✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~  3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00           ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/03/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहाजीराजे भोसले जयंती* 💥 ठळक घडामोडी :- १९१९-रौलेक्ट ऍक्ट पास १९२२ - महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरुंगवास. १९४४-नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने भारताच्या ईशान्य सीमेवर ब्रिटीशांच्या सेनेचा पाडाव करून तिरंगा फडकवला १९६९-'कॉसमॉस' हे मानवविरहित अवकाशयान रशियाने यांचं दिवशी अवकाशात सोडले 💥 जन्म :- १५९४-शहाजीराजे भोसले. १९१९-इंद्रजित गुप्ता ,माजी केंद्रीय मंत्री. १९२१-एन के पी साळवे. -भारतीय राजकारणी,बी सी सी आय चे माजी अध्यक्ष. १९३८ - शशी कपूर हिंदी चित्रपट अभिनेता. १९४८-एकनाथ सोलकर ,अष्टपैलू क्रिकेटपटू 💥 मृत्यू :- १८७१-इंग्लिश गणितज्ञ ऑगस्टस द मॉर्गन १९०८-सर जॉन इलियट, ब्रिटीश हवामानशास्त्रज्ञ २००१ - विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन, आज सायंकाळी 05 वाजता होणार अंतीम संस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मतदार नोंदणीत महाराष्ट्रातील तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय असून राज्यातील  11 लाख 99 हजार 527 तरूण मतदार प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत* •••••••••••••••••••••••••••••••••••••  3⃣ *पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 40 सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 20 कोटी देण्याचे केले जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्याकडून नवीन पक्षाची स्थापना, पक्षाचं नाव ''जम्मू आणि काश्मीर पिपल्स''* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नवी दिल्ली - भाजपाकडून आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी 123 उमेदवारांची यादी जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोकसभा निवडणुकांतून माघार, पत्रक काढून मनसेची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन डे क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी राखले आपले अव्वल स्थान, केदार जाधवची आयसीसी क्रमवारीत मोठी भरारी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाणी म्हणजे जीवन* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/04.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहाजीराजे भोसले*         शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते. मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई (उमाबाई) हिच्या पोटी सिंदखेड इथे शहाजी यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला. (शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारात मतभेद आहेत.) काहींच्या मते मालोजी भासले यांची मुख्य राणी उम्मवा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत. राजस्थानच्या चित्तोडगढच्या संग्रामातअल्लाउद्दीन खिलजीशी लढताना  राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले  यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला ( मुकुंदनगर भागात हे तारकपूर बस स्टँड ,अहमदनगर जवळ) नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली. (इंटरनेट वरून साभार ) *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे, तर गती हा त्याचा आत्मा आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱  9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रात 'शनिवारवाडा' कोणत्या जिल्ह्यात आहे ?* पुणे 2) *महाराष्ट्रात 'ऑरेंज सिटी' असे कोणत्या शहराला म्हणतात ?* नागपूर 3) *महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ?* सोलापूर 4) *महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?* अरबी समुद्र 5) *महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्ट शिखर पार करणारे व्यक्ती कोण ?* सुरेंद्र चव्हाण *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144              •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • इरफान शेख • व्यंकट भंडारे • लक्ष्मण नरवाडे • बालाजी आगोड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *! ! ! @@ गुगली @@ ! ! !*  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुशार* आपण फक्त हुशार बाकी नाकाने वांगे सोलत नाहीत आपल्यालाच जास्त बोलता येते अन् बाकी कानाने बोलत नाहीत ज्याच्या त्याच्या परीने प्रत्येक शहाणा असतो मला काही समजत नाही हा फक्त बहाणा असतो शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एका सोनाराच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हटले,,"दादा, आपले दुःख खरे तर एकसमान आहे. दोघांनाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?"* *लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघांनाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाही एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुस-याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."* *"माणसांचेही तसेच आहे,  आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो."*      ••●❤‼ *रामकृष्णहरी* ‼❤●••        ❤❤❤❤❤❤ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई         9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌟! !  *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      प्रेमभाव एक चाहिए , भेष अनेक बनाय | चाहे घर में वास कर , चाहे बन को जाए || अर्थ मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जर प्रत्येकाने आपल्या कामाचे नियोजन पूर्वनियोजित आणि विचारपूर्वक केले तर ते काम यशस्वीपणे पार पडेल. अन्यथा कामामध्ये व्यवस्थितपणा राहणार नाही.कामाचा दर्जाही घसरेल,मनाची घालमेल होईल, कामामध्ये लक्ष राहत नसल्यामुळे आणि एकाग्रता नसल्यामुळे स्वत:मध्ये चिडचिडेपणा येऊन आपला राग समोरच्या व्यक्तीवर काढायला लागतो.या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्या कामात पूर्वनियोजन करायला हवे.तरच आपल्याला मानसिक समाधान मिळेल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९० •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मना प्रार्थना तूजला एक आहे। रघूराज थक्कीत होऊनि पाहे॥ अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे॥३८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *गुरु आणि शिष्य* डॉक्टर दारात आले, नेहमीसारखे जोडे काढून हातात घेतले आणि ओपीडीत गेले समोरच एक वृद्ध उभे होते. "सर, तुम्ही?" मी त्या वृद्धाचा हात धरत म्हटलं. "कोण?" "मी xxx....तुमचा विद्यार्थी." मी माझं नाव सांगितलं. "होय काय?....चेहऱ्यात खूप फरक पडलाय रे!...तब्बेतीनं पण मोठा झालायस....शाळेत होतास तेव्हा केवढा मरतुकडा होतास." सरांच्या बोलण्यावर रिसेप्शनिस्ट तोंड धरून हसली. "चला की सर!....आत चला." मी हातातले चप्पल रिसेप्शनिस्टच्या काऊंटरखाली ठेवत सरांना म्हटलं. "नको,तू जा....मी येतो माझा नंबर आल्यावर." "सर, नंबराचं काय घेऊन बसलाय?....तुम्ही माझे गुरू आहात... माझ्याबरोबर चला आत." "अरे, नंबराचं काय म्हणजे?" सर माझ्याकडं आश्चर्यानं बघत म्हणाले,"जगात नंबरालाच सर्वात जास्त महत्त्व आहे....तुझा वर्गात नेहमी पहिला नंबर असायचा... पण प्रगतीपुस्तकावर मी उत्तीर्ण क्रमांक १ च्या ठिकाणी उत्तीर्ण क्रमांक २ असंलिहलं असतं तर तुला चाललं असतं का?...नाही ना?...माझा साठावा नंबर आहे....म्हणजे माझ्या आधीचे एकोणसाठ जण माझ्या आधी नंबर लावून बसलेत....त्यांचा हक्काचा नंबर डावलून मी आत येणं बरं दिसतं का?" "पण सर..." "तू जा.....कामाला लाग....तू बोर्डवरल्या टायमिंगच्या आधी आलास त्याबद्दल तुझं कौतुक....शाळेत उशीरा आलास म्हणून मी छड्या मारायचो तेव्हा मारक्या म्हशीसारखा माझ्याकडं बघायचास पण आता त्या छड्यांचं महत्त्व लक्षात आलं असेलच.....तेव्हा छड्या दिल्या नसत्या तर आता आला असतास तासभर उशिरानं." "सिस्टर, यांचे केसपेपरचे पैसे घेऊ नका." मी केबिनमध्ये जाता जाता रिसेप्शनिस्टच्या कानात कुजबुजलो...पण तेही सरांना ऐकू गेलंच. "काय बोललास?...पैसे घेऊ नको?" सर माझ्यावर ओरडले,"पैसे तर तुला घ्यावेच लागणार....मी तुझा शिक्षक आहे म्हणून मी काही फुकट शिकवलं नाही तुला.....वीस हजार रुपये पगार घेत होतो सरकारकडनं....हां, आता तुलाही सरकार पैसे देत असेल तर नको घेऊ पैसे." मी हसत हसत आत आलो आणि पेशंट बघायला सुरुवात केली. पेशंट बघता बघता सीसीटीव्हीमधून माझं सरांकडे लक्ष होतंच. तीन तासांत सरांनी बसायच्या किमान तीस जागा बदलल्या असतील. नंबर आल्यावर सर आत आले. आल्या आल्या त्यांनी माझा हात हातात घेतला. तो आपल्या छातीवर दाबला आणि सर बोलले,"बाळा,मला खूप खूप आनंद झालाय. खूप कमावलंस तू." "एवढंही काही नाही सर!" "नाही कसं?....अरे, मघापासून मी तुझ्या सगळ्या नव्या जुन्या पेशंटशी बोलतोय.....पण एकही माणूस तुझ्याबद्दल वाईट बोलायला तयार नाही....सगळे गुणगानच गातायत. छाती अभिमानानं भरून आली माझी." बाहेर सर आपल्या बसण्याच्या जागा सारखं का बदलत होते ते आता लक्षात आलं. "सर, तुम्ही शाळेत शिकवत होतात तेव्हा तरी कुठला विद्यार्थी तुम्हांला नावं ठेवायचा?.....समोरच्या माणसाशी प्रेमानं वागायचं, आपलं काम सचोटीनं करायचं हे तुम्हीच तर शिकवत होतात ना !...आज या वयातही तुम्ही तुमची तत्वं सोडायला तयार नाही आहात....मीही त्याच तत्वानं जगतोय. ...त्यात मी विशेष काही करतोय असं काहीच नाही. प्रेमानं व्यवहार केला की जगणं सुंदर होतं हे शिकवतं तेच तर शिक्षण!" "तू शाळेत होतास तसाच आहेस....खेड्यातला साधा सरळ मुलगा." "आता आयुष्यभर हा विद्यार्थी असाच राहू दे असा आशीर्वाद द्या !" मी म्हटलं आणि सरांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. "आईबाप आणि शिक्षक यांचं असंच असतं बघ....मुलं वाईट निपजली तर त्यांना वाईट वाटतं आणि मुलं नीतीवंत जन्मली तरी त्यांच्या डोळ्यांत पाणी येतं... पण असे आनंदाश्रू आजकाल दुर्मिळ झालेत रे!" सर पुढं बरंच काही काही बोलत होते आणि त्यांचा विद्यार्थी भान हरपून ऐकत होता....वाटत होतं सरांचं हे बोलणं कधी संपूच नये!...असे शिक्षक मिळणं म्हणजे भाग्यच नाही का? दुसऱ्याच्या मुलासाठी अश्रू गाळणारे शिक्षक आजही आहेत ना !!!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment