✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 03/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक विकलांग दिवस* 💥 ठळक घडामोडी :- १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. २००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार. 💥 जन्म :- १८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती. १९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ११५४ - पोप अनास्तासियस चौथा. १७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसातील हा दुसरा मोठा निर्णय आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली : पीएमसी बँक खातेदारांपैकी जवळपास ७८ टक्के खातेधारकांना त्यांच्या खात्यातले सर्व पैसे काढायची मुभा देण्यात आली असल्याची माहिती, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महापोर्टल परीक्षेचा पुण्यात फज्जा, वीज गेल्याने केंद्रावर गोंधळ, वर्ग तीन आणि वर्ग चार पदांच्या भरतीत पारदर्शकता यावी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये 'महापोर्टल' सुरु केलं होतं. परंतु वाढीव फी आणि भोंगळ कारभार यामुळे महापोर्टल बंद करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई : वेतनवाढ आणि विविध मागण्यांवरून एसटी महामंडळाचे कर्मचारी सध्या नाराज आहेत. नव्या सरकारच्या कार्यकाळात एसटी महामंडळाला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एसटी कर्मचारी करणार आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ७ डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या कामाचा परिणाम कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवेवर झालाय. २८ डिसेंबरपासून ही सेवा पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती ट्रू जेट विमान कंपनीच्यावतीने देण्यात आली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये नेपाळच्या अंजली चंद हिने मालदीव्स या संघाविरोधात खेळताना एकही धाव न देता एकूण सहा बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली, पुरूष आणि महिला अशा दोन्ही प्रकारच्या टी २० क्रिकेट कारकिर्दीत मिळून सर्वोत्तम कामगिरी ठरली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *अॅडलेडच्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर १ डाव आणि ४८ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-० असं निर्भेळ यश संपादन केलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सरकारी शाळा बंद करण्याचा घाट * कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावल्याने सरकारने राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी वाचण्यात आली आणि शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी जिल्हा ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *रस्त्यांवर फेकलेल्या लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होते ?* 📙 शाळेत जाताना सकाळच्या वेळी रस्त्यांवर अनेक दुकानांच्या समोर लिंबू मिरच्यांच्या माळा फेकलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. आई व वडिलांनी या लिंबू मिरच्यांवर पाय देऊ नकोस त्यांना ओलांडून जाऊ नकोस असही तुम्हाला बजावून सांगितले असेल. त्यामुळे तुम्ही त्यापासून दूर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करत असाल. पण जर लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होईल हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. कोणाची वाईट नजर लागू नये आणि दुष्ट शक्तींपासून संरक्षण व्हावे या समजापायी दुकानदार दुकानांवर लिंबू मिरच्या, काळ्या बाहुल्या टांगून ठेवत असतात. दुसऱ्या दिवशी ते लिंबू मिरची रस्त्यावर फेकून देतात. दिवसभरात त्या लिंबू मिरच्यांमध्ये अनेक दुष्ट शक्तींचा प्रभाव जमा झाल्याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांना खात्री वाटत असते ! खरे तर जगात भूते खेते नसतात. दुकानदारांना खरी भीती चोरांची, आगीची वैगरे असते. नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक वा आग प्रतिबंधक यंत्रणा या कामाला येतील का टांगलेल्या लिंबू मिरच्यांच्या माळा ? याचे उत्तर अगदी शेंबडा मुलगाही सांगू शकेल. पण तरीही चांगले शिकले सवरलेले लोक अशा अंधश्रद्धांना बळी पडून लिंबू मिरच्यांवर नाहक खर्च करत असतात. देशातील लाखो दुकानांवर दररोज लाखो लिंबे व करोडो मिरच्या टांगल्या जातात व दुसऱ्या दिवशी त्या फेकून दिल्या जातात. यात केवढे मोठे राष्ट्रीय नुकसान आहे याचा विचार सर्वांनी करायला हवा. लिंबू मिरच्यांचे वास्तव तुम्हाला कळले. आता निदान तुमच्या व तुमच्या नातेवाईकांच्या दुकानांवर लिंबू मिरच्यांच्या माळा दिसणार नाहीत आणि त्यावर पाय पडला तरी तुम्ही घाबरणार नाही याची मला खात्री वाटते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" शब्द खोटं बोलू शकतात, मात्र कृती नेहमीच सत्य बोलते "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण आहेत ?* उद्धव ठाकरे 2) *महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत ?* नाना पटोले 3) *महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते कोण आहेत ?* देवेंद्र फडणवीस 4) *महाराष्ट्र विधानसभेचे एकूण सदस्य किती आहेत ?* 288 5) *जागतिक दिव्यांग दिन केव्हा साजरा केला जातो ?* 3 डिसेंबर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईप्रसाद पुलकंठवार, धर्माबाद 👤 रघुनाथ टेकुलवार, करखेली 👤 शिवाजी कल्याणकर 👤 सौ. अनुराधा श्यामसुंदर माडेवार 👤 विरेश रोंटे 👤 श्रेयस दिलीप धामणे 👤 पांडुरंग तम्मलवाड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर? ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.* *जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *कोपर्डी घटनेनंतर, देशात पुन्हा एकदा विकृत मनोवृत्तीचे विद्रुप दर्शन डॉ.रेड्डी या तरुण युवतीच्या खुनाने* *दाखविले.* *ही सुप्त मनाची विकृत ताकद असते तिला घालवायचे असेल तर सकारात्मक मन तयार करणे गरजेचे आहे.याची ताकद खूप प्रचंड आहे.* *यासाठी काही उदाहरणे बघूया.* *सोलोमन बेटावर आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. ते आदिवासी लोक प्रथेनुसार झाडे तोडणे अपशकुनी* *समजतात.* *एखादे झाड तोडायचे असेल तर एकत्र येऊन दररोज झाडाभोवती वर्तुळाकार तास न तास बसून झाडाला नकरात्मक लहरींनी घायाळ* *करतात. आश्चर्याचा भाग* *म्हणजे काही आठवड्यात ते झाड शुष्क होऊन उन्मळून पडते.* *हे उदाहरण कोणालाही पचनी पडणे अवघड आहे.* *तेअविश्वसनीय वाटणे स्वाभाविक आहे. अदृश्य, न दिसणारे,* *नकारात्मक मन, चिन्तन करणारे विचार, एका झाडाचे* *अस्तित्व नष्ट करू शकतात का?* *तुम्हाला जर ब्रुस लिप्टनचे पुस्तक The Biology of Belief वाचण्याची संधी मिळाली तर तुम्ही* *सोलोमन बेटावरील गोष्टच नव्हे तर तुम्ही तुमच्याबद्दल आणि ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या* *विषयी नकारात्मक बोलण्यावेळी हजार वेळेस विचार कराल.* *लिप्टन यांनी या पुस्तकात जागृत (conscious) आणि सुप्त मनाच्या* ( *subconscious mind) ताकदीवर विस्तृत विवेचन* *केले आहे.* *सुप्त मनाची ताकद ही जागृत मनाच्या ताकदीपेक्षा दशलक्ष पटीने जास्त असते.* *दैनंदिन जीवनात सुप्त मनाचा नकळत प्रचंड प्रभाव असतो.* *पुष्कळ वेळा आपण आपल्या वाईट सवयी अथक प्रयत्न आणि इच्छाशक्ति असताना सुद्धा सोडू* *शकत नाही. त्याचे मुख्य कारण ह्या वाईट सवयी सुप्त मनामध्ये प्रभावीपणे प्रोग्राम केल्या जातात* *आणि ते आपले सर्व प्रयत्न निष्क्रिय करतात.* *जागृत मन (Conscious mind) ही सुप्त मनाची (Subconscious)* *केवळ सावली असते.* *सोलोमन बेटावरील आदिवासी हे प्रभावीपणे नकारात्मक लहरींनी झाडाच्या संवेदनेवर आघात करतात.* *झाडांना संवेदना असतात हे ही तितकेच खरे आहे.* *काही दिवसांनी त्या आघाताने त्या संवेदना झाडाच्या एक अंगीभूत भाग होऊन जातात आणि त्यामुळे* *झाडाची अणुरचना ढासळते. झाड आतूनच मरणासन्न होते.* *त्या पुस्तकात जागृत पालकत्वावर स्वतंत्र प्रकरण आहे.* *त्यात मुलावर सतत नकारात्मक बोलण्यामुळे, त्याच्या जडणघडणीवर विपरीत परिणाम होतात.* *याउलट सकारात्मक विचार, मुलाचे जीवनात उपयुक्त पडतात.* *तेच तेच सारखं बोलत राहणे सुप्त मनावर पगडा करते आणि तसेच घडत जाते याची प्रचिती दिसून येतेच.* *म्हणूनच रोज असे म्हणा_* " *मी सुखी आहे,* *मी सर्व गुणसंपन्न आहे,* *माझ्याकडे भरपूर पैसा, उत्तम* *आरोग्य, उत्तम नाती, उच्चकोटीचा* *समाज, असे सर्वांगीण सुख समृद्धीने परिपुर्ण* *जीवन मी जगत आहे.* *जे होत आहे आणि होणार आहे ते सर्व चांगलेच होणार आहे!"* *नेहमी असेच विचार मनात सतत असू द्या.* *हाच आपल्या सगळ्यांसाठी समृद्ध जीवनाचा कानमंत्र आहे !* *LAW OF ATTRACTION* *नुसार *आपन जे पॉझिटिव्ह किंवा negative विचार करतो.. त्या त्या* *गोष्टी आपण विचार मार्फत आपल्याकडे आकर्षित करत* *असतो.*चांगला विचार करा,समाजात रुजवा,विकृत मनोवृत्तीला थारा देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लाख मोलाचा देह* एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल. वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे' 'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला. 'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला. अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता. व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment