✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 01/01/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नवीन वर्ष शुभारंभ* 💥 ठळक घडामोडी :- ● १८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले. 💥 जन्म :- ● १८९२ - महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते. ● १८९४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. ● १९०२ - कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक. ● १९३६ - राजा राजवाडे साहित्यिक. ● १९४३ - रघुनाथ माशेलकर . 💥 मृत्यू :- ● १७४८ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ. ● १९५५ - शांतिस्वरूप भटनागर भारतीय रसायनशास्त्रज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भाविकांच्या विरोधानंतरही 1 जानेवारीपासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी, मंदिर प्रशासनाकडून मोबाईल ठेवण्यासाठी अडीच हजार लॉकरची व्यवस्था* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागणीसाठी येत्या आठ जानेवारीला देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *'कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात आज, एक जानेवारी रोजी गर्दी होणार असल्याने कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, या भागातील कंपन्या सुरू राहणार आहेत,' असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सरकारने एनपीआरचा नवा फॉर्म तयार केला आबे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनपीआरच्या नवीन डेटाबेसमध्ये आधार नंबर, पॅन नंबर, वोटर आयडी नंबरसह जवळपास 7 नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मेट्रोच्या कामासाठी पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकाचे स्थलांतर, शिवाजीनगर बसस्थानक खडकीत हलवल्यानं येथे जाण्यायेण्यासाठी जास्तीचा वेळ खर्ची पडणार आहे. तसेच या स्थानकावर येण्या जाण्याचा खर्चही वाढणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून मराठमोळ्या मनोज मुकुंद नरवणे यांनी पदभार स्वीकारला, जनरल बिपिन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफपदावर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *न्यू ईयर सेलिब्रेशननिमित्त माथेरान हाऊसफुल्ल, मिनी ट्रेन सुरू झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• नववर्षाभिनंदन ! फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या सर्व वाचकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!! ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नवीन वर्ष सुखाचे जावो* मुलांनो, ग्रेगरियन कॅलेंडरनुसार काल सरत्या वर्षाला निरोप देऊन आज आपण नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झालो आहोत. ख्रिसमस म्हणजे नाताळाचा सण संपला की, संपूर्ण जगाला नवीन वर्षाची चाहूल लागते. संपूर्ण जगात या नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात इंग्रज लोकांनी दीडशे वर्षे राज्य केले आणि जाता ...... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_31.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आले वर्ष नवे* ---------------------- सरले सरले वर्ष हे हो जुने स्वागत करूया आले हे वर्ष नवे... पाहू स्वप्ने नवी करू संकल्प नवे प्रयत्न करूया देई यश वर्ष नवे... गोड सदा बोलावे वाईट ना बोलावे मनापासून हेच नवं वर्षात करावे -------------------------------- -अरुण वि.देशपांडे-पुणे. 9850177342 ----------------------------------- *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एखादा मार्ग तुम्ही निवडता तेव्हा तो तुम्ही शेवट पर्यंत चालला पाहीजे. व्यक्तीगत कारणासाठी त्यापासून दूर जाऊ नये. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती ?* जिलेबी 2) *भारतातून चहाची आयात सर्वाधिक कोणता देश करतो ?* इंग्लंड 3) *शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले ?* स्वामी विवेकानंद 4) *ब्रह्मपुत्रा नदी बांग्लादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते ?* जमुना 5) *जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता ?* एंजल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिकेत भारती, नांदेड 👤 सुरेश सावंत, साहित्यिक, नांदेड 👤 दिलीप धामणे, साहित्यिक, हिंगोली 👤 संजय नलावडे, साहित्यिक, मुंबई 👤 पांडुरंग कोकुलवार, साहित्यिक, नांदेड 👤 पेंडम पवन, नवीपेट, तेलंगणा 👤 शिवराज पा. गाडीवान, पत्रकार, धर्माबाद 👤 शेख बिस्मिल्ला सोनोशी 👤 उमेश कोकुलवार *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌼 🌼 *_हार्दिक शुभेच्छा !!!_* 🌼 🌼 *'धूर' जसा वातावरणात 'प्रदूषण' करतो तसे 'शब्द'ही जगण्यात प्रदूषण करतात. तेव्हा निरोगी मनाच्या, निरोगी शब्दांच्या शोधात रहाणे, त्यांचा सहवास मिळविणे यात वेळ घालविणे आधिक चांगले. अशावेळी 'चुगलखोर' शब्दांना मूठमाती देणे आधिक चांगले.* *आज 31 डिसेंबरला नववर्षाच्या शुभेच्छा देताना सर्वांना एकच मॅसेज पाठवत आहे... 'मी जर तुमच्याविषयी काही वाईट बोललो असं जर तुम्हाला कुणी सांगितलं, तर मनात ठेवू नका. माझ्याशी 'संवाद' साधा. मला तुमच्याशी 'मैत्री' हवी आहे. शब्दांमुळे आपल्यात अंतर नको......'* 🌟 *_Good Bye - 2017_* 🌟 🌟💥 *_WELCOME - 2018_*💥🌟 *_नववर्ष मैत्रीपूर्ण, आनंददायी जावो !!!_* *_मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा !!!_* 💐 *_--संजय नलावडे आणि परिवार_* 💥💥💥💥💥💥💥💥💥 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आज 2020 मध्ये आपण पदार्पण करीत आहोत.* *या संपूर्ण एका वर्षासाठी आजपासून नवीन संकल्प करा. ते डायरीत लिहून ठेवा. मित्र परिवारात जाहीर करा. वारंवार ते संकल्प आठवा* *काही संकल्प* १) प्रथम स्वतः वर प्रेम करा. २) वडिलधा-यांना मान द्या. ३) बचत करायला शिका. ४) निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करा. ५) चांगला मित्र परिवार वाढवा. ६) व्यसनांपासून दूर रहा. ७) भक्तीमार्ग अवलंबा. ८) समाजसेवा करा. ९) आपल्या मागे आपली आठवण काढणारी माणसे आहेत, याची सदैव जाणीव ठेवा. १०) सल्ला घेऊनच प्रत्येक काम करा. ११) आजच्या तरूण पणावरच उद्याचे वृद्धत्व अवलंबून आहे. हे विसरू नका. १२) मागा म्हणजे मिळेल, आणि शोधा म्हणजे सापडेल. या प्रमाणे वागल्यास पुढेच जाल. १३) यशोगाथांचे वाचन करा. १४) नैसर्गिक जीवन जगा. १५) आयुष्य फार लहान आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आदर्श जीवन जगण्यासाठी जरुर वाचा.. 💎1) चूक झाली तर मान्य करा. 💎2) समोरच्याचे मत विचारात घ्या. 💎3) चांगल्या कामाची स्तुती करा. 💎4) आभार मानायला विसरू नका. 💎5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा. 💎6) सतत हसतमुख रहा. 💎7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा. 💎8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका. 💎9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा. 💎10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका. 💎11) कृती पुर्व विचार करा. 💎12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका. 💎13) क्रोधावर नियंत्रण ठेवा. 💎14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या. 💎15) नेहमी सत्याची कास धरा. 💎16) इतरांना चांगली वागणूक द्या. 💎17) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा. 💎18) विचार करून बोला. 💎19) वाहन चालवताना स्वतः ची काळजी घ्या 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *संकलन -:* *अशोक लक्ष्मण कुमावत.* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 🙏 *निवास* :-समर्थ,त्रिकोणी बंगला, अमृतधाम, पंचवटी, नासिक 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाने असा संकल्प केला पाहिजे की,आपल्या जीवनात कोणत्याही बाबतीत हार मानायची नाही किंवा माघार घ्यायची नाही. कारण आपण ज्या गोष्टी साध्य करणार आहोत त्या गोष्टींसाठी मनात जिद्द ठेवून आणि यश मिळविण्याचे लक्ष आपल्यासमोर ठेवून समोर येणा-या आव्हानाला प्रयत्नाने आणि त्या प्रयत्नामध्ये सातत्याने साध्य करण्यासाठी सज्ज झालात तर यश हे तुमच्यापासून कधीच दूर जात नाही.तुमच्या मनात हारण्याचीदेखील भावना स्पर्श करणार नाही. सदैव तुम्ही दिवसेंदिवस यशाकडेच मार्गक्रमण करत राहणार.पण तुमच्या मनाचा थोडाजरी आत्मविश्र्वास कमी झाला तरी तुमच्या यशस्वी जीवनामध्ये बाधा निर्माण करुन तुम्हाला तुम्हीच अपयशाला कारणीभूत ठरु शकाल हे मात्र नक्कीच. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकीचे बळ* एका वृद्धाने सदान्- कदा भांडणार्या आपल्या मुलांना हातभर लांबीची एकेक काठी मोडायला सांगणे एक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण पालथ्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली. वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता न येणे पुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले.संघटित राहून केलेल्या कार्यास यश नक्कीच प्राप्त होते. तात्पर्यः एकीचे बळ फार मोलाचे असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment