✴ ✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 09/03/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९५२-पुणे येथे पेशवे उद्यान प्राणी संग्रहालयाचे उदघाटन १९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात. १९६७ - जोसेफ स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुयेवाने अमेरिकेला पळ काढला. १९८२-सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असल्याचा अपूर्वयोग २००६-एन्सेलाडास या शनीच्या चंद्राच्या द्रवरूपात पाणी असल्याचा शोध लागला 💥 जन्म :- १९२९ - डेसमंड हॉइट, गुयानाचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष. १९३६-पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन १९४३ - बॉबी फिशर, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू. १९५१- प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन 💥 मृत्यू :- १८८८ - कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट. १९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक. १९९४- देविकाराणी ,अभिनेत्री २००३-बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *दुधाला प्रतिलिटर देण्यात येणाऱ्या अनुदान योजनेस तीन महिने मुदतवाढ, अनुदानाच्या रकमेतही सुधारणा, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले काही महत्त्वाचे निर्णय, सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली राज्यात कायमस्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर दोन नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापण्यास मान्यता.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यात २२५ मराठा, कुणबी उमेदवारांना यूपीएससी प्रशिक्षण निवडीसाठी सारथीकडून परीक्षा घेतली जाणार, तसेच दरमहा १३ हजार रूपये विद्यावेतन ही दिले जाईल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला पोलीस उपनिरीक्षक पदाच्या (पीएसआय) ६५० जागांचा निकाल अखेर जाहीर, या परीक्षेत रत्नागिरी जिल्हयातील सुमित कल्लप्पा खोत हा राज्यात प्रथम तर महिलांमधून अश्विनी हिरे या प्रथम आल्या आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटीच्या सीईओ पदी दीपक तावारे यांची नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आधार-मतदान ओळखपत्र जोडणीसाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; निवडणूक आयोगाकडे जाण्याची सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीच्या शतकानंतरही भारताला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 32 धावांनी पराभव पत्करावा लागला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• साहित्य स्पंदन समूह प्रस्तुत *मुक्ती महिला दिन 2019 विशेषांक* हे पुस्तक ऑनलाईन वाचण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. https://drive.google.com/file/d/1GfoP0MqONsjlT9otGpC4ZPIXAVcfncNT/view?usp=drivesdk ई बुक वाचल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवावे. तसेच पुस्तक परीक्षण केले तरी त्यांचे स्वागतच आहे. काही त्रुटी किंवा चूका निदर्शनास आल्यास निःसंकोचपणे आम्हाला जरूर कळवावे. *साहित्य स्पंदन समूह संपूर्ण टीम* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नवीन जिंदाल* नवीन जिंदाल हे भारतीय उद्योगपती आणि माजी लोकसभा सदस्य आहेत. हरियाणातील कुरुक्षेत्र येथून ते १४ व्या १५ व्या लोकसभेत निवडून आले होते. सध्या ते जिंदाल स्टील अँण्ड पॉवर लिमिटेडचे अध्यक्ष आणि ओ.पी.जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे कुलपती म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा जन्म हरियाणातील हिस्सार येथे झाला. त्यांचे पिता ओमप्रकाश जिंदाल हे नावाजलेले उद्योगपती आणि राजकीय नेते होते. त्यांनी हरियाणा सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले होते. नवीन यांच्या मातोश्री सावित्रीदेवी यादेखील मंत्री होत्या. नवीन यांनी एमबीएपर्यंतचे शिक्षण टेक्सासमध्ये घेतले. तेथे त्यांनी विद्यार्थीदशेतही आपल्या बुद्घिमत्तेसह नेतृत्वगुणाची चमक दाखवित उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून बहुमान पटकाविला होता. लोकसंख्या स्थिरीकरण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण, आरोग्य आणि शिक्षण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केले आहेत. सामान्यांनाही तिरंगा फडकविण्याचा अधिकार मिळवून देणारे म्हणून ते ओळखले जातात, हे विशेष. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'वंदे मातरम' हे राष्ट्रगान कोणी लिहिले ?* बकीमचंद्र चॅटर्जी 2) *'संविधानाचे शिल्पकार' कोणाला म्हणतात ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर 3) *संविधान निर्माण करण्यासाठी किती कालावधी लागला ?* 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 4) *'बालक दिवस' केव्हा साजरा करतात ?* 14 नोव्हेंबर 5) *'बालिका दिवस' केव्हा साजरा करतात ?* 3 जानेवारी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • शिवा वसमतकर • योगेश कदम • शिवाजी साखरे • गजानन शिंदे • अरविंद आडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दुटप्पीपणा* कशाला दाखवता मी आहे मोठ्या मनाचा किळस आहे तुमच्या असल्या दुटप्पीपणाचा तुमचा मोठेपणा दिसला कसा आहे तो लटका असे वागल्यास एक दिवस बसेल चांगला फटका शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकदा पंक्चर काढणा-याकडे उभा असताना एका टायरमधली हवा फस्सकन गेली. वाटले 'मृत्यू' असाच होत असणार. मृत्यूविषयी एक ऑब्सेशन अनेकांच्या मनात खोल असते. एका मित्राला सतत एक विचित्र समस्या छळत असते. त्याच्या अंत्यदर्शनाला येणारे लोक गाड्या कुठे लावतील ? त्या दिवशी पाऊस असेल का ? आता याची काळजी मागे राहिलेले घेतील की ! अशी सत्वहीन माणसं जगण्याला काही देत नाहीत आणि घेतही नाहीत.* *दु:ख घेता येत नाही तर देऊ नये. 'सुख द्यावे आणि घ्यावे' हे सूत्र जगण्याचा 'तोल आणि ताल' संभाळते. कविराज विंदा करंदीकर यांनी कुणाकडून काय घ्यावे याची यादी दिलीय, पण....* *असे घेता येते का ?* *काही जिंदादिल माणसे सतत देत राहतात, घेणे त्यांच्या गावी नसते. जिंदगी घोटा-घोटाने पिण्याचा 'अमृतरस' आहे. या रसाचे भोक्ते किती राहिलयं ते चुकूनही पहात नसले तरी त्यामुळे त्यांचे 'अक्षयपात्र' भरलेले राहते. तसे तुमचे राहो, हिच साठा उत्तराची कहाणी....!* 💧 *॥ रामकृष्णहरी ॥* 💧 🎄🎄🎄🎄🎄🎄 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर सब सुख राम है, और ही दुख की राशि सुर, नर, मुनि, जन,असुर, परे काल की फांसि। सारांश कबीर रामात सुख सारे अन्यत्र दुःखांच्या राशी । सुर,नर,मुनीजन,असुर सर्वांना काळाची फाशी । महात्मा कबीर जीवनांतल्या परमानंदाचं गुपित सांगतात. जीवनाचा खरा आनंद विकार विरहित जगण्यात सामावलेला आहे. सर्व चराचरात सामावलेला ईश्वर जाणून घेतला की जीवनाची सार्थकता साध्य होते. पंच महाभुतात ईश्वराचं अस्तित्व आहे. त्यांच्याद्वाराचं विश्व संचलित होतं. मात्र माणूस त्यालाच घाबरून दूर पळतो आणि बनावटी देवांच्या मागं लागतो. त्यात सर्वेश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तिथं कसा काय सर्वेश्वर साध्य होईल ! निसर्गाच्सा मुक्ताविष्काराकडं डोळे उघडून पाहाताच सर्वात्मकाचं दर्शन होतं. त्यात समस्त सुखाची प्राप्ती दडलेली आहे. अन्य सर्व ढोंगांचं स्तोम आहे. आम्ही ज्यांना वरवर देव मानतो त्या सर्व देवतांना, माणसांना, साधूंना, असुरांना काल फासाने कुठं मुक्त सोडलं आहे. मृत्यू जन्मा आले त्यांना मरणाचा फास घालतोच. पंचमहाभुतंच शाश्वत व त्रिकालाबाधित आहेत. बाकी सारा लबाडीचा खेळ. त्यातून आनंद कसा प्राप्त होणार बरं ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सोन्याचा व्यापार करणारा व्यापारी किंवा सोन्याचे दागिने बनवणारा सोनार सोने पाहिल्याबरोबर किती चांगले आहे हे आपल्या नजरेने,हातात घेऊन आणि एका विशिष्ट दगडाच्या कसोटीवर घासून ओळखतो त्याचप्रमाणे चतुर,चाणाक्ष आणि मनकवड्या व्यक्ती समोर असणा-या आणि समोर आलेल्या व्यक्तींना आपल्या नजरेंनी तेव्हाच ओळखतात.कोण चांगल्या विचारांची,कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आली आहेत,ती कोणत्या हेतूने आली आहेत,कोणत्या स्वभावधर्माची आहेत,आपण त्यांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे किंवा आपण त्याला मदत करायची का नाही याचे ज्ञान नक्कीच असते.यावरुनच माणसे आपल्या नजरेने पहायला,वाचायला आणि शिकायला पाहिजे.यासाठी आपल्याला माणसांच्या मनाचे थोडे शास्त्र आपणही शिकले तर भविष्यात होणारे संभाव्य धोके टळू शकतील आणि आपले जीवन सुखावह होऊ शकेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• महासंकटी सोडिले देव जेणें। प्रतापे बळे आगळा सर्वगूणे॥ जयाते स्मरे शैलजा शूलपाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३१॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रामबाण औषध* एकदा एक सिंह आजारामुळे खूप दुबळा झाला .तेव्हा त्याची विचारणा करायला जंगलातील प्राणी,पक्षी येत-जात असत..तेव्हा एक लांडगासुद्धा सिंहाच्या भेटीला तेथे आला .त्याने सिंहाची विचारपूस केली व सिंहाचे कान भरायला सुरुवात केली ती अशी. लांडगा सिंहाला म्हणाला ,महाराज क्षमा असावी ,पण एक गोष्ट विचारायचे धाडस करू काय ? तेव्हा सिंहाने लांडग्याला लगेच परवानगी दिली व म्हणाला , विचार काय विचारायचे ते . तेव्हा लांडगा म्हणाला ,महाराज आपल्या आजाराची विचारण करायला जंगलातील सर्व प्राणी आले पण ...! पण काय .....? सिंह म्हणाला . महाराज या प्राण्यांमध्ये मला कोल्हा दिसला नाही . नाही मी सहज विचारलं या कोल्ह्याला महाराजांबद्दल बिलकुल आदर नाही ,असे मला वाटते .नाहीतर तो एकदा तरी येऊन गेला असता . कोल्हा तेवढ्यातच तेथे येऊन उभा झाला.लांडग्याचे शेवटचे शब्द कोल्ह्याच्या कानावर पडले होते .तेव्हा कोल्हा शांतपणे म्हणाला , महाराजांनी एकदा माझे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावे नंतर काय ते बोलावे. महाराज आजपर्यंत एवढे पशु आपल्या भेटीला आले ,पण कोणी आपल्या आजाराचा उपाय शोधला ? या उपायासाठी मी आजपर्यंत खटपट करत होतो व ते औषध शोधल्यावरच मी आपल्याजवळ आलो.सिंह म्हणाला,सांग मग काय उपाय शोधला तू ! महाराज औषध एकदम रामबाण शोधल आहे. सांग बाबा लवकर काय ते औषध आहे , सिंह म्हणाला .कोल्हा म्हनला ते औषध असे आहे की एका जिवंत लांडग्याचे कातडे सोलून ते गरम असतानाच तुम्ही अंगावर घेतले म्हणजे झाल . त्याच क्षणी लांडगा तेथे मारून पडला.कोल्हा म्हणाला,कोणाचे कान भरण्यापेक्षा त्यांच्यातला सद्भावना जागृत करणे केव्हाही उत्तम ! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment