✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 19/12/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्वातंत्र्य दिन - झांझिबार* *गोवा मुक्ती दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १९६१ - भारताने दमण आणि दीवचा ताबा घेतला.गोवा मुक्ती दिन. ● २००१ - व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्या 'कॉमन मॅन'च्या पुतळ्याचे पुणे येथे अनावरण. 💥 जन्म :- ● १९६९ - नयन मोंगिया भारतीय क्रिकेटपटू. ● १७७८ - मरी तेरीस शार्लट, फ्रांसचा राजा लुई सोळावा व मरी आंत्वानेतची पहिली मुलगी. ● १९७४ - रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९५३ - रॉबर्ट अँड्र्युज मिलिकान ,नोबेल पारितोषिक विजेता. ● १९९८ - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक. ● २०१० - गिरीधारीलाल केडिया, भारतीय उद्योगपती. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा मशाल मोर्चा, खा. सुप्रिया सुळेही सहभागी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *चंदा कोचर यांच्या बडतर्फीला दिलेली परवानगी कायदेशीरच, आरबीआयची हायकोर्टात माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मराठी साहित्यकार अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या काव्य संग्रहाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती समितीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाला अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे कडक थंडीत शिक्षकांनी मॉरिस कॉलेज टी पॉइंटवर ठिय्या आंदोलन सुरू केले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पुणेः नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार, डॉ. लागू यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *वेस्ट इंडिजविरुद्ध विशाखापट्टणम येखील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवने हॅटट्रीकची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनदा हॅटट्रीक नोंदवणारा कुलदीप ठरला पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *विशाखापट्टणम : भारताने विशाखापट्टणम् एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. कटक येथे होणारा मालिकेतील तिसरा सामना आता निर्णायक ठरणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षकांना स्वातंत्र्य हवं* http://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_81.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• " एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अति महत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर , एका ठिकाणी तातडीच्या मिटिंग ला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती . आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता . सर्वजण सकाळी लवकर निघाले होते . . गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हर ला लक्षात आले कि मागील एक चाक पंक्चर आहे , त्याने ती गाडी एका बाजूला घेतली . आणि सर्वाना उतरायला सांगितले . सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता . मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले . कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले . कोणी झुडुपाआड गेले . . अर्ध्यतासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली मात्र मालक नाही दिसले . सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेना . दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर , मालक हातात स्पॅनर घेऊन . . शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून . . घामेघूम होऊन . . चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हर ला स्टेपनी चे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले . . आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकार्यांना मिळाला . " थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात . नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात . . . मालक नाही होता येत . " . त्या उद्योपतीचे मालकाचे नाव . . " श्री. रतन टाटा " . . नाशिक येथे नेल्को ची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला प्रसंग . . संदर्भ : The Habit of Winning *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *मोगलांची राज्यकारभाराची भाषा कोणती होती ?* पर्शियन 2) *'समाजवाद' या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला ?* रॉबर्ट ओवेन 3) *'मुंबई हाय' हे नाव कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे ?* खनिजतेल 4) *'मी म्हणजे राज्य होय' असे कोणी म्हटले होते ?* फ्रान्सचा राजा 14 वा लुई 5) *'रेडक्रॉस' या संघटनेची स्थापना कोणी केली ?* जे. एच. डूनांट *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संजय हरणे, सहशिक्षक, माहूर 👤 शंकर जाजेवार, येताळा 👤 सुभाष चिखले पाटील, औरंगाबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• . *"गेले द्यायचे राहून,* *तुझे नक्षत्रांचे देणे !* *माझ्यापास आता कळ्या,* *थोडी ओली पाने !!"* *पाने ओली असेतोवरच ती देण्याघेण्यात मजा आहे. कोरडी पाने कुरकुरतात. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक टप्याचा एक वेगळा 'गोडवा' आहे.* *बालपण कसे टिपूर टिपूर निरागसतेने भरलेले, पौगंडावस्थेत अदमु-या कुतूहलाचे काहूर, तारूण्यात भन्नाट मस्ती, चाळीशीत पोक्त पालवी, पन्नाशी हा फळे चाखायला सुरूवात करण्याचा काळ, साठीनंतरचे आयुष्य म्हणजे सेकंड इनिंग खरेतर बोनसच. त्यासाठी लागणारी तंदरूस्ती टिकवावी लागते. यातही 'दैवं चैवात्र पंचम'नामे घटक असतो, त्याने प्रभाव दाखवल्यास सगळेच देणे-घेणे राहून जाते, विशेषत: घेणे. 'दिल अभी भरा नही' सिच्यूएशनला भरल्या ताटावरून, भरल्या घरातून, रंगल्या मैफलीतून उठून जाणा-यांची 'वही कोरीच' राहते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●•• 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रानो* *थोडं सकारात्मक...* *स्वतः ला रोज सांगा,आजचा दिवस सुंदर आहे.मी रोज जे काही करतो* *किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच काही करू शकतो.... नुसती* *काळजी आणि दुःख करुन काहीच होणार नाही. मी स्वतःला* *झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईन.रोजच असे* *क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात. आज मी स्वतः* *आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंद देईन.जीवन सुंदर आहे आणि मी ते* *_अजुन सुंदर करणार आहे. येणारे दिवस आनंदाने* *जगणार._* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनाच्या अनेक रंगमंचावर बहुरुपी होऊन अनेक पात्र साकार करण्यासाठी आपल्या आत्मविश्वासाची गरज लागते तेव्हा कुठे जीवनाची अनेक पैलू सहजपणे साकारता येतात.कधी गरिब तर कधी श्रीमंत व्हावे लागते तर कधी दु:ख आणि सुख सहन करुन जगासमोर भाव चेहऱ्यावर आणावे लागतात तर कधी एकाकीपणे जीवन जगण्याची आशा दृढ करावी लागते.अनेक जीवनातल्या नवरसांचे रसायन रंगमंचावर आपल्या अभिनयाने सादर करावे लागतात.अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या च व्यक्ती जीवन जगू शकतात.ज्यांना जमत नाही ती व्यक्ती जीवनातल्या रंगमंचामागील पडद्यामागचे जीवन जगतात त्यांचे कोणतेच रंग इतरांना दिसत नाही अर्थात त्याचे जीवन रंगहीन,रसहीन आणि उदासीन जीवन जगल्यासारखेच आहे.म्हणून जीवनाच्या प्रत्येक रंगमंचावर आत्मविश्वासाने पात्र साकारण्याची नेहमी तयारी ठेवायला शिकले पाहिजे तरच जीवनाला खरा अर्थ आहे अन्यथा जीवन व्यर्थच समजावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🦋🍃🦋🍃🦋🍃🦋🍃🦋🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कर्म पूजा* एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . " रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? " त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . " परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा. म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता. *तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.* *'कर्मे ईशू भजावा.'* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment