*नवप्रेरणा*
नवप्रेरणा जीवनी आली
आनंदाचे क्षण पुलकीत झाले
विसावल्या त्या क्षणाला
विसरून सारे पुढे गेले
अंतःकरणाचा पुलकीत क्षणाचा घेऊया आपण मागोवा रे
उणेदुणे सोडून सारे
विसरून त्याला जाऊयारे
काळाचा वाहत्या ओघाचे
आपण सारे आहोत भागीदार
आयुष्याचा क्षणाक्षणाचा हिशेब मग आपण कसा ठेवणार?
सर्वांनी द्यावी इतकी
मायाआणि स्नेहमय छाया
वैरत्वाचा वैरत्वाची प्रेमाने पालटुया आपणरे काया
सरलेल्या आयुष्याचे क्षण
नाही आपण मोजायचे
आणि उरलेल्या आयुष्यात मनात माञ घर करुन राहायचे
नवप्रेरणेने जीवन पुढील जगायचे,सुखदुःखाचे
धागेदोरे मोजत नाही बसायचे
हसतखेळत जीवन आपले छानसे रंगतदार करायचे.
💐💐💐💐💐💐
*सर्वांना नुतन वर्षाचा हार्दिक स्नेहमय शुभकामना*💐💐💐
〰〰〰〰〰〰
✍ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment