✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/12/2019 वार - सोमवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~ http://fmbuletin2019.blogspot.com/2019/12/30-2019.html •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रिझाल दिन - फिलिपाईन्स* 💥 ठळक घडामोडी :- ● १८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह. ● १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला. ● १९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर. ● १९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार. ● २००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार. 💥 जन्म :- ● १८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म. ● १८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी. ● १८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक. 💥 मृत्यू :- ● १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ. ● १९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी. ● १९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर. ● २००१ - हर्षद महेता, भारतीय शेअर दलाल. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *ठाकरे सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार, अजित पवार, धनंजय मुंडे, आव्हाड, अशोक चव्हाण शपथ घेण्याची शक्यता, तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या दोन तर आरजेडीच्या एका नेत्याने घेतली शपथ, राहुल गांधी, ममता बॅनर्जींसह अनेक नेते शपथविधीला उपस्थित* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सन्मान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, यावेळी बच्चन कुटुंबीयांसह दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अर्ध्या देशात गोठवणारी थंडी, दिल्लीसह सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी तर दिल्लीतील अनेक भागात तापमानाचा पारा 2 अंश सेल्सिअसपेक्षा खाली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *खिलाडी अक्षय कुमार आणि करीनाचा 'गुड न्यूज' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्या दिवशी 17.56 कोटींचा गल्ला तर दोन दिवसांत 39.34 कोटींची कमाई* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेगवान गोलंदाज पीटर सिडलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी ड्रेसिंग रूममध्ये सहकाऱ्यांसमोर सिडलने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात चिवट वृत्तीच्या इंग्लंडला १०७ धावांनी केले पराभूत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गरज तेथे मदत करा* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_8.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *किरणोपचार म्हणजे काय ?* 📙 ******************************* अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात. क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो. गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात. ~ वपु काळे | काही खरं काही खोटं *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला ?* लॉर्ड मेकॅले 2) *भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता ?* भारतरत्न 3) *भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता ?* परमवीर चक्र 4) *स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या देशाने बहाल केला ?* न्यूझीलंड 5) *मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?* सेनापती बापट *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती गटसाधन केंद्र, धर्माबाद 👤 मारोती छपरे 👤 निवृत्ती लोखंडे 👤 राजेश्वर रामपुरे 👤 साहेबराव कांबळे 👤 आनंद यडपालवार 👤 संजय भोसीकर 👤 भारत पाटील सावळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.* *आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *_मित्रांनो,_* *सदाचार हा माणसाचा खरा अलंकार आहे.* *होठोपे सच्चाई रहती है।* *जहाँ दिलमे सफाई होती है।* *हम उस देशके वासीं है,जिस देशमे* *गंगा बहती है।* *अस असलं तरी चेहरा न देखो दिलको देखो।* *चेहरे ने लाखोंको लुटा।* *दिल सच्चा और चेहरा झुटा।* *हे पण तितकेच महत्वाचे आणि खरे* *आहे.* *मनुष्याचं चारित्र्य कमकुवत करणारे दोन मुख्य अवगुण म्हणजे--लोभ* *आणि असत्य.मोठमोठ्या गोष्टीविषयी* *असणारा लोभ पटकन लक्षात येतो.* *पण सूक्ष्म स्तरावर असणारा लोभ लगेच लक्षात येत नाही.* *या छोट्या आणि सूक्ष्म लालसा म्हणजे,समाजामध्ये,मित्रांमध्ये* *लोकप्रिय होण्याची इच्छा, इतरांच्या तोंडून आपली स्तुती व्हावी ही* *अपेक्षा, आपण जसे आहोत, त्यापेक्षाही अधिक सुंदर* *दिसावं,कष्टाविना सुखसुविधा प्राप्त व्हाव्यात अशा इच्छा.* *या लालसाच माणसाला अपराध करण्यासाठी प्रवृत्त करतात. तसेच* *खोट बोलायला भाग पाडतात. त्यामुळे आपल्या शब्दांची ताकद नाहीशी होते.* *झूठे इंसान की ऊंची आवाज सच्चे इंसान को खामोश कर देती हैं l परंतु* *सच्चे इंसान की खामोशी झूठे इंसान की बुनियाद हिला देती है l* *सत्य परेशान होता है, पराजित नही।* *हे लक्षात ठेवून मार्गक्रमण करावे.* *खरा माणूस पहायला मिळेल.* *अशोक कुमावत, नाशिक* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९० 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकार आणि गर्व असू नये.* रामकृष्ण परमहंस आपल भक्तांसमोर प्रवचन देत होते. ते म्हणत होते, हे पहा, तुमच्यासमोर मी बसलेलो आहे, हे तुम्ही पाहता. पण मी एखादे वस्त्र माझसमोर धरले, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तथापि, पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याजवळ आहे. कपडय़ाआड असल्याने तुमच्या दृष्टीस मात्र पडू शकणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने अदृश्य होईन. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या-माझ्या सर्वांच्या जवळ असतो. परंतु अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर लहानसा कापडाचा तुकडा जरी धरला, तरी समोरचा मोठा पर्वत दृष्टीला अगोचर होईल. तात्पर्यं - अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही, तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपणाला होणार नाही. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment