✴ ✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/03/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९४९ - कॅप्टन जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. १९५२-पंडित नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उदघाटन १९७२-अमेरिकेचे "पायोनीर-१०" यानाचे गुरूच्या दिशेने उड्डाण झाले २००४ - संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने ने जाहीर केले की १९९४ नंतर इराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हती. 💥 जन्म :- १९३१-राम शेवाळकर मराठी साहित्यिक १९६२ - जॉन बॉन जोव्ही, अमेरिकन रॉक संगीतकार. १९७७-अँड्रयु स्ट्रास-इंग्लिश क्रिकेटपटू 💥 मृत्यू :- १७९१ - जॉन वेस्ली, मेथोडिस्ट चर्चचा स्थापक. १८३५ - फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट. १९२१ - निकोलस पहिला, मॉँटेनिग्रोचा राजा. १९४९-सरोजिनी नायडू १९८६ -काशीनाथ घाणेकर मराठी अभिनेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे तीन दिवसांनंतर पाकिस्तानातून मायदेशात परतले, भारतीयांचा विजयी जल्लोष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कात्रज - देहूरोड बायपास होणार सहा पदरी : २२३.४६ कोटी निधी मंजूर, खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुरावा * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दिल्ली - देशात सध्या तणावाची परिस्थिती असली तरी लोकसभा निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार, निवडणूक आयोगाची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जम्मू-काश्मीरमधील हंदवाड्यात अतिरेक्यांसोबत चकमक, भारताचे दोन पोलीस व एक अधिकारी शहीद* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई : राज्यातील पोलीस पाटील यांच्या मानधनात तसेच होमगार्डच्या कर्तव्य भत्त्यात भरीव वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वाल्मिकी मेहता यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत वि. ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनीला दुखापत, पहिल्या सामन्यातील समावेशाबाबत संदिग्धता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षकांना शिकवू द्या ...* राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राम शेवाळकर* कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. वेदशास्त्रसंपन्न रामशास्त्री शेवाळकर हे राम शेवाळकरांचे पणजोबा, बाळकृष्ण काशीनाथ ऊर्फ भाऊसाहेब शेवाळकर हे त्यांचे वडील. त्यांनी पासष्ट वर्षे कीर्तनाने लोकांना मंत्रमुग्ध केले. अशा घराण्यात जन्मल्यामुळे राम शेवाळकरांना संस्कृत साहित्याची आवड लागली. त्यांच्यावर संस्कृत महाकाव्ये, मराठी संतसाहित्याच्या माध्यमातून वाङ्मयीन संस्कार झाले. राम शेवाळकरांचा जन्म मार्च २, १९३१ रोजी महाराष्ट्रातीलअमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर गावात झाला. पुढे त्यांनी नागपूर विद्यापीठातून संस्कृत व मराठीत एम.ए. केल्यानंतर शिक्षकी पेशा स्वीकारला. वाशीम येथे शासकीय प्रशालेत ते शिक्षक होते. पुढे यवतमाळ महाविद्यालय, नांदेडातील पीपल्स कॉलेज, वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून शिकवले. या सुमारासच त्यांनी संस्कृतीविषयक साहित्यनिर्मितीही आरंभली. १९९४ साली गोव्यात पणजी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य महामंडळ, विश्वकोष निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, अखिल भारतीय सानेगुरूजी कथामाला, महाराष्ट्र साहित्य परिषद, साहित्य अकादमी, नाट्य परीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशा संस्थांच्या कामात शेवाळकरांचा सहभाग होता. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?* हॉकी 2) *भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता ?* वड 3) *भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?* मोर 4) *भारताचा राष्ट्रीय फळ कोणता ?* आंबा 5) *भारताचा राष्ट्रीय फुल कोणता ?* कमळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • रवी कन्नावार • आकाश पाटील ढगे • गणेश पाटील हतनुरे • संतोष कदम • संभाजी सोनकांबळे • चक्रधर ढगे • शेख जुनेद • मीनाक्षी रहाणे • सुरेश मिर्जापूरे • सुबास नाटकर • धर्मगीर गिरी • नरेंद्र लखमावाड • बालाजी धारजने *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दिखावा* दाखवण्या पुरता फक्त स्वाभिमानीबाणा आहे तसे पाहिल्यास इतिहास यांचा लाजिरवाणा आहे स्वाभिमानी असल्याचा उगीच दिखावा करतात लोकांच्या नजरेत दिखावा म्हणजे नाटक ठरतात शरद ठाकर सेलू जि परभणी ८२७५३३६६७५ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या लहानपणी मुलांचं रडणं थांबविण्यासाठी कचकडी खुळखुळा होता. तो बाळाचे रडणे थांबवून त्याला हसरा करायचा. आता त्या खुळखुळ्याची जागा मोबाइलने घेतली आहे. कचकडी खुळखुळा बाळ लहान असेपर्यंत उपयोगी होता, मात्र हा नवा खुळखुळा माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत हाती राहतोय, असं दिसतयं. कचकडी खुळखुळ्यात नाद निर्माण करणारे खडे भरलेले असायचे. मोबाइलनामक खुळखुळ्यात नादाला लावणारे अॅप्स भरलेले असतात. हा खुळखुळा व्हिडीओ गेमचा नाद लावतो. हळूहळू फोन करायला शिकवतो, व्हाॅटस् अॅप शिकवतो, आठवीला गेला की 'मिस् काॅल' देऊ लागतो. युवापिढी रात्र-रात्र जागून चॅट करू लागते.* *माणूस कमवायला लागला की, मग तोंड लपवून 'फेसबुक' वर बाता मारू लागतो. लग्न झाले की, फेक अकाउंटवरून ह्रदय आणि मन मोकळं करत राहतो. कधी लाईक, कधी कमिंट, असं व्यक्त-अव्यक्त अभासी जगात जगू लागतो. गुड माॅर्निंग, गुड इव्हिनिंग, स्वीट ड्रीम, काँग्रॅट्स करत लक्षात येतं की, हे सारं झूट ! अवतीभवती संदेश, शुभेच्छा, सहवेदनांचा पाऊस; पण प्रत्यक्ष नक्षत्र मात्र कोरडंच ! अभासी जगात वाढलेली पिढी कोरडे जग जगताना आपण अनेकदा पाहतो. खरे पाहिले तर खुळखुळा, मोबाइल हे सारे त्या त्या काळातील अभासी भावच ! माणूस भावाचा भुकेला असतो. अभासी, भोगी संस्कृतीच्या जागी वास्तव, संवेदी, जीवाभावाची संस्कृती जपायची तर प्रसंगी जीव देऊन भाव, संबंध, नाते जपणे, जोपासणे म्हणजेच खरं जगणं !!!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀ ☀ ☀ ☀ ☀☀☀ संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• धरती करते एक पग, करते समुद्रा फाल हातों पर्वत तौलते, ते भी खाये काल । सारांश जगी ज्याचा जन्म झाला .त्याला मृत्यूने गिळंकृत केले आहे. हे महात्मा कबीर आपल्या उपदेशपर अमृतवचनातून माया मोहाच्या बंधनात गुरफटलेल्या मानव प्राण्यास मृत्यूची जाणीव करून देताना सांगतात. वामनाची महत्ती सांगताना पुराण कर्त्यानं लिहून ठेवलंय की वामनानं एकाच पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापून टाकली. हनुमानाने जन्मत:च एका उड्डाणात सूर्याला जेरीला आणले. सृष्टीच ज्याच्यावर अवलंबून आहे. त्यालाच गिळंकृत करायला निघाल्यामुळे, आता आपलं कसं होणार ? म्हणून सूर्य हनुमानापुढे निस्तेज पडला. आता आपलं कसं होणार म्हणून सर्वजण काळजीत पडले. याच हनुमानाने एकाच उड्डाणात समुद्र ओलांडला. कृष्णाने एका हाताने गोवर्धन पर्वत तोलून धरला आणि सृष्टीला वाचविले. अशा महा पराक्रमी वीरांनाही काळाने सोडलेले नाही. तिथं सामान्य जीवांचं काय चालणार आहे ! नको नको मना गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी ग्रासावया । काळाची ही उडी पावेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप । या तुकोबांच्या ओळी किती समर्पक आहेत . जीवनात मृत्यू हे अंतिम सत्य आहे . माणूस कितीही महापराक्रमी असला किवा त्याने संपूर्ण जगाला ओरबाडून संपत्तीचा मुबलक साठा केला तरी त्याचे मरण अटळ आहे. जगज्जेत्या सिकंदराचे शेवटचे बोलही याचीच प्रचिती देतात. म्हणून माणसानं माणसासारखं वागून मानव जन्म सार्थक करावा. जीवनात समाधान प्राप्त करावं . कोण जाणे कोणत्या क्षणी आपल्याला काळाचं बोलावणं येईल आणि आपली खेळी संपुष्टात येईल ! एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• रंग कितीही वेगवेगळ्या प्रकारचे असले तरी रंगांना कधीच भेदभाव,जातियता, प्रांतियता किंवा विषमता नाही.त्यांना कुठेही कॅनव्हासवर,कागदावर किंवा भिंतीवर वापरा कधीच काही म्हणत नाहीत.कितीही आणि कुठेही वापरले किंवा मिसळले तरी त्यांच्या वेगवेगळ्या छटा सौंदर्यात भर टाकतात आणि पाहणा-याच्या दृष्टीत अगदी सहज भरुन जातात. पाहाराही थक्क होऊन जातो तो विचार करायला लागतो की, वेगवेगळे असूनही एकात्मतेचे दर्शन घडवतात हे त्यांच्याकडून खरेच शिकायला हवे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दिनानात हा राम कोदंडधारी। पुढें देखतां काळ पोटीं थरारी॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥२८॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चांगल्या विचाराची जोपासना* दोन साधू नदीच्या काठी आपले हात पाय धुवत होते. तेव्हा त्यांना एक विंचू बूडत असताना त्यांना दिसला. त्या साधूंपैकी एकाने लगेच त्याला ओंजळीत घेवून बाहेर काढले. पण त्याच वेळी त्या साधुला विंचुने डंक मारला आणि विंचु परत नदीत पडला. परंतु साधूने परत त्याला उचलुन घेतले तरी परत त्या विंचूने साधूला डंक मारला. हे बघुन दुसऱ्या साधूने त्या साधूला विचारले तो विंचू तुम्हाला सारखा डंक मारतो पण तुम्ही परत त्याला वाचवता का? त्यावर त्या साधूने अतिशय चांगले उत्तर दिले, 'डंक मारने हा त्याचा नैसर्गिक गुण आहे पण त्याला वाचविणे हा माझा नैसर्गिक गुण आहे'.. *लोक कितीही तुम्हाला त्रास देवो तुमचे चांगले कार्य मात्र सतत चालू ठेवा. काही क्षुल्लक लोकांसाठी तुमचे विचार कधीही बदलू नका.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment