*अभिनंदन*
अभिनंदन करीत आहे सारे भारतभूमीचा वीर सुपुञा....
धडाडीचे कार्य करून
परतलास तू मायदेशी
असा वीर जन्मलास तू
भारत मातेचा उदराशी
अभिनंदन करीत आहे सारे
भारतभुमीचा विर सुपूञा......
लाख मानावे तुझे आभार
तरीही नाही फिटणार भार
अशी विरता तुझी अपार
मातृभूमीसाठी तू लढणार
अभिनंदन तुझे करीत आहे सारे भारतभूमीचा वीर सूपूञा.......
अभिनंदनास अभिनंदनाचा अर्पूया वर्षाव शब्दसुमनांचा
अभिमान वाटावे असे वागणे आहे तुझे शौर्य आणि विरतेचे
अभिनंदन तुझे करीत आहे सारे
भारतभूमीचा विर सुपूञा........
धन्य धन्य ती माता
धन्य धन्य तो पिता असा पुञ जन्मला धाडसास तुझ्या
वंदन करीतो शतशः
अभिनंदन तुझे करित आहे सारे
भारतभूमीचा सुपूञा......
🙏🙏🙏🙏🙏🙏
✍©श्रीमती प्रमिला सेनकुडे.
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment