✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 02/12/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• राष्ट्र दिन - संयुक्त अरब अमीराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य. राष्ट्र दिन - लाओस. 💥 ठळक घडामोडी :- १९८८ - बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी. १९८९ - भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी. 💥 जन्म :- १९३३ - के. वीरमणी, द्रविड मुनेत्र कळघम नेता. १९३७ - मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष. १९४७ - धीरज परसाणा, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७२ - सुजीत सोमसुंदर, भारतीय क्रिकेट खेळाडू. १९७९ - अब्दुल रझाक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९८० - चौधरी मुहम्मद अली, पाकिस्तानचा पंतप्रधान. १९९३ - पाब्लो एस्कोबार, कोलंबियाचा मादकद्रव्य व्यापारी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सातबारा नुसता कोरा करायचा नाही तर शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचं आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सिजनला झाली सुरवात, प्लेसमेंटच्या पहिल्या स्लॉटमध्ये एकूण आंतराष्ट्रीय आणि देशांतर्गत अशा 18 कंपन्या सहभागी होत्या. यामध्ये सर्वाधिक प्लेसमेंट ही मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून मिळाली असून वार्षिक 1 कोटी 17 लाखांची प्लेसमेंट देण्यात आली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी निवडीची घोषणा, पदभार स्वीकारला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं अभिनंदन आणि स्वागत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानीच्या तिजोरीवर डल्ला, माणिक, दागिने आणि पुरातन नाणी गायब, चौकशी समितीच्या पाहणीनंतर वास्तव उजेडात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सरकारी नोकरभरतीसाठी सुरु करण्यात आलेले 'महापोर्टल' बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *औषधांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या ई-फार्मसी फ्लॅटफॉर्म आता स्वतःकडे औषध जमा करू शकणार नाहीत. छोटे व्यापारी आणि विक्रेत्यांबरोबर भागीदारी करून औषध ग्राहकांपर्यंत पोहचवली जातील. यासाठी आरोग्य मंत्रालयाने ई-फॉर्मसी नियमांमध्ये बदल केले आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीत लोढा कमेटीच्या शिफारसीमध्ये बदल करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. उच्च पदांवरील अधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवण्यात यावे यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवण्यात आला असून, यास मंजूरी मिळाल्यास बीसीसीआयचे अध्यक्ष सौवर गांगुली यांचा कार्यकाळ वाढवला जावू शकतो.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बलात्काराचे वाढते प्रमाण कधी थांबणार ?* http://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_15.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *काही मुलांना जन्मानंतर इन्क्युबेटरमध्ये (पेटी) का ठेवतात ?* 📙 काही महिलांना सातव्या महिन्यातच मूल होते. अशी मुले साहजिकच वजनाने कमी असतात. त्यांच्या शरीराची वाढही सामान्य नवजात बालकांपेक्षा कमीच असते. श्वसन व रक्ताभिसरण ही दोन महत्त्वाची कार्ये मात्र ते बालक करू शकते. बालकाला शरीराचे तापमान ठराविक पातळीवर राखण्याचे कार्यही करावे लागते. तसेच जंतूंपासून स्वतःचा बचावही करावा लागतो. ही शेवटची दोन कार्य करणे मात्र सातव्या महिन्यात जन्मलेल्या वजन अत्यंत कमी असलेल्या बाळासाठी खूप अवघड असते. त्यामुळे अशा मुलांना इनक्युबेटरमध्ये विशेष कक्षात ठेवले जाते. इनक्युबेटर ही काचेचे झाकण असलेली एक चौकोनी पेटी असते. यात तापमान शरीराच्या तापमानाशी मिळते जुळते (सुमारे ३७' सेंटिग्रेड) असे ठेवलेले असते. हवेतील रोगजंतूंचाही नायनाट करण्यात आलेला असतो. त्यामुळे असे बाळ, जे इन्क्युबेटर नसल्यास जंतूसंसर्गाने व तापमानाचे नियंत्रण न करता आल्याने मरण पावले असते, ते वाचू शकते. असे हे इनक्युबेटर जणू बालकांसाठी वरदानच होय. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'जागतिक एड्स दिन' कधी साजरा केला जातो ?* 1 डिसेंबर 2) *भारतातील पिकांचे साधारणपणे किती हंगाम असतात ?* 2 3) *इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे किमान वय किती असावे लागते ?* 65 वर्षे 4) *महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे ?* अहमदनगर 5) *भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण रोखण्याचे काम कोणती संस्था करते ?* केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय डाड, नांदेड 👤 सुरज पाटील रोशनगावकर 👤 अभि मामीडवार 👤 वैशाली गर्जेपालवे, सहशिक्षिका 👤 श्रीनिवास अवधुतवार, धर्माबाद 👤 जयानंद मठपती 👤 सूर्यकांत तोकलवाड 👤 शरद पवार, सहशिक्षक 👤 धनराज राखेवार, नांदेड 👤 संतोषकुमार राठोड 👤 दत्ता मुपडे 👤 कोमल पाटील 👤 आदित्य बालाजी धात्रक 👤 शिवराज दासरवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आज समाजात खलनायकी आणि नालायकीचे कौतुक, समर्थन केले जाते. दुर्दैवाने आज समाजाची अवस्था अशी झालीय की, लायक नायकांपेक्षा नालायक आणि खलनायकी वृत्तीचे नायक, नेतृत्व आणि वारस निपजत आहेत, पुढे येत आहेत. काळही लायकाला नालायक आणि नालायक खलनायकाला नायक ठरवतोय. ही शोकांतिका सारे गपगुमान बघत आहेत. 'एकेकाळी गुणवत्तेची कदर होती. आता फक्त दर आहेत'. पण गोष्ट फक्त दर आणि कदरपर्यंत राहिली नाहीय, तर पाणी घरात शिरलयं. पदर आणि चादरीपर्यंत आलयं. आम्ही मात्र काही माहितच नाही, असे सोंग पांघरून बसलोय.* *आपण रोजच वर्तमानकाळाचे चरित्र वाचतो. बलात्कार, लैंगिक शोषण, विनयभंग , गैरप्रकार हे आता कायदेशीरच ठरतायत की काय अशी स्थिती आहे. नोकरी, पदव्या, पुरस्कारापर्यंत नको नको ते बघायला मिळतयं. या सा-या खलनायकांना नायक म्हणून, लायक म्हणून नालायक पाठीराखेच पुढे आणतात. ज्यातून या सा-यांची हिमंत दिवसेदिवस वाढते आहे. ज्याला रोजच्या भाषेत बाई, बाटली आणि पैशाची पूजा करणारी व्यवस्था म्हटले जाते. गोष्ट सुन्न करणारी आहे पण वास्तव आहे. 'आपण काहीच करू शकत नाही,' असे म्हणू लागलो आहोत.... हे आपण होऊन स्विकारलेलं षंढत्व😌 सर्वत्र निपजतयं जे समाजाचा घात करणारे आहे..?..?..?* ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•• 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *जगामध्ये जेवढी गर्दी वाढत आहे तेवढेच लोक एकटे पडत चालले आहेत . कोणीही कोणाच्या जवळ नाही हीच मोठी समस्या आहे . म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे.......* *मी मोठा आणि तू छोटा बस हा एकच विचार माणसाला माणूस बनवून देत नसते . माणसं जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या☘ मनाची गरज असते . परंतु जेथे अहंकार आहे तेथे प्रेमही नाही आणि ज्ञानही नाही ..* *रोज कितीही चांगले शब्द वाचा परंतु जो पर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तो पर्यंत काहीही फायदा नाही . ज्ञानाला अर्थ कृती मुळे प्राप्त होतो . कृती नाहीतर ज्ञानाला अर्थ नाही ......* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मिनूला मोरानी दिलेली भेट* मिनू चे घर शेतात होते. ती खेळता-खेळता घराच्या खूप दूर आली. तिला दोन पिसे दिसली. तीनी ते पिसे निरखून पाहिले. ती लहान होती म्हणून तिला ते पिसे कोणाची आहे हे कळाले नाही. पण तिला असे वाटले हे पिसे ज्याची असन ते त्या पिसाला शोधत असन . म्हणून तिने ठरवले की ही पिसे ज्याची असन मी त्याला शोधून त्याची पिसे वापस देऊन टाकीन. तिला रस्त्यात कोंबडी दिसली. तिने त्या कोंबडीला प्रेमाने विचारले, कोंबडीताई कोंबडीताई ही पिसे तुझी आहेत का? कोंबडी म्हणाली, नाही ही पिसे माझी नाहीत पण मला माहित आहेस की, ही पिसे कोणाची आहे? मिनू म्हणाली, सांगा सांगा ही पिसे कोणाची आहे? कोंबडी म्हणाली ही पिसे मोराची आहे. मिनू धन्यवाद म्हणून समोर निघाली. तिला रस्त्यात कबूतर दिसले. तिने मोराचा पत्ता कबुतराला विचारले . मिनू पळतच त्या पत्त्यावर गेली. तिने मोराला हाक मारली . मोर त्याच्या घरातून बाहेर आला. मिनू ने त्याची पिसे त्याला वापस दिली. पण मोरानी ती पिसे घेतली नाही तिला समजावले एकदा माझी पिसे पडली तर ती डबल मला जोडू शकत नाही व त्यांनी तिला ते पिसे भेट म्हणून दिली. मिनू ने आनंदाने पिसे आपल्याजवळ धन्यवाद म्हणून ठेवली. व ती पळतच घरी गेली मिनूने आईला घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि ती पिसे पुस्तकात जपून ठेवली. बोधः कधी पण कोणी दिलेली भेट जपून ठेवावी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment