✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/03/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संभाजीराजे भोसले पुण्यतिथी* 💥 ठळक घडामोडी :- १८८६-पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली. १९९९- NASDAC शेयर बाजारात जागा मिळवणारी INFOSYSIS ही पहिली भारतीय कंपनी बनली. २००१-बॅडमिंटनपटू पी.गोपीचंद ने तब्बल २१ वर्षांनीऑल इंडिया बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले २००७ - २००७ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन. २०११ - जपानजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप. यात आणि यानंतरच्या त्सुनामीमध्ये शेकडो ठार. 💥 जन्म :- १८९०-व्हॅनेव्हर बुश,पहिल्या analog electronic संगणकाचा निर्माता १९१५-विजय हजारे भारतीय क्रिकेटपटू १९८२ - हसन रझा, क्रिकेटपटू, वयाच्या १४व्या वर्षी कसोटीपटू झाला. 💥 मृत्यू :- १६८९ - छत्रपती संभाजीराजे भोसले १९५५-नोबेल पारितोषिक विजेते scotish शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग १९७९-संपादक यशवंत कृष्ण खांडीलकर *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या घोषणेबरोबरच देशात आदर्श आचार संहिता जाहीर झाली आहे. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली - परीक्षा, सण आणि शेतीच्या कामांची वेळ विचारात घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे - मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई - महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कोटी 73 लाख मतदार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मध्यप्रदेश : राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी ओबीसी प्रवर्गासाठी असलेले आरक्षण 27 टक्के करण्याच्या अध्यादेशाला दिली मंजुरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर अनिवार्य, प्रत्येक इव्हीएमवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे, तसेच इव्हीएम मशीनवर उमेदवाराचे छायाचित्रही लावण्यात येणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जुनी पेंशन योजना चालू करावी ( दैनिक जनशक्ती )* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. https://www.ejanshakti.com/जुनी-पेन्शन-योजना-चालू-कर/ आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काय असते आचारसंहिता!* निवडणूक... मग ती ग्रामपंचायतीची असो किंवा लोकसभेची; टीका, आरोप-प्रत्यारोप तर होतातच! पण, प्रचारादरम्यान एकमेकांची उणीदुणी काढताना काही पथ्यं प्रत्येक उमेदवाराने आणि नेत्याने पाळणं बंधनकारक असतं. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत कसं वागायचं, कसं बोलायचं, याचे जे नियम निवडणूक आयोगाने तयार केले आहेत, तीच आचारसंहिता. म्हणजेच, Model Code of Conduct. निवडणुका मुक्त आणि पारदर्शकपणे व्हाव्यात, या हेतूने ही मार्गदर्शक तत्त्वं ठरवण्यात आली आहेत. त्यालाच आचारसंहिता असं म्हटलं जातं. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर ही आचारसंहिता देशभर लागू झाली आहे. या आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. * आचारसंहितेच्या काळात पाळायची ठळक पथ्यं टीका करायची असेल तर ती राजकीय धोरणांवर करा. कामं, वचनं पूर्ण केली नसतील त्यावर बोट ठेवा. परंतु, एखाद्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून टीका नको. मतदारांकडे मतं मागताना आपण केलेली कामं दाखवा. कुठल्याही वस्तूचं आमीष देणं किंवा धमकावणं हे कायद्यात बसत नाही. सत्ताधाऱ्यांनी पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करणं हा आचारसंहितेचा भंग ठरतो. मंत्री म्हणून दौऱ्यावर गेलेल्या नेत्याने त्याच्या पक्षाच्या बैठकीत सहभागी होणं योग्य नाही. आचारसंहितेच्या काळात सरकारला नव्या घोषणा करता येत नाहीत किंवा एखाद्या योजनेसाठी निधीही जाहीर करता येत नाही. सगळेच पक्ष आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये आश्वासनं देत असतात. परंतु, मतदारांना मोठ्या प्रमाणात प्रभावित करू शकतील, अशी आश्वासनं देणं आचारसंहितेत बसत नाही. मतदान केंद्रांमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि मतदार यांच्याशिवाय कुणालाही जाण्याची परवानगी नसते. म्हणूनच, मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर अनेक पक्षांचे कार्यकर्ते टेबल टाकून बसल्याचं पाहायला मिळतं. एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केल्यास त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करता येते. त्यानंतर, आयोगाचे निरीक्षक तपास करून कारवाईबाबत निर्णय घेतात. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'पर्यावरण दिवस' केव्हा साजरा करतात ?* 5 जुन 2) *'जागतिक योग दिवस' केव्हा साजरा करतात ?* 21 जुन 3) *'स्वातंत्र्य दिवस' केव्हा साजरा करतात ?* 15 ऑगस्ट 4) *'नाताळ' केव्हा साजरा करतात ?* 25 डिसेंबर 5) *भारतातील सर्वात लांब नदी कोणती ?* गंगा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • प्रलोभ कुलकर्णी • भाऊसाहेब उमाटे • जब्बार मुलाणी • नरसय्या गैनवार • सूर्यकांत सोनकांबळे • संतोष देवणीकर • रमेश कवडेकर • संदीप दुगाडे • आदित्य तरवाल *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दुटप्पीपणा* कशाला दाखवता मी आहे मोठ्या मनाचा किळस आहे तुमच्या असल्या दुटप्पीपणाचा तुमचा मोठेपणा दिसला कसा आहे तो लटका असे वागल्यास एक दिवस बसेल चांगला फटका शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सहज म्हणून ईश्वराची व्याख्या करावीशी वाटली , त्याची कृपा म्हणजे काय? त्याचे अस्तित्व म्हणजे काय? त्याचे नेमकेपण कशात आहे? तेव्हा लक्षात आले हे फार कठिण काम आहे. कारण त्याने स्वत:ला प्रत्येक चांगल्या व्याख्येत बसविले आहे. मग आता आणखी शोधायचे कशात? आपल्या दिवसभरातील सर्वात चांगल्या कामाची व्याख्या म्हणजे ईश्वर, चांगल्या कामाला मिळालेली भरघोस दाद म्हणजे ईश्वर. सत्पात्री दानात ईश्वर, न्याय बाजूत ईश्वर, प्रभातीचा सूर्य म्हणजे ईश्वर, अनुकूल पाऊस म्हणजे ईश्वर, जपलेलं माणूसपण म्हणजेही ईश्वर आणि निरागस बालकाचे हास्य म्हणजेही ईश्वर.* *पंढरपुरच्या वारीवर निघालेल्या एका म्हातारबाबाला एका पत्रकाराने विचारले,'का हो बाबा, तुम्ही इतकी वर्ष वारीला जाता, तुम्हाला एकदा तरी देव प्रत्यक्षात भेटलाय का? त्यावर थोडा विचार करून ते म्हणाले,'ज्ञानोबामाऊलीने आणि तुकोबाने सांगितले म्हणून जातो, त्यांना देव दिसला असंल, माझा त्यांचेवर विश्वास हाय. मला तो दिसलाच पायजे असा माझा हट्ट नाय.' खरा आनंद त्याला देवाने त्या दिड महिन्यात केव्हाच दिलेला असतो.* ‼ *॥ रामकृष्णहरी ॥*‼ 🍀🍀🍀🍀🍀🍀 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हरिया जांणे रूखड़ा, उस पाणी का नेह । सूका काठ न जानई, कबहूँ बरसा मेंह ॥ सारांश वृक्षास कळे सिंचन जया प्रिय ते जीवन शुष्क काष्ठ काय जाणे ? थेंब मोतिया समान महात्मा कबीर पटवून देतात की मनाच्या तयारीवर सर्वकाही अवलंबून असतं. पाण्याचं महत्त्व , त्याचा स्नेह व सिंचन केवळ हिरव्या वृक्षाला समजू शकतात. वाळलेल्या लाकडाला जवळून जाणारा जल प्रवाह किवा अमृतरूपी जलधारांच्या वर्षावाचं काय अप्रुप वाटणार आहे बरं ! मोत्यासम थेंबाचं त्याला काहीच महत्व नसतं. कारण त्याच्या ठायी असणारं भावनाशिल मन कधीच मेलेलं असतं. मुर्दाड मनाच्या माणसाला बाग, हिरवळ, प्रेम, आपुलकी, सहानुभुती संवेदना आदि भावना काय कळणार ? ते खरं तर दगडा समान निगर गट्ठ बनलेले असतं. त्याच्यावर कितीही जलधारांचा अभिषेक केला तरी दगड द्रवत नाही. तसे दगणडासमान निष्ठूर निर्दयी माणसासोबत एकतर्फी कितीही प्रेमळ वागलात तरी त्याच्या मुळ स्वभावात तीळमात्र स्नेहार्द्र भाव निर्माण होण्याची सुतराम शक्यता नसते. . त्यांचा स्वार्थ साधला की संपलं . खरं तर यांचं असणं नसणं नसण्यातंच जमा असतं. ओसाड निर्दयी मनामध्ये दयेचे निर्झर प्रवाहित होणं अशक्य आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काहीवेळा काहींच्या बाबतीत मनुष्याचा स्वभाव समोरची परिस्थिती पाहून बदलत असतो.कधी कधी असेही वाटते की,आपण कमी वेळेत खूप काही करुन धनाढ्य व्हावे आणि आनंदाने जीवन जगावे.या वाईट मोहासाठी तो वेगवेगळ्या गैरमार्गाचा अवलंब करतो आणि संपत्ती अर्थात माया जमवण्याच्या मोहात पडतो.जी माया जमवली त्यात त्याला समाधान तर नसतेच अजूनही त्याच्यापेक्षा अधिक माया जमवण्यात वेळ खर्च करतो.परंतु हे त्याच्या लक्षात येत नाही की,आपण वाममार्गाला लागलो आहोत, दुस-याला लुटलो आहोत ही जी काही वाईट सवय लागली आहे ती आपल्या मनाला समाधान देणारी नाही.केवळ आपल्या मोहापायी, आपल्या स्वार्थासाठी इतरांच्या जीवाला त्रास देऊन आपल्या नको त्या गोष्टीच्या नादाला लागलो आणि हावरटपणाचा कहर केला. त्यामुळे आपले जीवन हे जीवन राहिले नसून आपण इतरांच्या नजरेत एक गुन्हेगार ठरलो आहोत आणि ते ही आपल्या स्वार्थी मोहापायी ? हा मोह काहीच कामाचा नाही.ज्यामुळे माणसातील माणुसकी नष्ट झाली.त्यापेक्षा मनाचा हावरटपणा सोडून द्यावा, भरपूर मेहनत करावी,आपल्या कृत्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपले जीवन सुखासमाधात जावे.यापेक्षा आपल्या कोणत्याही अपेक्षा असू नयेत.हाच मंत्र चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे.नाही तर नको त्या मोहात जाणे आणि आपल्याच हाताने जीवन दु:खमय जगणे यापेक्षा जीवनाचे वाईट चित्र काय असू शकेल ? © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अहल्या शिळा राघवें मुक्त केली। पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥ जया वर्णितां शीणली वेदवाणी। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकीचे बळ* एका गावातील एक माणूस रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्डय़ात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिल्याचा जीव वाचवला तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लळा लागला. ते पिलू त्याला तेथे भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. परंतु त्यांना सर्वाना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. त्या माणसाने एक योजना बनविली. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्याच्यावर भुंकू लागली. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची उडी थेट त्या कुत्र्याच्या मागे असणार्या एका मोठय़ा खड्डय़ात पडली. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. *तात्पर्य : एकीचे बळ मोठे असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment