात तर तुमचे चांगले जीवन खराब करण्यास प्रवृत्त करतात.सदैव जागृत राहणेच सर्वात महत्वाचे आहे. ©व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जयाचेनि संगे समाधान भंगे। अहंता अकस्मात येऊनि लागे॥ तये संगतीची जनीं कोण गोडी। जिये संगतीनें मती राम सोडी॥४५॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••• पाकोळी आणि कावळा एक पाकोळी आणि एक कावळा स्वतःच्या सौंदर्यावरून भांडत होते. बोलता बोलता कावळा पाकोळीला म्हणाला, 'तुझं सौंदर्य फक्त उन्हाळ्यातच पहावं, माझं सौंदर्य सदासर्वदा सारखंच असतं त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसतो,' तात्पर्य - दोन सुंदर वस्तूंपैकी जिचे सौंदर्य जास्त टिकाऊ तीच अधिक उपयोगी म्हटली पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment