✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/08/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- *१९३७-'टोयोटा मोटर्स' ही स्वतंत्र कंपनी बनली* 💥 जन्म :- ◆१९६६-प्रिया दत्त,लोकसभा खासदार. ◆ १९२८ - एम. जी. के. मेनन, भारतीय पदार्थवैज्ञानिक. 💥 मृत्यू :- ◆१९६९ - रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत. ◆ २००१ - व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार. ◆१६६७-मिर्झा राजे जयसिंग *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मोदी सरकारचा बिग प्लॅन, पुढील 10 वर्षात देशातील 50 लाख हेक्टर नापीक जमीन होणार सुपीक* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *ट्रॅफिकचे नवीन नियम 01 सप्टेंबरपासून होणार लागू, हेल्मेट न वापरल्यास रद्द होणार लायसन्स* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर एस धामी यांनी फ्लाइंग युनिटच्या पहिल्या महिला फ्लाइट कमांडर ठरण्याचा मिळविला मान, महत्वाची जबाबदारी मिळालेल्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई- विनाअनुदानित शिक्षकांचे सुरू असलेल्या आझाद मैदानावरील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण मिळालं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आक्रमक झालेल्या शिक्षकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर आमदार विक्रम काळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आंदोलनस्थळी जाऊन शिक्षकांना दिला पाठिंबा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *डेहराडून : देशाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कंचन चौधरी भट्टाचार्य यांचे निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *नवी दिल्ली : येथील फिरोजशहा कोटला मैदान आत्ता अरुण जेटली स्टेडियम या नावाने ओळखले जाणार, दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ वरील बुलेटीनची ऑडिओ 📢* ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे. https://b.sharechat.com/uKQAMkRzvZ ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय क्रीडा दिवस - 29 ऑगस्ट* https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_27.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *एन्फ्लुएंझा (फ्लू, बर्डफ्लू, स्वाइन फ्लू) म्हणजे काय ?* 📙 'फ्लू' या नावाने आपण याला ओळखतो. हा अति-संसर्गजन्य असा आजार आहे. जगाच्या पाठीवर अनेकवेळा या आजाराने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेली काही दशके प्रतिजैवक औषधे उपलब्ध झाल्याने या आजारातून गंभीर स्वरूप धारण करणाऱ्या अन्य उपद्रवांवर जरासा ताबा आपण मिळवला आहे, एवढेच. मात्र फ्लूवर आजही नेमके औषध उपलब्ध नाही. त्याचा प्रतिबंध करणारी लस शोधण्याचे अनेक प्रयत्न निरुपयोगी ठरलेले आहेत; कारण ज्या विषाणूमुळे हा आजार होतो, त्याच्या असंख्य प्रजाती अस्तित्वात असल्याने व त्यांतही सतत नवीन भर पडत असल्याने प्रतिबंधक लस तयार करून तिचा उपयोग होत नाही. फ्लूची साथ एखाद्या प्रदेशात पसरली की, अक्षरश: घराघरांतून आलटूनपालटून प्रत्येकाचा आजाराशी संबंध येतोच. सारे घर फ्लूने भेटले आहे, अशीही उदाहरणे जुन्या काळात भरपूर आहेत. सर्दी, पडसे, नाक गळणे, खोकला, तीव्र डोकेदुखी, सर्वांग दुखणे, अतिशय थकवा, भूक मंदावणे, ताप ही प्रमुख लक्षणे या आजारात दिसतात. मात्र सर्दी, पडसे जसे पटकन बरे होते तसे न होता आजार गेला तरी थकवा खूप दिवस राहतो. प्रत्यक्ष फ्लू धोकादायक नसून त्या विषाणूंच्या प्रादुर्भावानंतर श्वासनलिका, फुप्फुसे, त्यांची आवरणे यांमध्ये आलेल्या दुर्बलतेचा फायदा घेऊन अन्य जंतूंचा प्रवेश होतो. त्यातून न्युमोनिया, ब्राँकायटिस, प्लुरसी यांसारख्या गंभीर आजारात रूपांतर होते. गेल्या शतकात १९१८ साली सुरू झालेल्या फ्लूच्या साथीमध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे. भारतात १९५७ साली फ्लूची शेवटची मोठी साथ येऊन गेली. फ्लुवरचे उपचार व निदान यांसाठी शक्यतो डॉक्टरी सल्ला घेतलेला बरा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे साथ नसताना फ्लूचे निदान करणे तज्ज्ञ डॉक्टरांचे काम बनते. साथीच्या वेळी रुग्ण पटकन लक्षात येतो. पण अन्यथा किरकोळ लक्षणांमुळे आजाराकडे दुर्लक्ष होऊ शकते. विश्रांती, पोषक आहार, वेदनाशामक औषधे, भरपूर पेयद्रव्ये यांचा वापर या आजाराच्या उपचारात आवश्यक ठरतो. नंतरचा थकवा व दौर्बल्यावर शक्तिवर्धक औषधे, प्रथिनांचा पूरक वापर उपयोगी पडतो. सध्या गेली काही वर्षे आपण ऐकत असलेला 'बर्ड फ्लू' हा आजार नामसाधर्म्याने सारखाच असला व तोही विषाणूजन्य असला, तरी त्याचा प्रादुर्भाव मुख्यतः कोंबड्या व पक्षी यांच्यात होतो. क्वचितच माणसांना त्याची लागण होते. त्यावेळी फुप्फुसदाह व तीव्र ताप ही लक्षणे माणसात दिसतात. अर्थात पक्षी हाताळताना वा त्यांची विल्हेवाट लावताना प्रतिबंधक काळजी आवश्यक ठरते. नाक तोंड झाकणारे मास्क व हातमोजे गरजेचे ठरतात. पक्षांमध्ये होणारा हा आजार फार झपाट्याने पसरतो. खुराड्यातील सर्व पक्षी याला पटकन बळी पडू शकतात. मात्र अशी कोंबडी वा पक्षी खाण्यायोग्य राहत नाहीत. त्यामुळे बर्डफ्लुचा प्रादुर्भाव झाल्यास त्या भागातील सर्व पक्षी नष्ट करणे - मुख्यतः खुराड्यातील व पाळीव - हाच एक प्रतिबंधक उपाय ठरतो. त्यांची जाळून वा खोल जमिनीत गाडून विल्हेवाट लावावी लागते. भारतात २००६ साली या रोगाने कुक्कुट- पालनाच्या व्यवसायाला फार मोठा तडाखा दिला आहे. मात्र याच काळात बर्डफ्ल्यूने आजारी झालेल्या माणसांची संख्या जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे, हेही ध्यानात ठेवायला हरकत नाही. 'स्वाईन फ्ल्यू' या नावाने २००९ साली जगभर धुमाकूळ घातलेल्या आजाराची मेक्सिकोमध्ये सुरुवात झाली. साऱ्या जगभर त्याचा विलक्षण वेगाने प्रसार झाला. फ्लुच्या विषाणूतील H1N1 या एका जातीने हा आजार होतो. फ्लूसारखी अन्य लक्षणे असली, तरी सुमारे एक टक्का रुग्णांत जुलाब, उलट्या याही सुरू होतात. एक हजारांत चार रुग्ण दगावत असल्याने ही साथ गंभीर मानली गेली आहे. मात्र टॅमिफ्लू औषधाचा वापर केल्यास स्वाईन फ्लूची तीव्रता खूप कमी होते, असेही लक्षात आले आहे. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ चिंता पाहुणा म्हणून येते आणि लवकरच मालक बनून राहते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *श्वसनासाठी आपण कोणता वायू घेतो ?* ऑक्सिजन 2) *ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी होतात ?* 4 3) *शरीराच्या हालचालीवर कोण नियंत्रण ठेवतो ?* मेंदू 4) *कथकली हे कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?* केरळ 5) *गौतम बुद्धाची जन्मभूमी कोणती ?* लुम्बिनी ( नेपाळ ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुनीता महाडिक, मुंबई ● डी एस पी पाटील ● गणेश घुले ● संजय बंटी पाटील ● चंद्रकांत रामदिनवार ● अशोक मामीडवार ● लक्ष्मण कामशेट्टी ● तिरुपती अंगरोड ● साईनाथ गोणारकर ● आनंद आवरे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चित्ताचं चैतन्य चेतलं की ज्ञानसूर्याचा साक्षात्कार होतो. तो काही विवेकी संतासह विचारवंतानाही होतो. विवेकी संत माणसा-माणसात माणुसकीचे अर्थात दया-प्रेम-करूणेचे पूल बांधत असतात. परोपकारातून परमेश्वराशी त्यांचं नातं जुळवत असतात. दुसरा एक संत प्रकार आहे लहरीबाबांचा, सतत मौनाचं नाटक करून हजारोंना नादी लावण्यात कुशल असलेल्या बुवांचा, प्रवचनाचं संमोहन वापरून जणू तो ईश्वर मलाच कळला आणि माझ्यावरच भाळला असा बनाव निर्माण करणा-यांचा. या लोकांच्या चरणांशी सर्व सुखं शयण असतात. तिथं कनक-कांतांचा सुकाळ असतो. कित्येक मती मारलेले भक्त आपल्या लेकीसुना या 'पहुंचे हुए' लोकांच्या नादी लावतात. सत्तेतील 'सत्ते' आणि राजकारणातील 'पत्ते'ही त्यांच्या आशीर्वादासाठी टपून असतात.* *कृष्णकथा-रामकथा कानाशी बिलगल्यानं आपण ईश्वरप्रिय होतो असा कुणाचा गोड गैरसमज असेल तर तो भाबडेपणा आहे. ईश्वर समजण्यासाठी पराकोटीचा त्याग आणि कष्ट उपसावे लागतात. कबीर-ज्ञानोबा-तुकोबाइतकं आत्मबोधन अनुभवावं लागतं. हा मार्ग जनसामान्यांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच ते कर्मकांडांच्या थोतांडाला ब्रम्हांडाचा साक्षात्कार समजतात. ईश्वर कुणालाही दर्शन देत नाही. सूर्यकिरणांनी सूर्याचाच शोध घेण्यासारखा तो अज्ञानी प्रकार आहे. म्हणूनच रोज काही क्षण आत्मशोधात व्यतीत करीत राहिल्यानं कुठल्या तरी क्षणी आपण आपल्या सत्य-असत्यासह आत्मदर्पणापुढे येतोच!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *विंदा करंदीकर लढवय्या जीवनाचं* *चित्र रंगावतांना म्हणतात,* *असे जगावे छाताडावर,आव्हानांचे लावून अत्तर।* *नजर रोखुनी नजरेमध्ये,आयुष्याला* *द्यावे उत्तर* । *खरंच आहे,जीवन जगतांना अनेक* *संकटे येत असतात,त्यांना* *जर घाबरलं तर ते* *पिच्छा सोडत नाही.ते* *रडणाऱ्याला भीक घालत नाहीत,तर* *ती लढणाऱ्याला* *घाबरून पळून जातात हेच विंदा* *सांगतात.* *आजपर्यंत आपण तेच केले,भूत* *म्हटलं की पळालो,पण* *एकदा तरी त्या* *समस्यारूपी भूताकडे वळून डोळे* *वटारून बघा तर ,काय* *चमत्कार होतो, अहो भूत तर* *जाऊद्या, साक्षात यशश्री खेचून* *आणल्याचा अनुभव आल्याशिवाय* *राहणार नाही,ही* *खात्री देतो.* N *मग बघताय ना संकटाकडे डोळे* *वटारून,बघाच* *एकदा,जगण्यात मजा येईल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* *इगतपुरी, नाशिक* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण जर आपल्या हाताने मुठभर रेती घेतली तर ती मुठभर रेती काही वेळच राहील.त्यानंतर मुठीत असलेली रेती हळूहळू मुठीतून बाहेर निसटून जाईल आणि त्यानंतर बाकीची हाताला चिकटून राहील.जी चिकटून राहते ते माणसाच्या दु:खासारखे समजायचे.कारण सुखाचे दिवस मुठीतल्या रेतीसारखे निसटून जाणारे असतात तर दु:ख मुठीत चिकटून राहणा-या रेतीसारखे हृदयाच्या कप्प्यात घट्ट करून राहतात आणि सतत ते आपल्या मनाला आठवण करून देतात.मग त्यांचे पडसाद आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतात.अशावेळी झालेल्या दु:खाचे मंथन करुन त्यातून सुख शोधून काढून जीवनाला आनंदाने जगण्यासाठी प्रोत्साहन द्यायला शिकले पाहिजे.दु:खाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याची खरी किंमत* *एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी किंमत काय असते हो?"* *आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले "ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली. तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली - " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. " पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - " अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार ." आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला . त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - *"मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती, हेतू आणि कुवतीनुसारच करणार."* *त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते.* *स्वतःचा आदर करा.* *इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका.कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.* *तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे.* *आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू....* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment