✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 12/12/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९८५ - ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक. ● १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला. ● २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी. ● २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी. 💥 जन्म :- ● १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक. ● १९४० - शरद पवार, माजी मुख्यमंत्री ● १९४९ - स्व. गोपीनाथ मुंडे, माजी उपमुख्यमंत्री ● १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, तामिळ अभिनेता. ● १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना. ● १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक. ● १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू. ● २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर, 117 विरुद्ध 92 च्या फरकानं विधेयक मंजूर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *आरेमधील मेट्रो कारशेडसाठी कापण्यात आलेल्या झाडांच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असून ही समिती वित्त विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. समितीमध्ये चार सदस्य असतील. समिती पुढील 15 दिवसात याबाबतचा अहवाल सादर करेल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन 14 दिवस उलटले. पण अजूनही खातेवाटपावरुन महाविकास आघाडीत गोंधळ सुरु असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *समृद्धी महामार्गाला हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव, येत्या तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करणार शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदें यांनी दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्याची केंद्राकडे 15 हजार 558 कोटी रुपयांची जीएसटी थकबाकी, राज्याच्या विकासासाठी हा निधी लवकर मिळावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलं पत्र.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *तीन दशकांपेक्षा जास्त काळ चेन्नईमध्ये निर्वासितांप्रमाणे राहणाऱ्या तामीळ भाषिक श्रीलंकन नागरिकांना भारताचं नागरिकत्त्व प्रदान करण्याची आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी सरकारकडे केली मागणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय अवकाश संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने रिसॅट - 2BR1 उपग्रहाचं केलं यशस्वी प्रक्षेपण, बालाकोटसारख्या मिशनमध्ये मदत मिळणार, या भारतीय उपग्रहासह इस्रोने इस्त्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांच्या नऊ उपग्रहांना अवकाशात पाठवलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *स्थानिक बातमी - नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा अंतर्गत धर्माबाद उमरी आणि नायगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांची एकदिवसीय कार्यप्रेरणा कार्यशाळा शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साहस कथा* सातव्या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्न मोठ्या थाटामाटात झालं. अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/12/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भौतिकशास्त्र* 📙 ********************** विश्व हे पदार्थांनी (Matter) बनले आहे. या पदार्थाचे स्वरूप, उत्पत्ती, बदल, स्थित्यंतरे, त्यांतून निर्माण होणारी ऊर्जा किंवा ऊर्जेचा त्यांच्यावर होणारा परिणाम याबद्दल अभ्यास करावयाचे शास्त्र म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्र वा भौतिकशास्त्र. यातील शास्त्रज्ञ (Physisist) नेमके काय करतो, त्याच्या कामाचा जगाला काही उपयोग आहे वा नाही याबद्दलच अनेक शास्त्रज्ञ साशंक असत. ही शास्त्रशाखा दुर्लक्षित होती, त्या परिस्थितीत अल्बर्ट आइन्स्टाइनपासून खूपच बदल घडत गेले. या बदलांना चक्क या शाखेबद्दलच्या आकर्षणाचे स्वरूप निर्माण झाले, ते अणुविभाजन व अणुस्फोटानंतर. यानंतर मात्र या शाखेत काम करतो आहे, हे सांगणेही मानाचे समजले जाऊ लागले. आज घटकेस भौतिकशास्त्र जवळपास आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबीस व्यापुन आहे. पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे या शास्त्रातील प्राथमिक बाबी या तांत्रिक अभ्यासात (Engineering) जास्त शिकवल्या जातात. व्यवहारात: तो अभ्यास पुरेसा असल्याने केवळ या शास्त्रात रस घेऊन संशोधन करणारे आजही मोजकेच निघतात. उदाहरणार्थ, तेल विहीर खणायची आहे, भूकंपप्रवण भागाचा अभ्यास करावयाचा आहे, अंतराळयान सोडायचे आहे वा रेल्वेमार्ग घालावयचा आहे; तर यांपैकी प्रत्येक प्रकल्पासाठी कित्तेक इंजिनिअर व अन्य तंत्रज्ञ लागतील. पण प्राथमिक पाण्यासाठी जेमतेम एखाद्या भौतिकशास्त्रज्ञास बोलावून त्याचे मत आजमावले की, त्याचे काम कदाचित संपून तो अडगळीत पडेल. नंतरचे सारे काम फक्त तंत्रज्ञ व त्यांची प्रगत यंत्रे यांकरवीच केले जाईल. या स्वरूपाच्या कामाच्या पद्धतीमुळे या जमातीबद्दल सामान्यांच्या मनात खूपच कमी माहिती आढळते. उष्णता, विद्युत, आवाज, प्रकाश, चुंबकीय क्षेत्र, अणुरचना या मुलभुत बाबींचा अभ्यास आजही पुरेसा झाला आहे, असे अनेक शास्त्रज्ञांना वाटत नाही. त्यामुळे याबाबतीत सतत संशोधन चालू असते. पण या संशोधनाचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असल्याने व निष्कर्ष लगेच प्रसिद्ध होत नसल्याने सामान्यांना त्याची फारशी कल्पना येत नाही. काही प्रकल्प तर एवढे महाग व अशक्यप्राय खर्चाचे असतात की, अनेक देशांनी मिळून ते हातात घेतलेले असतात. जिनिव्हा येथील 'युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लियर रिसर्च' ही प्रयोगशाळा असेच एक उद्या उदाहरण सांगता येईल. प्रचंड लांबीच्या निर्वात पोकळीमध्ये भुयारात अणुरचनेवर संशोधन येथे चालू असते. हा खर्च कोणत्याच एका देशाला न परवडणारा असल्याने अनेक देशांनी हा खर्च करून तेथे एकत्रित प्रयोग केले जातात. रसायनशास्त्राचे मुलभूत नियम आता भौतिकशास्त्रातून समजू शकतात. रेणूजीवशास्त्र (Molecular Biology) हे जीवशास्राच्या मुळाशी असलेले शास्त्रादेखील भौतिकशास्त्रातच मोडते. 'जगाच्या उत्पत्तीपासून विनाशापर्यंत प्रत्येक बाबतीतच डोके खुपसून त्याबद्दल छडा लावण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र,' असेही विनोदाने या शास्त्राचे वर्णन करता येईल. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात केशरचे उत्पादन होते ?* जम्मू काश्मीर 2) *कोणत्या वेदांचे स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदीत रूपांतर केले आहे ?* ऋग्वेद व यजुर्वेद 3) *कोणत्या किरणांमुळे त्वचा काळी पडते ?* अल्ट्राव्हायोलेट 4) *फळे लवकर पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो ?* इथिलीन 5) *'मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी' या शब्दात प्र. के. अत्रे यांनी कोणाचे वर्णन केले आहे ?* साने गुरुजी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णजीत केरबा उमाटे, मुखेड 👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, करखेली 👤 नागनाथ परसुरे, सहशिक्षक, माचनूर 👤 शुभानन गांगल, पुणे 👤 अशोक पाटील कदम 👤 समीर मुल्ला 👤 वतनदार पवनकुमार नारायण 👤 गजानन हुस्सेकर, सहशिक्षक, धर्माबाद 👤 महेश शिवशेट्टी 👤 माधव पाटील शिंदे 👤 राजकुमार इंगळे 👤 कु. योगेश्वरी बालाजी पेटेकर 👤 विपीन कासलीवाल 👤 डॉ. सुभाष नामदेव पाटील 👤 शुद्धधोन पवार, डोणगावकर 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.* *एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *भारतमाते पुत्र शहाणे अमित तुला लाभले,* *तुझ्या कुशीला परी जन्मली ,* *सारी वेडी मुले.* *आज बाबू गेणूंचा स्मृतिदिन* *या भारतमातेच्या सुपुत्रांनी 150 वर्षे* *इंग्रजांच्या जोखडात बंदिस्त असलेल्या माझ्या भारतमातेला मुक्ती* *दिली.* *हे करत असतांना त्यांनी आपल्या घराची,संसाराची राखरांगोळी केली.* *तरुणांना खरा आदर्श वाटावा असे ज्वाजल्य देशप्रेम,रक्ताने भाळी लावलेला स्वातंत्रदेवतेचा टिळा.* *कुठलीही तमा न बाळगता प्राणाला सामोरे जाण्याची तयारी आज* *यत्किंचितही दिसत नाही.अवघ्या 22 व्या वर्षी 12 डिसेंम्बर 1930 रोजी माझ्या बाबू* *गेनू या शूर मर्दाने इंग्रजांच्या परदेशी मालाने भरलेल्या ट्रकला आडवा होऊन प्राणाची आहुती दिली.* *ही निष्ठा,हे देशप्रेम,ही राष्ट्रभक्ती आज खुर्चीसाठी भांडणाऱ्या सत्ताधाऱ्यांना खुणावतेय.* *देशात चाललेल्या अराजकतेला आळा घालण्यासाठी कुणी देशभक्त पुढे येतांना दिसत नाही.बाबू गेनू चे* *गाडीखाली जाणे एव्हढे सोडले तर फारसं कुणाला काही माहीत नाही.* *जिथे माझा हा निष्ठावान साथीदार गेला तिथे कुणी स्तंभ बांधला नाही ना वात पेटवली नाही.* *कुसुमाग्रज यांनी यावर फार उपरोधीत काव्य केले आहे.* *अनामविरा जिथे जाहला , तुझा जीवनअंत , स्तंभ तिथे ना कुणी बांधला,* *पेटली न वात.* *धगधगत्या या समराच्या ज्वाला* *देशकाशी,* *जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी।* *मुकपणाने तमी लोपती, संध्येच्या रेशा,* *मरणामध्ये विलीन होशी, ना भय ना आशा।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति तेथे माती* एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही. त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला. *तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच..* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment