✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/03/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १७८१-विल्यम हर्षेल याने युरेनस चा शोध लावला १९४०-अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थक पंजाबचे गव्हर्नर मायकेलओडवायर याची उधमसिंग यांनी गोळ्या घालून हत्या केली १९६३-अर्जुन पुरस्काराची सुरुवात १९९७ - कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली. २००७-वेस्ट इंडीज मध्ये ९व्या क्रिकेट विश्व करंडक स्पर्धेचे उदघाटन 💥 जन्म :- १९२७-रवींद्र पिंगे-ललित लेखक 💥 मृत्यू :- १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री १९९४-श्रीपाद यशवंत कोल्हटकर ,मार्क्सवादी कॅम्युनिस्ट नेते १९९६-शफी इनामदार अभिनेते १९९७-शीला इराणी, महिला हॉकी खेळाडू २००४-उस्ताद विलायतखा, सतारवादक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी नाहीच, बसपा प्रमुख मायावतींचं स्पष्टीकरण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई - निवडणूक बंदोबस्तासाठी राज्य पोलीस दल सज्ज, मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत प्रभावी उपाययोजना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ब्रिटन पाठोपाठ जर्मनी आणि फ्रान्सकडून बोइंग ७३७ मॅक्स ८ विमानांवर बंदी, बोईंग ७३७ विमानांचा वापर न करण्याच्या डीजीसीएच्या विमान कंपन्यांना सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कल्याण: शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांची कोकण म्हाडा अध्यक्षपदी नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राजस्थानः पोखरण येथून पिनाका गायडेड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नाशिक - साहित्यिक, चित्रपट दिग्दर्शक वेद राही यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार घोषित.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : नवी दिल्लीतील फिरोज शाह कोटला येथे होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचव्या एकदिवसीय सामन्याकडे लागले सर्वांचे लक्ष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मृत्यू : एक अटळ घटना* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://sharechat.com/post/VbwEWE4 आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रवींद्र पिंगे* रवींद्र पिंगे यांचे बालपण मुंबईत गिरगावात गेले. पिंगे अर्थशास्त्राचे पदवीधर होते. त्यांचा जन्म १३ मार्च १९२६ रोजी कोकणातील उफळे गावी झाला. सुरुवातीला काही वर्षे ते रेशन विभागात नोकरीस होते. पुढे ते आकाशवाणीवर नोकरीस होते. सातत्याने ललितगद्य हा वायप्रकार हाताळणार्यात आणि आपल्या परीने त्यात भरही घालणार्या लेखकांत पिंगे हे नाव ठळक होते. ते एक कृतार्थ लेखक, माणूस होते. १९७८ मध्ये प्रकाशित झालेल्या मोकळं आकाश या पहिल्या ललित लेखसंग्रहापासून शकुनाचं पान या ललित लेखसंग्रहापयर्ंत त्यांचे एकूण तेरा संग्रह प्रसिद्ध झाले होते. रवींद्र पिंगे दुर्बिण, कॅमेरा, टिपण वही आणि जागृत नजर घेऊन भारताच्या या टोकापासून त्या तटापयर्ंत आपल्या लिखाणा साठी हिंडले. आसाम, अरुणाचल, अंदमान पाहून ते कच्छच्या चिखल-वाळूच्या रणात गेले. नर्मदेच्या तीरावर भटकले. दक्षिणेतला र्शुंगेरीचा सुळका सर करून ते तुंगभद्रेच्या किनार्याणवरल्या श्रीशंकराचार्यांच्या मठापयर्ंत पोहोचले. कृष्णेच्या डोहाकाठचं कविवर्य मर्ढेकरांचं चिमुकलं खेडं त्यांनी पाहिलं तसंच अयोध्येला जाऊन त्यांनी बंदीवान श्रीरामाला दंडवत प्रणिपात केला. शकुनाचं पान या त्यांच्या संग्रहात प्रवासवर्णनपर लेख (नर्मदेच्या उगमापाशी, मुक्काम झांशी, गणपती पुळे इ.) स्थलवर्णनपर (सानेगुरुजींचा जन्मगाव, हृदयाची हाक घालणारी ठिकाणं, अबूच्या पहाडावरील सूर्यास्त इ.), आत्मपरलेखन (माझी भूमिका, नवृत्तीतलं भाग्य, आकाशवाणीवरले उमेदवारीचे दिवस इ.) असे विविध प्रकारचे ३० लेख होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाण्याला बंध घातला तर ते "संथ" होते, आणि मनाला बंध घातला तर "संत" होतात *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ?* राष्ट्रपती 2) *'शिक्षक दिन' केव्हा साजरा करतात ?* 5 सप्टेंबर 3) *'वाळवंटाचा जहाज' कोणाला म्हणतात ?* उंट 4) *महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?* मुंबई 5) *'गेट वे ऑफ इंडिया' कोठे आहे ?* मुंबई *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • शेख रुस्तुम • भगवान कांबळे • साईनाथ बोमले • सज्जाद सय्यद • सुरेश बोईनवाड • आकाश काकडे • कामाजी धुतुरे • लक्ष्मण वडजे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नम्रता* अती नम्रता प्रसंगी लाचारी वाटत असते अती नम्रता कोणाला कधीच पटत नसते अती नम्र माणसाला वेडे म्हणून शकतात लाचार म्हणून प्रसंगी कोणीही चिडू शकतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपली सर्व धडपड कशासाठी असते ? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असतो. प्रपंचात सुख मिळावे असे सर्वांना वाटत असते, आणि त्यासाठी जो तो प्रयत्न करीत असतो. परंतु आजपर्यंत प्रपंचात कुणाला सुख मिळाले आहे का ? कुणी म्हणतो, मजजवळ संपत्ती आहे, पण संतान नाही, कुणी दारिद्र्य आहे म्हणून रडतो, कुणी काही, कुणी काही, सांगतच असतो, आपली हाव कधीच तृप्त होणे शक्य नाही. मृगजळ पिऊन कुणी कधी तृप्त झाला आहे का ?* *प्रपंचच जिथे खोटा तिथे सुख कसले मागता ? याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा, पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावे. तुम्हांला खात्रीने सांगतो की, प्रपंच जर सुखाचा करायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे. तो अगदी सोपा आहे, पण आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. परमात्म्याची अगदी मनापासून प्रार्थना करावी. मग तो ठेवील त्या परिस्थितीमध्ये आपण अगदी आनंदात व सुखात राहू शकतो.* संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पत्ता बोला वृक्ष से , सुनो वृक्ष बनराय | अब के बिछड़े न मिले , दूर पड़ेंगे जाय || अर्थ : संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे. पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्या पान अन मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता अन गुरूला लाथा" असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण काही राक्षसीवृत्तीचे किंवा विध्वसंकवृत्तीचे नाही की, ज्यामुळे कुणाच्याही जीवनात असलेल्या नंदनवनाचे स्मशान बनवण्यासाठी.आपण आहोत सर्वसामान्यपणे एकमेकांच्या आधारे आपल्या जीवनाची नौका पार करण्यासाठी जन्माला आलेली सामान्य माणसे.आपला प्रत्येकाशी कुठे ना कुठे , कोणत्या ना कोणत्या कारणासाठी संबंध येतो.मग तो दु:खाचा असो की सुखाचा.मग आपला संबंध इतरांशी चांगला ठेवायचा असेल तर आपल्या मनात दुस-याविषयीची आत्मियता बाळगायला हवी,जो कोणी संकटात सापडला असेल तर त्याला आणखी संकटात न टाकता आहे त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याला कशी मदत करता येईल आणि वाचवता येईल हे प्रथम विचार करायला हवे.जर आज आपण दुसऱ्याच्या विध्वंसाचा विचार केला तर उद्या आपलीही गत तशीच होणार.मग आपण आपल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी इतरांना बोलावण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या मदतीला कसे धावून येणार ?आपण अशावेळी दुसऱ्याकडून मदतीची अपेक्षाही करणे चुकीचे ठरेल.आपली व इतरांची जीवननौका व्यवस्थितपणे पार करायची असेल तर एकमेकांच्या साथीनेच करावी लागणार.आपल्या एकमेकांच्या मनातल्या उभ्या असलेल्या संशयाच्या,भेदाच्या व तिरस्काराच्या भिंती सा-या पाडून टाकायला हव्यात तरच आपले आणि इतरांचे चांगले,प्रेमाचे,सहकार्याचे संबंध प्रस्थापित होतील.ज्या काही असलेल्या मनातल्या राक्षसीवृत्ती आपल्या चांगल्या संबंधांमुळे केव्हाच लोप पावायला लागतील.असा हा आपला एकमेकांना सहाय्य करण्याचा आणि संकटाच्यावेळी मदतीचा हात पुढे करण्याचा माणुसकीचा खरा धर्म पाळला पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• उपेक्षी कदा रामरुपी असेना। जिवां मानवां निश्चयो तो वसेना॥ शिरी भार वाहेन बोले पुराणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३४॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ससा आणि कासव* ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना .आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले. पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला, "एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला . शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली .हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. म्हणाला,'मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !' प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं. एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता ! उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमताअसते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे! यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. जुन्या सौहार्दाचा शोध घ्या ! नव्याने मैत्री करा. साऱ्यांच्या संपर्कात राहा. मिळूनमिसळून वागा. तुमच्यासाठी जे जे उत्तम ते ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टिपकागद व्हा ! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment