✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 11/12/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस* *श्री दत्त जयंती* 💥 ठळक घडामोडी :- १८१६ - इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले. १९३०: सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक जाहीर. १९४६: युनिसेफ (UNICEF) ची स्थापना 💥 जन्म :- १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर. १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ. १९२२ - दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता. १९२५: मराठी साहित्यिक राजा मंगळवेढेकर यांचा जन्म. १९३१: आचार्य रजनीश यांचा जन्म 💥 मृत्यू :- १९८७ - जी.ए. तथा गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक. १९९८ - राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी. २००४ - एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या. १९६३ - कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भारतातील पहिले फिरते पोटविकार केंद्र महाराष्ट्रात सुरु, गरीब रुग्णांना लाभ होणार, पद्मश्री डॉ. अमित मायदेव यांची संकल्पना * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्यात सत्ता स्थापनेच्या 13 दिवसांनंतरही महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटप जाहीर नाही; गृह, नगरविकास, गृहनिर्माण खात्यावरुन खातेवाटप रखडल्याची सूत्रांची माहिती * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आता टू व्हीलरवर बसणाऱ्या चिमुरड्यांनाही हेल्मेटसक्ती, अपघातांच्या पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्यामध्ये सुधारणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *खराब हवामानामुळे 24 दिवस बंद असलेली शिर्डी विमानसेवा आजपासून होणार पुन्हा सुरु, सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दिलासा * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रखडलेल्या स्व. गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकासाठी निधी देण्याचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनं : एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नाही, शिवसेनेची भूमिका, विधेयकाची राज्यसभेतील वाट बिकट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रणजीचा रणसंग्राम - स्पर्धेचा पहिला दिवस मुंबईच्या फलंदाजांनी आणि विदर्भाच्या गोलंदाजांनी गाजवला होता. रणजी करंडकाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ आणि मुंबईनं आपापल्या सामन्यात वर्चस्व गाजवलं. तर महाराष्ट्राचा संघ मात्र अडचणीत सापडला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कळी उमलण्या आधी .....!* लघुकथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे https://storymirror.com/read/story/marathi/9fu28ady/klii-umlnnyaa-aadhii/detail कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भूतलावरची येती पन्नास वर्षे* 📙 ५० वर्षांनी काय घडेल, असा प्रश्न विचारला असता अनेकांचे अनेक उत्तरे येतील. सत्ताधारी स्वतःच्या सत्तेवरच्या पुढच्या पिढीबद्दल बोलेल, ज्योतिषी ग्रहांच्या युत्यांची गणिते मांडेल, शेतकरी कमी पडणाऱ्या पाण्याची चिंता करेल, तर सामान्य वाचक नातवाच्या अॅडमिशनची चिंता व्यक्त करेल ! कोणताही शास्त्रज्ञ मात्र या प्रश्नाकडे अत्यंत गंभीरपणे बघून नक्कीच विचारात गढून जाईल. त्याची कारणे तशीच आहेत. औद्योगिक प्रगतीचा वेग, त्यातून निर्माण होणारे रासायनिक प्रदूषणाचे प्रश्न, शहरातील बदलती राहणीची पद्धती, शेती, पाणीपुरवठा या विविध बाबींनी या प्रश्नाला इतके गंभीर स्वरूप आले आहे की कोणीही शास्त्रज्ञ या प्रश्नाला लगेच काहीच उत्तर देऊ शकणार नाही. एकमेकांत विचित्रपणे गुंतलेले असंख्य प्रश्न या पन्नास वर्षात काय काय घडणार आहे, याचे ठोक स्वरूप समोर येऊ देत नाहीत. प्रथम सध्याचे भीषण स्वरूपाचे प्रश्न कोणते, याची केवळ यादी बघू या - १. पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण. १८५० साली हे प्रमाण २६५ पार्टस पर मिलियन किंवा पीपीएम होते, तर १९८८ साली नासाने केलेल्या मोजणीत ते ३५० पीपीएम इतके वाढले आहे. यामुळे पृथ्वीवरील तापमान १ अंश फॅरनहाइटने वाढ झाली आहे. असेच प्रमाण वाढत गेले, तर ५० वर्षांनी ४ अंश फॅरनहाइटने तापमान वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे. २. सीएफसी किंवा क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनचा थर कमी होत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर प्रवेश करायला त्यामुळे जास्त संधी मिळणार आहे. ओझोनच्या थराने या किरणांपासून आपल्याला संरक्षण मिळत असते. याखेरीज पृथ्वीवरील तापमान वाढण्यास कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाच्या जोडीला ही बाब मदतच करेल, असे वाटते. ३. एकूण तापमान वाढ झाल्यास ध्रुवीय बर्फसाठा वितळून समुद्र पातळी किमान पाच फुटांनी वाढण्याची शक्यता उद्भवते. मुळात जगातील सर्व बंदरे समुद्रपातळीलाच असल्याने पाच फुटांनी वाढलेली पातळी अनेक मोठ्या औद्योगिक शहरात हलकल्लोळ माजवेल. तसेच जगातील अनेक बेटे व बेटसदृश देश नष्टच होण्याची शक्यता आहे. उदारणार्थ आपल्या जवळची मालदीव बेटे. ४. लोकसंख्यावाढीने सध्याच जगाला हैराण केले आहे. पण हा प्रश्न ५० वर्षांनी वेगळ्या पद्धतीने सुटेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. एका ठरावीक काळाने म्हणजे अजून चाळीसएक वर्षांनी जगाची लोकसंख्या स्थिरावेल. ५. अन्नधान्य, रोगराई प्रश्न दुय्यम राहून एड्सचा प्रसार हा प्रश्न मात्र भयानकरित्या समोर उभा ठाकणार आहे. अॅक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा प्रकार नवनवीन विषाणूंच्या स्वरुपात पृथ्वीवर ठाण मांडून राहणार आहे, असे दिसते. या प्रश्नांच्या अनुषंगाने व सध्याची आपली संशोधनातील गती बघता काय घडेल, याचा एक ओझरता आराखडा समोर येतो. त्यानुसार ५० वर्षांनी : जेनेटिक्समधील संशोधन खूपच प्रगत होत जाईल. सर्व प्रकारची बियाणे ही रोगराईला तोंड देण्यास समर्थ असतील, त्यामुळे रासायनिक औषधे फवारे मारणे बंद होईल. धान्योत्पादन दरवर्षी गरजेप्रमाणे केले जाऊ शकेल. पेट्रोलऐवजी अनेक ठिकाणी अल्कोहोलचा वापर सुरू झालेला असेल. आफ्रिका खंडात दुष्काळ जरी वाढला असला, तरी लोकसंख्यानियंत्रणाने व तेथील पाळीव जनावरांच्या मांसामुळे खाण्याची व अन्नाची टंचाई भासणार नाही. दुष्काळाने मृत्यू बंद झालेले असतील. पाण्याची पातळी वाढल्याने बांगलादेश, गंगेच्या तोंडाजवळील त्रिभुज प्रदेश, कच्छचे रण, केरळ व ओरिसाचा बराच भाग हा कायमचा पाण्याखाली गेलेला असेल. उन्हाळ्यामध्ये गंगेचा पूर हा स्थायी स्वरूपाची गोष्ट होऊ लागेल. वयाची नव्वदी गाठणे ही नित्याची बाब असल्याने हा मजकूर वाचलेले अनेकजण सत्तरी ओलांडलेली असूनही कामामध्ये व्यग्र असतील व त्यांच्या ताब्येतीही अगदी उत्तम असतील. निवृत्तीचे वय त्या वेळी बहुधा पंचाहत्तर असेल. विविध शहरांमध्ये शंभरमजली इमारतीवजा छोटी गावेच उभी असून तेथे राहणाऱ्यांचा 'दुसऱ्या अशाच गावांशी', क्वचित प्रत्यक्ष संबंध येत असेल; तर घर, शाळा, दुकान, पार्क, थिएटर, ऑफिस सर्व काही एकाच 'गावा'त असल्याने फक्त मजले बदलण्याचाच प्रश्न दिवसाकाठी वरचेवर येत राहील. या बहुउद्देशीय प्रचंड इमारतींचा विजेचा पुरवठा सर्वस्वी सूर्यऊर्जेपासून होत असल्याने भल्यामोठय़ा तारांचे जाळे सार्या शहरभर पसरवण्याची गरजच राहणार नाही. त्याचप्रमाणे दळणवळणासाठी थेट उपग्रहाद्वारेच दळणवळण साधने जात असल्याने टेलिफोन, टीव्ही केबल टीव्ही इत्यादींच्याही तारांचे जंजाळ कुठे आढळणार नाही. कागदी वृत्तपत्र हा प्रकार बंद झालेला असून आवडीचे वृत्तपत्र आयपॅडच्या पडद्यावरच वाचले जाईल. ५० वर्षांचा काळ मानवी जीवनात फार मोठा आहे. पण शास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टीने तो अगदीच थोडा कालावधी आहे. त्यातूनही विसाव्या शतकातील प्रगतीचा वेग सर्वांनाच भोवंड आणणारा आहे. ५० वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळी आजच्या घडणाऱ्या अनेक गोष्टींची शक्यता तर सोडाच, पण स्वप्नेही कोणी पाहिली नव्हती. मग अजून ५० वर्षांनी होणारी प्रगती कशी असेल, याचा अंदाज बांधायला तर काहीच हरकत नसावी, नाही काय ? *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य ! "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'कर्नल' या नावाने ओळखला जाणारा भारताचा माजी कप्तान कोण ?* दिलीप वेंगसरकर 2) *भारतातील धवलक्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते ?* डॉ वर्गीस कुरियन 3) *हिंदी महासागराचा उल्लेख प्राचीन भारतात कोणत्या नावाने केला जाई ?* रत्नाकर 4) *वटवाघूळे अंधारात कशाच्या सहाय्याने मार्गक्रमण करतात ?* प्रतिध्वनी लहरींच्या सहाय्याने 5) *तुंगभद्रा ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?* कावेरी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 इलियास शेख, सर्पमित्र व शिक्षक 👤 प्रा. नितीन दारमोड, समाजभूषण संस्थापक व अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठान 👤 दस्तगीर सय्यद शिक्षक व निवेदक 👤 दीपक पाठक, परभणी 👤 आकाश सोनटक्के 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.* *देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *सायंकाळी कॉटवर जरा आडवा झालो आणि कानी घेताच सकाळ स्मार्ट सोबती मधील 'चिटवूमन' या जिगरबाज लेखावर नजर गेली.* *जो हो गया उसे सोचा नही करते,* *जो मिल गया उसे खोया नही करते,* *हासिल उन्हे होती है सफलता,* *जो वक्त और हालात पर रोया नहीं करते.* *अस जन्मतःच अपंगत्व घेऊन आलेली अमेरिकेची अँमी मलिन्स हिने आपल्या मनात कुठलाही किंतु न ठेवता उत्कृष्ट मॉडेल,नावाजलेली* *अभिनेत्री, जिगरबाज खेळाडू अशी अनेक* *बिरूदे लावून सर्व अशक्य गोष्टी करून जगाला नवा संदेश दिला.* *मलिन्सच्या स्वप्नांना मर्यादाच नव्हत्या.* *वयाच्या पहिल्या वर्षीच आईबापाने तिचे गुडघ्यापासून खालचे पाय कापून टाकले कारण ते वाढणारच नव्हते. आणि मग आयुष्य कस* *जगायचं हा मोठा प्रश्न.पण शक्य नाही ही गोष्ट मलिन्सच्या कानाला आणि मनाला* *तिने कधीच शिवू दिले नाही .* *प्रत्येक क्षेत्रात यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत राहिली.आणि* *अमेरिकेतच नाही तर जागतिक पातळीवर आयडॉल बनली.* *या जगण्यावर* *सुरेश भटांच्या सुंदर ओळी..* *आठवल्याशिवाय राहत नाही---* *आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !* *रडतोस काय वेड्या? लढण्यात शान आहे.!* *काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !* *उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !* *जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे.* *"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,* *कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"...* *मलिन्स सारख कानाला अशक्य शब्द ऐकू देऊ नका.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल.अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे.तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहरात किती कावळे आहेत?* अकबर बादशाह आपल्या दरबारातील सरदारांना नेहमी निरनिराळे प्रश्न विचारायचा. निराळी कोडी घालायचा. ज्ञान, हुशारी आणि चातुर्य यांची परीक्षा घ्यायचा. एकदा त्याने आपल्या सरदारांना एक चमत्कारिक प्रश्न विचारला, " आपल्या शहरात किती कावळे आहेत?" बादशहा उत्तराच्या अपेक्षेन एकएका सदाराकडे पाहत होता. सरदार एकामागून एक उभे राहत होते आणि निमूटपणे आपली मान खाली घालत होते. एकही सरदार बादशाच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नव्हता. इतक्यात बिरबलाने दरबारात प्रवेश केला. तो दरबारातील सर्वात हुशार सरदार होता. पाहिले की, इतर सरदार माना खाली घालून उभे आहेत. बादशहाने घातलेल्या कोड्याचे उत्तर ते देऊ शकले नाहीत, हे बिरबलाने ताबडतोब ओळखले. वाकुन सलाम केला आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला. बादशहाने त्याला विचारले, " बिरबल, शहरात किती कावळे आहेत?" बिरबल लगेच उभा राहिला आणि म्हणाला," महाराज, आपल्या शहरात 50 हजार 378 कावळे आहेत." " बिरबल, तू हे एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतोस?" बादशहाने आश्चर्यचकित होऊन विचारले. बिरबल म्हणाला "महाराज, आपण कृपया कावळे मोजून पहा. जर ते 50 हजार 378 पेक्षा जास्त असले, परगावाहून काही कावळे आपल्या मित्रांना , नातेवाईकांना भेटायला आले आहेत, असे खुशाल समजा. जर ते त्यापेक्षा कमी असतील, तर आपल्या शहरातील कावळे त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना भेटायला बाहेरगावी गेले आहेत उघडच आहे." बादशहा बिरबलाच्या चतुराईवर खुश झाला व आनंदून म्हणाला, " शाब्बास बीरबल, शाब्बास."तुझे चातुर्य आणि बुद्धिमत्ता खूप उत्कृष्ट आहे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment