✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 21/12/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 घडामोडी :- ● १६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय. ● १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत. ● १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात. ● १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार. 💥 जन्म :- ● १९६३- गोविंदा,हिंदी चित्रपट अभिनेता ● १९५९-कृष्णम्मचारी श्रीकांत,भारतीय क्रिकेटपटू ● १९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती. ● १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश 💥 मृत्यू :- ● १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स ● १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भूकंपाच्या झटक्याने उत्तर भारत हादरला, काश्मीरमध्ये भूकंपाची तीव्रता अधिक, अफगाणिस्तानच्या काबूल उत्तर पूर्वमध्ये भूकंपाचे केंद्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *अजित पवार होणार उपमुख्यमंत्री, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं असताना उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावावर खा. संजय राऊत यांनी शिक्कामोर्तबच केले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *विठुरायाच्या चरणावरील हार आता भाविकांच्या गळ्यात, हारांमुळे रोज किमान 500 किलोचे निर्माल्य तयार होत होते . यात्रा काळात हे निर्माल्य हजारो टनात तयार होत असल्याने कचरा ही मंदिर प्रशासनासाठी डोकेदुखी बनू लागली होती. यावर मार्ग काढण्यासाठी मंदिर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला, 24 डिसेंबरला होणार मंत्रीमंडळ विस्तार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात महाराष्ट्रात जागोजागी आंदोलन, किरकोळ अपवाद वगळता शांततेत निदर्शने, काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे, औरंगाबादमध्ये एमआयएमआयमचा विराट मोर्चा, देशभरात तीव्र पडसाद * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *राज्यात 2018 पर्यंतच्या 66 हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर, उपयोगिता (युटिलिटी) प्रमाणपत्रांच्या संख्येमध्ये तफावत असल्याचं कॅगचं निरीक्षण* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *इंटरनेट शटडाऊन करण्यात भारताचा पहिला नंबर, इंटरनेट शटडाऊन ट्रॅकर या ऑनलाईन पोर्टलच्या माहितीनुसार या वर्षात 95 वेळा इंटरनेट शटडाऊन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 फलक लेखन आणि वाचन ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उपक्रम :- वाचू आनंदे* इयत्ता पहिली ते आठवीसाठी उतारा खालील लिंकवर उपलब्ध आहे. http://projectforchild.blogspot.com/2019/12/21-2019.html उपक्रम वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *सर्व सजीव पेशींनी बनलेले असतात ही कल्पना प्रथमतः कोणी मांडली ?* श्वादन व श्वान 2) *कोणार्क हे प्रसिद्ध सुर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे ?* ओडिसा 3) *महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत ?* मा.जयंत पाटील 4) *महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री कोण आहेत ?* मा. एकनाथ शिंदे 5) *कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेत मूलभूत कर्तव्याची तरतूद केली आहे ?* 42 वी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मी जैपाल ठाकूर, गोंदिया 👤 मन्मथ खंकरे 👤 श्रीमती माणिक नागावे 👤 गजानन गायकवाड 👤 संभाजी तोटेवाड 👤 जयश्री सोनटक्के *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?* *कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते."साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *मला माणूस हवाय,मला माणूस* *हवाय।* *देताय ना शोधून ,नाही,राग मानू नका* *गर्दीत हरवलाय म्हणून म्हटलो.* *मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं...* *की त्याचा गंध मनाला... शरीराला प्रसन्न करून जातो..* *सहवासातील माणसाचं देखील असंच असतं...* *काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात...* *आपली होऊन जातात...* *तर काही कितीही सहवासात राहिली तरी आतून ओढ नसतेच...* *चेहरा बघण्यापेक्षा...* *नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं...* *शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल तर...* *त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाण वाटतं....* *शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते* *तर मनाची सुंदरता,* *टिकून राहाते शेवटपर्यंत...* *शरीराला वय असतं....* *मनाला ते कधीच नसतं...* *शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो...* *शरीर तर असतं निमित्तमात्र...* *माणसाच्या स्वभावात गोडवा...* *शालीनता...* *प्रामाणिकपणा...* *आणि विनयशीलता असेल...* *तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली...* *तरी ती हवीहवीशीच वाटते...* *म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही,* *देवघरातील समईच्या तेजापुढं* *आपण नतमस्तक होतो...* *आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर...* *त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं...!* *आपल्या आवडत्या माणसाचं...* *आपल्यासोबत असणं...* *ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...* *ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही...* *आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ?* *नशिबानं कधी भेटलीच...* *तर हळुवार जतन करून ठेवावीत...* *कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील...?* *माणूस बनुया,माणस जपुया,* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०. 📚📝📚📝📚📝📚📝📚📝📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राजा आणि संत* एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली.तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले,'' तू स्वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्यावर म्हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे.'' राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले. तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी असा देखावा करावा लागतो. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जनुकांचा नकाशा व जैविक रेणू* १९५३ साली डॉक्टर वॅटसन आणि क्रिक यांनी डीएनएची मुलभूत आण्विक रचना जगासमोर मांडली. त्यानंतरची सुमारे ५० वर्षे मानवी जनुकांचा शोध घेण्यात गेली. अत्यंत चिकाटीचे असे हे काम वैज्ञानिकांच्या आवाक्यात आले, आहे असे २६ जून २००० रोजी अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी जाहीर केले. हा दिवस शास्त्रज्ञांनी *'मानवी उत्क्रांतीचा सोनेरी अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस'* म्हणून साजरा केला. हे सारे काय आहे ? माणसाच्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. प्रत्येक पेशीत सजीवातल्या 'प्राणांचे' अस्तित्व असते. प्रत्येक पेशी तेच तेच अन्न मिळवते व बिनबोभाट कामही करत राहते. प्रत्येक पेशीचे हे काम शिस्तीत आणि इतरांच्या जोडीने जनुकांच्या इशाऱ्यावर चाललेले असते, ज्या पेशीत विभाजनाची क्षमता असते, त्यांच्यातील केंद्रक हा गोलाकार भाग असतो. सूक्ष्म नळ्या व पापुद्रे यांनी बनवलेली कोशिकांगे पेशीत असतात. यांना 'ऑर्गॅनेल्स' म्हणतात. त्यांपैकीच एक म्हणजे सूत्रकणिका म्हणजे मायटोकॉंड्रिया. केंद्रक व सूत्रकणिकेत आपली जनुके म्हणजेच डीएनएचे (डीऑक्सि रायबोन्यूक्लिक अॅसिड) विशिष्ट तुकडे एका पातळशा पडद्याआड बंदिस्त असतात. शरीरातल्या सगळ्या पेशींच्या केंद्रांमध्ये डीएनएचा रेणू सारखाच असला, तरी तो ज्या पेशीत असतो, जी पेशी घडवणार असते, त्यानुसार त्याचे गुणधर्म प्रकट होतात. गर्भावस्थेच्या अगदी प्राथमिक स्थितीतच अवयवांचे अस्तित्व जाणवयाच्या आधीच साऱ्या पेशींनी आपापसात कोण बनायचे हे ठरवलेले असते. त्या पेशींची गर्भातली जागा आणि नियंत्रक जनुकांचा प्रभाव यानुसार पेशी ऊती अवयव संस्था शरीर बनते. त्यांमध्ये काही जनुके मुख्य बटणाची भूमिका बजावतात, तर काही विशिष्ट भागाच्या बटणाची. अशा पद्धतीत गर्भावस्थेपासून व त्यानंतरही असंख्य जनुकीय बदल नियंत्रितरित्या होतात व शरीराचे संवर्धन होत राहते. पेशींचे विभाजन होताना त्यांच्यातील डीएनए रेणूसुद्धा आपल्या दोन प्रती बनवतो. त्यातून पहिल्या पेशीचे सारे गुणधर्म दुसऱ्या पेशीकडे पोहोचतात. डीएनएचे घटक शरीररचनेतील अत्यावश्यक प्रतीने बनवतात. डीएनएमधील (एटीजीसी) अॅडीनाईड, थायमाइन, ग्वानाइन, सायटोसिन या चार रासायनिक घटकांच्या विशिष्ट क्रमवारीत आनुवंशिकतेचा सारा अर्थ सामावलेला असतो. अत्यावश्यक अमिनो अॅसिड अशा प्रथिनांचा विशिष्ट क्रम विशिष्ट प्रथिन बनवतो. हा बदलला वा चुकला, तर त्यातून बनणारे प्रथिन, पेशी, अवयव हे सारे दिसण्यात, वागण्यात बदलू शकते. डीएनएचा रेणू इतर काही घटकांबरोबर लांबलचक दोऱ्याच्या गुंडाळीसारखा मुडपून, दुमडून वेढे घेत रंगसूत्रांच्या (क्रोमोझोम) स्वरूपात केंद्रात आढळतो. माणसाच्या पेशीत प्रत्येकी ४६ रंगसूत्रे असतात. त्यातील २३ आईकडून तर २३ वडिलांकडून घेतल्यावर दोघांचीही जनुके मुलांच्या व मुलीच्या पेशीत येतात. अशाप्रकारे प्रत्येक पेशीतील ४६ रंगसूत्रे व त्यावरची २५ ते २७ हजार जनुके या साऱ्याला 'जीनोम' असे म्हटले जाते. समजा पुस्तकातील अक्षरांची उपमा द्यायची ठरवली तर हे २५ हजार अक्षरांचे पुस्तकच बनते. अक्षरांचा क्रम बदलला, तर अर्थ बदलतो, अर्थ बदलला तर अनर्थ होतो. म्हणजेच पेशीपासून बनलेले अवयव कमी प्रतीचे, चुकीचे काम करू लागतात. या बदलाला 'म्युटेशन' असे म्हणतात. ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये म्हणजेच जनुकांच्या नकाशामध्ये या प्रत्येक अक्षराची जागा त्याचे काम व त्याचे निरोगी अवस्थेतील सर्वसाधारण क्रम नोंदवला गेला आहे. यात बदल आढळला, तर तो डीएनएच्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळेत शोधता येतो. त्यातून आजाराचे, दोषांचे स्वरूप कळते. डीएनए चाचणी केल्यास अनुवंशिकतेच्या म्हणजेच जनुकांच्या वरून मुलाचे वडील व आई यांची निश्चिती करणे आता शक्य झाले आहे. हैदराबाद येथील प्रयोगशाळेत ही सोय झाली आहे. जनुकांचा नकाशा म्हणजे त्या त्या जिवांसंबंधातील एकत्रित संकलित संपूर्ण माहिती. कुठेही जपून ठेवता येण्याजोगी. जैविक रेणूंची बनलेली डीएनए व आरएनए म्हणजेच डीऑक्सीरायबो न्यूक्लिक अॅसिड व रायबोन्यूक्लिक अॅसिड हे प्रथिनांच्या साखळीने बनलेली असतात. जीवनाला आवश्यक अशी वीस अमायनो प्रथिने आहेत. याआधी पाहिलेल्या चारांचा (एटीजीसी) यात समावेश होतो. चयापचयाशी संबंधित प्राथमिक गोष्टींवर नियंत्रण व सहभाग हे त्यांचे सततचे काम. अन्नघटकातून आपण रोज त्यांची कमतरता भरून काढत असतो. या विसांपैकी कोणतेही एक कमी पडले, तर विशिष्ट लक्षणे सुरू होतात व आजाराला निमंत्रण मिळते. आरएनएचे काम पेशीतील प्रथिनांचा संचय राखणे हे असते. प्रत्येक जैविक रेणूमध्ये अमायनो घटक (-NH2) समूह व कार्बोक्झिल समूह (-COOH) असे असतात. अमायनो अॅसिडच्या रेणूंच्या साखळीने प्रीथिने बनतात. या साखळीतील छोटेमोठे असंख्य असे हजारांहून जास्त घटक असू शकतात. जी प्रथिने निव्वळ अमायनो अॅसिड बनतात त्यांना साधी सिंपल प्रथिने म्हणतात, तर अन्य बहुतेक कर्बोदके, फाॅस्फेट्स यांच्या बरोबरची संयुगे असतात. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment