✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/03/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९२-मारीशस प्रजासत्ताक राष्ट्र झाले. १९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी. १९९९-सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकार तर्फे निर्णय घेण्यात आला. 💥 जन्म :- १८२१ - सर जॉन ऍबट, कॅनडाचा तिसरा पंतप्रधान. १८८१ - मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष. १९१३- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण १९८४-श्रेया घोषाल ,गायिका 💥 मृत्यू :- १८८९ - योहानेस चौथा, इथियोपियाचा सम्राट. १९९९ - यहूदी मेनुहिन, अमेरिकन-ब्रिटीश संगीतकार. २००१-राबर्ट लुडलूम ,अमेरिकन लेखक *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣*राज्यात तापमानाचा पारा लागला वाढू, यवतमाळमध्ये नोंदवले गेले सर्वाधिक तापमान, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शरद पवारांची माढ्यातून माघार, तरुणाईला संधी देण्यासाठी निवडणूक लढविण्यास नकार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *लोकसभा निवडणुकांमुळे नागपूर विद्यापीठाने ७२ परीक्षा पुढे ढकलल्या, नागपुरात ११ एप्रिल रोजी आहे मतदान* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नाशिक: माकपचे आमदार जे पी गावित दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पंजाबः लोकसभा निवडणुकांच्या 13 जागांसाठी 6 पक्षांचे गठबंधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्लीः सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री आदेल-अल-जुबेर यांनी घेतली परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट* •••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दिल्ली : रवींद्र कोल्हे यांच्यासह प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांचा पद्मश्रीने सन्मान.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सैनिक : देशाचा संरक्षक* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. गंगाधर पानतावणे* गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म 28 जून 1937 रोजी नागपुरात झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपुरातच झालं. 1956 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी बी ए आणि एमएची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तत्कालिन मराठवाडा विद्यापीठातून पीएचडीही प्राप्त केली. महत्त्वाचं म्हणजे त्याच विद्यापीठात म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिलं. खरं तर पानतावणे यांनी मॅट्रिकनंतर लिखानाला सुरुवात केली होती. दलित साहित्य हा त्यांचा जवळचा विषय होता. यामध्ये त्यांचा भरपूर अभ्यास होता, त्यामुळेच त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांनी लिहिलेले `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मूकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, प्रकृती आणि प्रवृत्ती, शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे. अस्मितादर्श नावाचे नियतकालिक देखील त्यांनी चालविले. गंगाधर पानतावणे यांनी 2009 मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. *संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ* 📱09403407550 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड* 📱 9850296824 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताचा गुलाबी शहर कोणता ?* जयपूर 2) *महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणते ?* आंबा 3) *महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत ?* मा.सुधीर मुनगंटीवार 4) *गावाचा प्रथम नागरिक कोण असतो ?* सरपंच 5) *राज्याचा प्रथम नागरिक कोण असतो ?* राज्यपाल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• • शिवराम पेंडकर • वशिम बाबू • विठ्ठल हिवराळे • मधुकर काठेवाडे • माधव पा. दिग्रसकर • आनंदा हंडावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बंड* स्वहितासाठी इथे कधी बंड असते आश्वासन मिळाले की ते एकदम थंड असते बंडाच्या तलवारीही आश्वासनाने म्यान होतात कदाचित मोठ-मोठे बंड असेच बॅन होतात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी........* *जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो.....* *......सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* ‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼ 🔶🔶🔶🔶🔶🔶 संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पांच पहर धंधा किया , तीन पहर गया सोय | एक पहर भी नाम बिन , मुक्ति कैसे होय || अर्थ : दिवसाचे दिन आणि रात्र असे दोन भाग होतात. रात्रीचे चार प्रहर व दिनाचे चार प्रहर असतात. असे एका दिवसाचे आठ प्रहर होतात. त्यापैकी पाच प्रहर म्हणजेच पंधरा तास माणूस नित्याच्या दैनंदिन धावपळीत व्यथित करीत असतो. सहजतेने इतका वेळ नोकरी-चाकरी , मनोरंजन, आदि बाबीत उडवित असतो. तीन प्रहर म्हणजे नऊ तासांचा वेळ दररोज झोपण्यात निघून जातो. खरे तर मनुष्य जन्म इत्तर प्राण्यांपेक्षा भिन्न आहे. बुद्धी आणि बोली यांच्या वेगळेपणामुळे मनन, चिंतन ,चर्चा संवाद-सुसंवाद यांचे माध्यमातून या विश्वाच्या कल्याणाचा वारसा मानव प्राणीच चालवू शकतो. गरज आहे ती आपल्या अष्टौ प्रहरापैकी अर्धा-एखाद प्रहर स्वार्थविरहित निरामय भावनेने जीवनाकडे बघण्याची. असा संकल्प सर्वांनी केला तर या अशा प्रगल्भ जगण्यानं या विश्वाचंं कल्याणंच होईल. सर्वांच्या दुःखाच्या व्याधीचं परिमार्जन होईल. अनावश्यक लालसा, मोह टाळता आले तर पृथ्वीवर नंदनवन बनवायला किती अवकाश लागणार आहे ! व्याधी व वेदना मुक्तीचा तोच तर खरा महामार्ग असणार आहे. एकनाथ डुमणे, मुखेड 📱 9096714317 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शेतकरी शेतात बियाणे टाकून येणा-या किंवा उगवणा-या धान्याची वाट पाहणे हे सत्य आशा आहे. कारण त्याला त्याच्या केलेल्या कामावर, मेहनतीवर विश्वास आहे. तो कधीही राशीचक्रावरील राशीनुसार लिहिलेल्या भाकितावर विश्वास ठेवत नाही किंवा त्यानुसार चालतही नाही. जे राशीनुसार चालतात ते मात्र त्यावर विसंबून राहून आपल्याच जीवनात चांगल्याप्रकारे चाललेल्या संसारगाड्याला खीळ बसवतात. त्यामुळे व्हायची ती प्रगती होत नाही आणि करता येत नाही. म्हणून माणसाने कोणत्याही भाकितावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे आणि सातत्याने जीव ओतून केले तर नक्कीच जीवनात यश मिळते तसेच जीवन सुखी व समृद्ध होते यात संशय नाही. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎡 मनाचे श्लोक 🎡* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वसे मेरुमांदार हे सृष्टिलीला । शशी सूर्य तारांगणे मेघमाला॥ चिरंजीव केले जनी दास दोन्ही। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३३॥ संकलन : सौ. सुभद्रा सानप, बीड •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पारख* खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. एक कामगार आपल्या गाढवासोबत जंगलातून चालला होता. इतक्यात रस्त्याच्या बाजूला त्याला काही चमकताना दिसलं. त्यानं जवळ जाऊन पाहिलं तर तिथे एक चमकणारा दगड पडलेला होता. त्यानं तो उचलून आपल्या गाढवाच्या गळ्यात अडकवला आणि पुढे चालू लागला. समोरून येणाऱ्या एका हिरे व्यापाऱ्यानं गाढवाच्या गळ्यात अडकवलेला तो मौल्यवान दगड बघितला. मग त्यानं गाढवाच्या मालकाला विचारलं, ‘भाऊ मला हा दगड विकत घ्यायचा आहे. तुम्ही याचे किती पैसे घेणार?’. कामगाराला दगडाच्या किंमतीबाबत काहीच कल्पना नव्हती. फक्त शंभर रूपये घेईन, असं त्यानं सांगितलं. त्यावर हिरे-व्यापारी म्हणाला ‘शंभर रूपये तर खूप जास्त आहेत. मी फक्त पन्नास रूपयापेक्षा अधिक रक्कम नाही देणार.’ कामगारानं थोडा विचार केला आणि शंभर पेक्षा कमी रुपये घेणार नाही, असं सांगितलं. व्यापाऱ्याला वाटलं की या मौल्यवान दगडासाठी त्याला कोणी गिऱ्हाइक मिळणार नाही. मग हा कामगार ५० रुपयात हा दगड विकण्यासाठी आपल्या मागं येईल. थोडावेळ जाऊनही कामगार त्या व्यापाऱ्याजवळ आला नाही. अखेर व्यापारीच त्याच्या शोधात निघाला. त्याला दिसलं की दुसरा एक व्यापारी त्याच्याकडून तो मौल्यवान दगड विकत घेत आहे. तो व्यापारी पळत कामगाराजवळ पोहोचला. तोपर्यंत व्यवहार पूर्ण करून समोरचा व्यापारी निघून गेला. त्या व्यापाऱ्यानं कामगाराला विचारलं की, ‘तो दगड तू किती रुपयांना विकला?’. कामगार म्हणाला, ‘२०० रुपये’. व्यापाऱ्यानं त्याला म्हणाला, ‘अरे मुर्खा तो दगड अत्यंत मौल्यवान होता आणि तू अवघ्या २०० रुपयांना विकलास!’ त्यावर कामगार उत्तरला, ‘मूर्ख मी नाही, तुम्ही ठरलात. कारण मला तर तो दगड रस्त्याच्या बाजूला पडलेला मिळाला होता आणि त्याची किंमत माहित नव्हती. पण तुम्हाला त्याची किंमत माहित असून देखील तुम्ही अवघ्या ५० रुपयांच्या हव्यासापोटी तो दगड विकत घेतला नाही. १०० रुपयात तो दगड विकत घेतला असता तर भविष्यात तुम्हाला मोठा फायदा मिळाला असता.’ *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment