✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/03/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन* *नियोजन दिन* *जागतिक अपंगत्व दिन* 💥 ठळक घडामोडी :- १८२७ - टोरोंटो विद्यापीठाची स्थापना. १९३७-अमेरिकेत पहिली blood bank सुरू १९८५-Symbolic. com हे internet वरील पहिलेडोमेन नोंदविले गेले. १९१९-हैद्राबाद च्या उस्मानिया विद्यापीठाचे उदघाटन २००३-हू जिताओ चीनच्या अध्यक्षपदी 💥 जन्म :- १६३८ - शुंझी, चीनी सम्राट. १७६७ - अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचा ७वा राष्ट्राध्यक्ष. १७७९ - विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान. १९०२-विजयंपाल लालाराम तथा 'गुरू हनुमान' (कुस्ती प्रशिक्षक) १९२०-हॉकीपटू आर फ्रान्सिस 💥 मृत्यू :- १९३७ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९९२-डॉ राही मासूम रझा,हिंदी व उर्दू कवी ,गीतकार २०००-लेडी राणू मुखर्जी ,विचारवंत आणि कलासमीक्षक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली - इव्हीएममध्ये गडबड होण्याचा संशय व्यक्त करत 21 विरोधी पक्ष नेत्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव, याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नागपूर - रामेश्वरमहून अयोध्येला निघालेल्या रथयात्रेचे नागपुरात आगमन, विश्व हिंदू परिषदेतर्फे स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची पहिली यादी केली प्रसिद्ध, मात्र माढा आणि नगरबाबत सस्पेन्स कायम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य, सुजयचा निर्णय वैयक्तिक - राधाकृष्ण विखे पाटील* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वीरता पुरस्कार प्रदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकर यांची अकोल्यात घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नासा येवतीकर* या blog ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://goo.gl/A2cY7L आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बापूराव पेंढारकर* मराठी रंगभूमीवर स्त्री भूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक बापूराव पेंढारकर यांचा जन्म १० डिसेंबर, १८९२ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते. केशवराव भोसले यांनी १९०७ साली हुबळी येथे ‘ललितकलादर्श’ ही संस्था सुरू केली. या संस्थेने अनेक नाटकांना लोकप्रियता मिळवून दिली. केशवरावांच्या मृत्यूनंतर बापूराव पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ची धुरा सांभाळून सत्तेचे गुलाम, कुंजविहारी, कृष्णार्जुनयुद्ध, श्री, सोन्याचा कळस, आदी नवी नाटके मराठी रंगभूमीवर आणली; पण त्यांच्या अकाली निधनानंतर‘ललितकलादर्श’ पोरकी झाली. त्याचवेळी बोलपटांमुळे संगीत नाटकांची लोकप्रियता ओसरू लागली होती, पण बापूरावांचे सुपुत्र भालचंद्र पेंढारकर यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी १९४२ साली नव्या जोमाने संस्थेचे पुनरुज्जीवन केले. त्यांना या कामात अनेक वेळा आर्थिक समस्यांनी ग्रासले, पण त्यांनी ललित कलादर्शचे काम तडफेने पुढे चालूच ठेवले. आत्तापर्यंत कवी ना. घ. देशपांडे यांनी लिहिलेली आणि जी. एन. जोशी यांनी गायलेली व संगीतबद्ध केलेली ‘रानारानात गेली बाई शीळ’ ही कविता पहिले मराठी भावगीत समजले जात होते. पण या गाण्यापूर्वी राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी लिहिलेले आणि रंगभूमीवरील अभिनेते-गायक तसेच ‘ललित कला दर्श’ कंपनीचे चालक-मालक बापूराव पेंढारकर यांनी गायलेले ‘हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला’ हे ध्वनिमुद्रित झालेले पहिले मराठी भावगीत असल्याची माहिती अभ्यास व संशोधनातून नंतर समोर आली आहे. बापूराव पेंढारकर यांचे निधन १५ मार्च १९३७ रोजी झाले. संजीव वेलणकर पुणे. ९३२२४०१७३३ *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• “परमेश्वर प्रत्येकाला *हिरा* बनवुनच जन्माला घालतो , पण *चमकतो* तोच, जो *घणाचे घाव* सोसण्याची हिमंत ठेवतो. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?* यशवंतराव चव्हाण 2) *महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता ?* जळगाव 3) *महाराष्ट्रात 'पंढरपूर' हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?* सोलापूर 4) *भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?* 2 रा 5) *महाराष्ट्रात 'दीक्षाभूमी' कोठे आहे ?* नागपूर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • राजेंद्र महाजन • विलास फुटाणे • संतोष कळसकर • बालाजी मामीलवाड • लक्ष्मण चिंतावार • लक्ष्मीकांत धुप्पे • गणेश गिरी • अंबादास पवार • सुधाकर शेषराव बोडके • विठ्ठल इरन्ना रावजीवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मुलं* मोठ्यांची मुलं पहा कसे भैकत आहेत गोरगरिबांची मुलं बापाचं ऐकत आहेत मुलं ऐकण्यात रहायला योग्य संस्कार लागतात योग्य संस्कार असले की मुलं बरोबर वागतात शरद ठाकर सेलू जि.परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुखकर्ता आणि दुखहर्ता ही गणेशाची स्तुती फक्त स्तुतीच्या पातळीवर न राहता आपल्यात कशी परिवर्तीत होईल याकडे लक्ष हवे. आपले उलट होते आरतीतल्या शब्दांपेक्षा सगळे लक्ष प्रसादावर असते. त्यामुळे आसक्ती वाढते. आरती म्हणणे ही चार चौघांमधली सक्ती होऊन बसते आणि सक्तीने केलेले कोणतेही काम फलप्रद नसते. घरातल्या माणसांना जेवायला लागते म्हणून स्वयंपाक करायचा आणि मन:पुर्वक स्वयंपाक करायचा यात जो मुलभूत फरक, तोच फरक जगण्यातल्या अध्यात्मात आहे.* *तो फरक जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच बदल घडेल. अन्यथा फक्त प्रतिक्रिया घडत राहील. प्रतिक्रियावादी असणे आणि गुन्हेगार असणे यात व्यापक अर्थाने फार फरक नाही. जगण्याच्या व्याप-तापात माणूसपण संभाळणे गरजेचे असते. सामाजिक उत्सव आणि उपक्रमांत ते संभाळण्याची संधी असते, पण त्या संधीचे सोने किती लोक करत असतील ? समाजातील जास्तीत जास्त वर्ग अशा उत्सवांतून उजळून निघायला हवा.* ☘ *॥ रामकृष्णहरी ॥* ☘ 🍀🍀🍀🍀🍀🍀 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेमभाव एक चाहिए , भेष अनेक बनाय | चाहे घर में वास कर , चाहे बन को जाए || अर्थ मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती सामावलेली असेल. - व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा। उडी घालितो संकटी स्वामि तैसा॥ हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३७॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेडे सांबर* एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते. पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, ''अहाहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बाकी फारच वाईट आहेत! किती रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते!'' सांबर असा विचार करीत आहे तोच काही शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पारधी मागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निघेनात! अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले! मरताना ते बोलले, ''अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली! तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले! पण या शिंगांनी बाकी माझा जीव घेतला!'' *तात्पर्य :- जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते! जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले!* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment