✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/08/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆ २००४ - नागपूरमध्ये संतापलेल्या स्त्रियांनी अक्कू यादव या गुंडाला न्यायालयाच्या आवारात घेरुन ठार मारले. ◆ २००४ - जगातील एक सर्वात पुरातन संस्कृती असलेल्या ग्रीसच्या राजधानी अथेन्समध्ये शतकातील पहिल्या ऑलिंपिकला जल्लोषात प्रारंभ झाला. 💥 जन्म :- ◆ १८९० - त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी. ◆ १८९८ - आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक. ◆ १८९८ - विश्राम बेडेकर, मराठी साहित्यिक. ◆ १९२३ - पंडित काशिनाथशास्त्री जोशी, भागवत अभ्यासक, प्रवचनकार. 💥 मृत्यू :- ◆१७९५ - अहिल्याबाई होळकर. ◆ १९८० - लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचे निधन. 'प्रथमपुरुषी एकवचनी' हे त्यांचे आत्मचरित्र. 'रक्त आणि अश्रू' हा लेखसंग्रह, 'विषकन्या', 'स्वामीनी', 'महाराणी पह्यिमी' ही त्यांची नाटके गाजली. ◆१९८८ - व दिग्दर्शक गजानन जागीरदार यांचे निधन. पुण्याच्या चित्रपट आणि दूरदर्शन प्रशिक्षण संस्थेचे ते पहिले प्राचार्य होते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9404277298 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूर आणि सांगलीतील पूर ओसरण्यास सुरुवात, आठवड्याभराने पुणे-बंगळुरु महामार्ग सुरु, पेट्रोल पंपावर कोल्हापूरकरांची भलीमोठी रांग* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *देशभरात बकरी ईद उत्साहात, सांगली-कोल्हापुरातील मुस्लीम बांधवांकडूव साध्या पद्धतीने ईद साजरी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *काश्मीरातील कलम 370 रद्द झाल्यानंतर वाघा-अटारी सीमेवर आज ईदच्या दिवशी पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय जवानांकडील मिठाई नाकारली, भारत-बांग्लादेश सीमेवर मात्र जल्लोष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *रेल्वे रुळावर दरड कोसळल्याने बंद करण्यात आलेली मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्ववत होईपर्यंत या मार्गावर एसटीच्या ज्यादा बसेस धावणार, प्रवाशांची गैरसौय टाळण्यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *येत्या 5 सप्टेंबर पासून जिओ गिगा फायबर सेवा होणार लाँच, ब्रॉडबँड इंटरनेट सोबतच सेट टॉप बॉक्सद्वारे टीव्ही चॅनलचाही आनंद घेता येणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *चांद्रयान-2 14 ऑगस्टला पहाटे साडे तीन वाजता पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राकडे झेपावणार; इस्त्रोची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईसनुसार 59 धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं कारकिर्दीतले 42 वे शतक हे आजच्या खेळाचे वैशिष्ट्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेळेचे नियोजन* वेळ ही एक अशी वस्तू आहे जे की कोणासाठी ही थांबत नाही. मग तो श्रीमंत असो की गरीब सर्वांसाठी वेळ सारखाच असतो. जो वेळेची कदर करतो वेळ त्याची कदर करते. जो वेळेला ओळखतो त्याला नंतर वेळ ओळखते. गेलेली वेळ किती ही पैसा खर्च केला तरी परत मिळत नाही. म्हणून...... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अँपिअर म्हणजे काय ?* 📙 विद्युतप्रवाह तारेतून वाहत असताना तो मोजण्याचे माप म्हणजे अॅम्पिअर (Ampere) होय. हे मोजण्याच्या साधनाला अॅमिटर (Ammeter) असे म्हणतात. फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे ऍम्पीअर याने वीजप्रवाह कसा मोजायचा, ते शोधून काढले. त्याच्याच नावाने हे मोजमाप मग प्रचलित झाले आहे. विद्युत प्रवाह वाहतो म्हणजे तारेतील इलेक्ट्रॉन एका दिशेने वाहत असतात. विजेचा दिवा लावला असताना त्याच्या तारेतून एका सेकंदाला तीन मिलियन मिलियन मिलियन इतके इलेक्ट्रॉन वाहतात. एक मिलियन म्हणजे एक दशलक्ष. आकडा बरोबर लिहिण्यासाठीसुद्धा मिनिटभर लागेल. मग हे सारे सोप्या शब्दात व्यक्त करण्यासाठी आपण विद्युतप्रवाह अँपिअरध्ये मोजतो. याचा उच्चार थोडक्यात अँप असाही करतात. एक अँपिअर म्हणजे दर सेकंदाला ६ मिलियन मिलियन मिलियन इलेक्ट्रॉनचा प्रवाह होय. अॅमिटरने जेव्हा विद्युतप्रवाह मोजतात, तेव्हा हा अॅमिटर विजेच्या 'सर्किट'मध्ये जोडला जातो. त्यावरचा काटा किती वीजप्रवाह वापरला जात आहे, हे तात्काळ दर्शवतो. घरगुती वापरासाठी आपण अर्धा ते पाच अँपिअरचा वीजप्रवाह वापरत असतो. इस्त्री, विजेची शेगडी, पाणी तापवायचा गिझर यांन जास्त वीजप्रवाह लागतो. तर विजेचे दिवे, ट्यूबलाइट, पंखे यांना जेमतेम अर्धा ते एक अँपिअरचा प्रवाह लागतो. विजेचा प्रवाह जितका जास्त लागणार असेल तितकी विजेच्या तारांची जाडी वाढवावी लागते. एखाद्या कारखान्याच्या विजेच्या तारा घरातील तारांपेक्षा किती जाड असतात, ते लक्ष देऊन बघण्यासारखे असते. वीजप्रवाहाचा एक महत्त्वाचा गुणधर्म हा की त्यामुळे चुंबकसूची हलते म्हणजे चुंबक क्षेत्र निर्माण होते. दुसरा महत्त्वाचा गुणधर्म हा की वीजप्रवाहाने उष्णता निर्माण होते. जितका वीजप्रवाह जास्त तितकी त्याची उष्णता निर्माण करण्याची शक्ती वाढत जाते. वेल्डिंग मशीनमधील पन्नास ते तीनशे ॲम्पिअरचा प्रवाह धातु वितळवण्याइतकी सुद्धा उष्णता निर्माण करू शकतो. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *“ मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते. ”* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोठे आहे ?* नाशिक 2) *माळढोक पक्षी अभयारण्य कोठे आहे ?* सोलापूर 3) *प्रसिध्द समाजसेवक अण्णा हजारे यांचे जन्मगाव कोणते ?* राळेगणसिद्धी ( अहमदनगर ) 4) *राजमाता जिजाऊ यांचे जन्मगाव कोणते ?* सिंदखेडराजा ( बुलढाणा ) 5) *शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ केव्हा घेतली ?* 1646 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● सुयोग पेनकर ● प्रशांत सब्बनवार ● योगेश येवतीकर ● नरेंदर रेड्डी ● गणेश धाकतोडे ● नागेश गुर्जलवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.* *याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील, विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रानो* *अाकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही ते माहीत नाही... परंतु* *पृथ्वीवरील माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात... *जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी* *किंवा मोठेपणा साठी* *जवळची माणसे तोडतात*... *असे लोक छोट्या छोटया लुटूपुटूच्या लढाया जिंकतील* .... *पण अंतिम युद्ध कधीच जिंकू शकत नाहीत*. *कारण ..घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे* *बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो*.. *म्हणून* *जोडता नाही आले तर जोडू* *नका*. **पण आपल्या लोकांना तोडू नका* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कर्णाची दानशुरता* कर्ण दुर्योधनाचा खास मित्र होता. तो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने जाऊ देत नव्हता. एकदाचा हा प्रसंग एकदा भगवान श्रीकृष्ण अणि अर्जुन गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता कर्णाच्या दानशूरपणाविषयी बोलणे चालू झाले. कृष्णाने कर्णाच्या दानशूरतेचे कौतुक केले. श्रीकृष्ण म्हणाला, ''कर्णाइतकी उदार व्यक्ती दुसरी कुणीही नाही.'' या बोलण्याचे अर्जुनाला जरा आश्चर्यच वाटले. अर्जुन म्हणाला, ''श्रीकृष्णा, धर्मराजही दानशूर आहे.'' सर्वांत अधिक दानशूर कोण आहे ? यावर मग त्यांची चर्चा चालू झाली. श्रीकृष्ण नेहमीप्रमाणेच याही गोष्टीची प्रचीती आणून देण्यासाठी सिद्ध होता. श्रीकृष्ण म्हणाला, ''ठीक आहे, उद्याच आपण धर्मराज आणि कर्ण दोघांकडे जाऊन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकू.'' पावसाळयाचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी उजाडताच श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ''राजधानीत एक महत्त्वाचे बांधकाम अचानक करावयाचे आहे. त्यासाठी लाकडे हवी आहेत.'' धर्मराजाने आपल्या सेवकांना बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचे लाकूड आणण्याची आज्ञा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ झाला, तरी सेवक काही परतले नाहीत. बऱ्याच वेळाने सेवक परत आले, तेही खाली मान घालून. धर्मराज म्हणाला, ''काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत का ?'' सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेलीी होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नव्हते. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितले. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले. त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितले. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ण म्हणाला, "एवढेच ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखे काय आहे ?'' असे म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडे आणण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की, पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली झाल्याने लाकडे मिळू शकली नाहीत. सेवकांचे बोलणे ऐकताक्षणी कर्ण आत गेला. बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही, असे पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेले होते. आता त्यांना कर्णाला वेळ का लागला, याचे कारण उमगले. अर्जुनाने विचारले, ''कर्णा, एवढ्यासाठी तू तुझे चंदनाचे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलेस ?'' त्यावर कर्ण उद्गारला, '' या वस्तू काय पुन्हा बनवता येतील; पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा, यासारखे दु:ख कोणते असेल ?'' पुढे याच कर्णाने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली आणि आपल्या त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण इतिहासात ठेवले. मुलांनो, दानशूर कर्णाची गोष्ट आपण पाहिली. आपल्याला आपली छोटीशी वस्तूही देण्याची इच्छा नसते. येथे तर त्याने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली.केवढी ही महानता दानशुरता. आपल्यालाही आपल्या वस्तूंचा त्याग करता आला पाहिजे. आपणही समाजाचे देणे लागतो ह्या हेतूने जगावे.. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment