✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/08/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९६६ - विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली. ◆१९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली. 💥 जन्म :- ◆१८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक. ◆१८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक. ◆ १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भारतीय क्रांतिकारक. 💥 मृत्यू :- ◆१९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ ◆ १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू ◆ २००८ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार. अहिल्याबाई होळकर , होळकर घराण्यातील राज्यकर्ती, परम शिवभक्त *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भिवंडी : इरानी पाडा येथीच चार मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली 10-15 जण अडकल्याची शक्यता, घटनास्थळी बचाव पथक दाखल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *गोव्यात किमान दहा हजार ग्राहकांना सौर ऊर्जेकडे वळविण्याचे उद्दिष्ट असल्याचे गोव्याचे पर्यावरणमंत्री निलेश काब्राल यांनी सांगितले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अनेक मोठ्या कंपन्यांना मंदीचं ग्रहण लागताना दिसतंय. हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली जातेय. त्यामुळे जनताही धास्तावलीय, देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या १२ घोषणा!* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील पूर्व, दक्षिण भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला यशस्वी, सायंकाळी चार वाजता कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानांनी ढगांवर रसायनाची फवारणी केली. त्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दीड तास झालेल्या या पावसाने तालुक्यातील बंधारे ओसंडून वाहिले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अनाथ मुलांच्या नोंदणीसाठी 'सरल पोर्टल' वर नवा पर्याय उपलब्ध; शासनाने काढलं परिपत्रक, सरल पोर्टलमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी आईवडील यांचे नाव माहित नसल्याने मधले नाव Not known अशी सुविधा होणार उपलब्ध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *लंडन, अॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिल्या डावात फक्त 67 धावांत उडविला खुर्दा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे पाठोपाठ अष्टपैलू रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावल्यामुळे भारताच्या पहिल्या डावात 297 धावा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सोशल मीडिया आणि आधार* https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_23.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया खालील क्रमांकवर जरूर द्यावे ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *उल्कापात म्हणजे काय ?* 📙 रात्रीच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा रंगल्या असताना निरभ्र आकाशात अचानक एखादा चमकदार पदार्थ झळाळत निखळताना दिसतो. सगळ्यांचेच लक्ष तिकडे वळते. पण हा झळाळणारा पांढराशुभ्र चमकदार पदार्थ पृथ्वीच्या नजीक आल्यावर दिसेनासाही होतो. हा असतो उल्कापातातला एक छोटासा तुकडा. पृथ्वीवर दरवर्षीच अनेक वेळा लहान मोठ्या उल्का कोसळत असतात. त्यांच्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होतात. पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या उल्कांचा आकडा लक्षात घेतला तर रोज एखाद दुसरी उल्का जमिनीपर्यंत पोहोचते. पण न पोहोचणाऱ्या त्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. त्या वातावरणात होणाऱ्या घर्षणाने तापून प्रकाशमान होतात, वितळतात व नंतर त्यांची वाफ होऊन वातावरणातच नष्ट पावतात. खऱ्या अर्थाने एखादी मोठी उल्का येथे येऊन आदळण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. असा सर्वात मोठा ज्ञात प्रकार अॅरिझोना या अमेरिकेतील राज्यात घडला असावा. किमान पंचवीस हजार वर्षांपूर्वी घडलेल्या या उल्कापातातील उल्केचे वजन पन्नास हजार टन असावे. यामुळे निर्माण झालेला खळगाच मुळी सव्वा किलोमीटर व्यासाचा आहे. भारतात लोणारचे तळे याच पद्धतीने तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले खड्डे हे चंद्रावर तर ठायीठायी आढळतात. ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमध्ये असे मोठाले उल्कापात अलीकडच्या शतकात झाले आहेत. उल्कापातातील दगड हे पृथ्वीवरच्या दगडांपेक्षा एकदम वेगळे असल्याने त्याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आले आहे. काही पूर्णत: लोहाचे काही पूर्णत: शिलांचे तर काहींमध्ये मिश्रा असे हे दगड असतात. सूर्य व ग्रहमालिका तयार झाली त्या वेळी काही अवशेष अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यांतील काही शिळा, काही धूर, तर काही वायूरूप अवस्थेत आहेत. ग्रहांच्या आकर्षणाने ते ज्यावेळी कक्षेत खेचले जातात तेव्हा उल्कापात घडतात. पृथ्वीचे परिभ्रमण चालू असताना काही वेळा एखाद्या अशा धुळीच्या लोटातून पृथ्वी जाते. अनेक छोटेमोठे उल्कापात या वेळी होतात. गारांचा सडा पडावा तशा या छोट्यामोठ्या उल्का वातावरणात येतात; पण त्यांतील बहुसंख्य तेथेच वितळून चकाकत नष्ट होऊन जातात. पृथ्वीवर समुद्रात कोसळणाऱ्या उल्कांचा तर पत्ताच लागत नाही व अशांचा आकडा फार मोठा असणार आहे. उल्कांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. हा एक तेजीत चालणारा व्यवसाय आहे. उल्का वा पृथ्वीवरच्या दगड ही जाण त्यासाठी असणे ही प्रमुख अट. येथेच बरेचजण गळतात. त्यानंतर यासाठी करावी लागणारी वणवण व त्याला लागणारा अफाट पैसा ही दुसरी अडचण. तिसरी अडचण विविध देशांचे कायदे. पण यावरही मात करून अनेकजण ही हौस भागवतात, तर काहीजण यातूनच पैसा करतात. मोठ्या आकाराच्या उल्केला कित्येक हजार रुपयांची मागणी सतत असते, हे विशेष. उल्कापाताचा एक मोठा अंदाज फार पुरातन काळी झालेल्या उलथापालथीशी नेहमीच जोडला जातो. या महाप्रचंड उल्कापातानेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धूर, धूळ साचून सूर्यप्रकाश पोहोचायला अडथळा झाला असावा व येथील प्राणीजीवन खूपसे नष्ट झाले असावे, असे काहींचे म्हणणे आहे. डायनॉसॉर जातीचे महाकाय प्राणी किंवा सरपटणाऱ्या जाती यातच उपासमार होऊन नष्ट झाल्या असाव्यात, असे मानले जाते. या अंदाजाला पुष्टी देणारा त्या उल्कापाताचा मोठ्या आकाराचा पुरावा मात्र मिळत नाही, ही या अंदाजातील कमतरता म्हणावी लागते. तुम्ही राहता त्या गावातील संग्रहालयात एखादी उल्का आहे का याची चौकशी करा. नसल्यास कुठे बघायला मिळेल, याची माहिती संग्रहालयाच्या प्रमुखांना विचारा. चंद्रावरील आणलेले काही दगड नील आर्मस्ट्राँग यांनी आपल्या देशाला भेट दिले आहेत, हे ज्ञात आहे का ? *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात केंद्रशासित प्रदेशांची संख्या किती आहे ?* 9 2) *'दासबोध' हा ग्रंथ कोणी लिहिला ?* समर्थ रामदास 3) *शिवाजीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली ?* रायरेश्वर मंदिर 4) *महाराष्ट्रातील शैक्षणिक शहर कोणते ?* पुणे 5) *पहिले सजीव कोठे निर्माण झाले ?* पाण्यात *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● श्याम ठाणेदार, पुणे ● श्रीकांत भुजबळ साहेब ● हणमंत बोलचेटवार ● संजय पाटील, पुणे ● ऋषिकेश शिंदे ● गोपाल ऐनवाले ● सुनीलकुमार बावसकर ● प्रितिष पाटील ● भाऊराव शिंदे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *काही जण म्हणतात* *काय कुठे संपल्या वेदना।* *पुन्हा नवा अवतार कशाला,* *जन्म दिला जर एकटीने मग ,* *नेणारे हे चार कशाला।* *खर वाटत नेहमी-----* *_जन्मापासुन शेवटच्या क्षणापर्यंत नुसते राबराब राबणे म्हणजे आयुष्य नाही ..._* *_स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य होय ..._* *_वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत ..._* *_मानलं तर मौज ..._* *_नाहीतर समस्या रोज ...!!!_* *स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ* *येईल* *मैत्री अशी करा की जग आपले* *होईल* *अपयश असे स्वीकारा की विजेता* *भारावून जाईल* *माणुस असे बना की माणुसकी* *नतमस्तक* *होईल..!* ! *वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार** *आणि पिके जळून गेल्यावर पडलेला* *पाऊस यांची किंमत सारखीच असते*. *डोळे बंद केले म्हणून*......... *संकट जात नाही .* *आणि संकट आल्या शिवाय ,..* *डोळे उघडत नाहीत.* *राग आल्यावर थोडं थांबलं,..* *आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,..........* *तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....* *🙏अशोक कुमावत🙏* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नाते असे तयार करा की,ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली पाहिजे.जर असे नाते बनवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातील स्वार्थीपणाला तिलांजली द्यायला हवी आणि त्याबरोबरच प्रेम,जिव्हाळा,मैत्री, आपुलकी इ.गुणांना प्राधान्य देऊन खरे माणुसकीचे दर्शन निर्माण करुन जो काही एकमेकांतला असलेला दूरावा दूर करून एक अजोड आणि अतूट नाते निर्माण करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवता* जगाच्या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्या कुटीत ईश्वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्यांच्याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्यांच्यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्यूनंतर ते जेव्हा स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना सोन्याचा मुकुट घालण्यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्यांच्या डोक्यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्वात कोणत्याच दृष्टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्याचा मुकुट व त्या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्यांचे बोलून झाल्यावर देवदूत म्हणाला,’’ तुम्ही पृथ्वीवर हिरे माणके दिलेली नव्हती तेव्हा तुम्हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्हणजे अश्रू होते. जे त्यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल त्यांना वाईट वाटले व त्याबद्दल त्यांच्या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्वरभक्ती आणि स्नेह यातच खूप आनंदी होतो म्हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्हणाला,’’ तुम्हाला ईश्वराचा स्नेह मिळाला म्हणूनच तुम्हाला ईश्वराचा सोन्याचा मुकुट देण्यात आला आहे.’’संताना स्वत:ची चुक समजली. ते स्वत:मध्येच मशगुल राहिले. त्यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही. *तात्पर्य :- ईश्वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment