✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/12/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन* 💥 ठळक घडामोडी :- १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब. १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला. 💥 जन्म :- १३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट. १४४३ - पोप ज्युलियस दुसरा. 💥 मृत्यू :- १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा. १७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार. १९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार. २०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली: सुदानमध्ये सलुमी येथील फॅक्ट्रीत झालेल्या सिलिंडर स्फोटत २३ लोक ठार झाले असून त्यात १८ भारतीय कामगारांचा समावेश आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात जावं लागलेले माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम १०६ दिवसानंतर तुरुंगातून जामिनावर बाहेर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *रत्नागिरी : सोबा चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागात नवे संकट घोंघावण्याची शक्यता, पुढील बारा तासात वादळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी किनारपट्टीत धडकणार असून ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे धोका लक्षात घेऊन कोणीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नवी दिल्ली: खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मागच्या पाच वर्षात जी आंदोलने झाली त्याची व्यवस्थित माहिती घेऊन गुन्हे मागे घेण्यासंबंधीचा निर्णय घेऊ. सरकार सकारात्मक निर्णय घेईल. कुठल्याही निरपराध व्यक्तीला शासन होणार नाही असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत पुन्हा नंबर वनवर झेप घेतली आहे. भारतीय कर्णधाराने बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत झळकावलेल्या शतकाने त्याला कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारतीय क्रिकेट जगताला धक्का देणारी एक घटना घडली, त्रिपुराची राजधानी आगरतळा येथील मिथुन देवबर्मा या क्रिकेटपटूचा सामना सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 फलक लेखन आणि वाचन ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचू आनंदे* *दिनांक 05 डिसेंबर 2019 गुरुवार ••••••••★••••••••••★••••••••••★••••••••••• http://projectforchild.blogspot.com/2019/12/05-2019.html ••••••••★••••••••••★••••••••••★••••••••••• हा उपक्रम आपणांस कसे वाटले आम्हांला whatsapp करून जरूर कळवावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *पल्स पोलिओ म्हणजे काय ?* 📙 पोलिओ अर्थात बाल पक्षाघात हा सामान्यत: पाच वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना होणारा एक सांसर्गिक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. हा विषाणू दूषित पाण्यामार्फत पसरतो. पोलिओच्या रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याशी संपर्क येऊन ते दूषित होते. हेच पाणी निरोगी व्यक्ती प्यायल्यास तिला पोलिओ होऊ शकतो. पोलिओ हा रोग ९९% व्यक्तींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. ९५% लोकांमध्ये तर कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाही. ३ ते ४% लोकांमध्ये ताप आढळून येतो. १% लोकांमध्ये मान व पाठ आखडणे, दुखणे अशी लक्षणे दिसतात. १% हून कमी रुग्णांमध्ये मात्र मज्जासंस्थेवर विषाणू आक्रमण करतो. याची परिणती एकतर श्वसन बंद पडून मृत्यू होण्यात किंवा हात पाय कायमस्वरूपी लुळे पडण्यामध्ये होते. पोलिओ हा गंभीर रोग असला तरी तो टाळणे सहज शक्य आहे. बाळाला जन्मल्यावर लगेच आणि त्यानंतर ते ६, १०,व १४ आठवडय़ांचे तसेच नंतर दीड वर्षांचे झाल्यावर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन दोन थेंब पाजल्यास या रोगापासुन बाळाचे नक्कीच संरक्षण होऊ शकते. भारतात लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याने या रोगाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २००५ पर्यंत पोलियोचे जगातून निर्मूलन करण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. याला 'पल्स पोलिओ' असे म्हणतात. या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशातील पाच वर्षांखालील बालकांना विशिष्ट दिवसांना पोलिओची लस दिली जाते. त्यामुळे सर्व बालकांच्या आतड्यांमध्ये लसीतील (रोग निर्माण करू न शकणारा) विषाणू प्रस्थापित होतो. साहजिकच रोगकारक विषाणूला राहण्यासाठी कोणत्याच बालकांचे आतडे मिळत नाही. परिणामी तो पर्यावरणात येतो व काही आठवड्यांनी नष्ट होतो. पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवली गेल्यास जगातून निर्मूलन होणारा देवी नंतरचा दुसरा रोग पोलिओ ठरेल यात शंका नाही. दुर्दैवाने काही व्यक्ती गैरसमजापोटी आपल्या बाळांना पोलिओची लस देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्या बालकांना पोलिओ होण्याचा धोका निर्माण तर झालाच आहे पण पोलिओ निर्मूलनाच्या अभियानालाही खीळ बसत आहे. म्हणूनच अमिताभ बच्चन तसेच शाहरुख खान सारखे लोकप्रिय अभिनेते तसेच सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू सर्व जनतेला पल्स पोलिओच्या दिवशी सर्व बालकांना 'दो बूंद जिंदगी के' देण्याचे टीव्हीवरून आवाहन करताना दिसत असतात ! *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्रात पादत्राणे बनविण्याचे प्रसिद्ध ठिकाण कोणते ?* कोल्हापूर 2) *पृथ्वी सूर्याच्या भोवती गोल फिरते हे प्रथम कोणी शोधून काढले ?* कोपर्निकस 3) *महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते ?* कोकण 4) *तेजस्विनी सावंत हे नाव कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?* नेमबाजी 5) *भारत आणि रशिया या दोन राष्ट्राच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या क्षेपणास्त्राचे नाव काय ?* ब्राह्मोस *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विकास गणवीर, नागपूर 👤 साईनाथ कल्याणकर, येवती 👤 सूर्यकांत स्वामी 👤 राज डाकोरे 👤 संतोष रामराव शिंदे 👤 अशोक चिंचलोड, येवती, 👤 राजेश गटालावार 👤 राजू अलमोड 👤 योगेश पडोळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण ? कुठल्या रूपात मागे उरतो आपण ? माझ्या घरात आज मी आहे.... उद्या मी नसेन....* *माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल. दहा दिवसांनी तो दिवा विझेल. मग त्या जागी माझा एक फोटो असेल, लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम केलेला, हसरा चेहरा असलेला एक फोटो...* *काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल... त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.. काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल... आणि मग त्यानंतर पिढ्यान्- पिढ्या माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल.....!* *"आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानांत मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'सत्कर्माच्या सप्तरंगी उत्सवात' करायला काय हरकत आहे...?"* ••●🌻‼ *रामकृष्णहरी* ‼🌻●•• 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *ज्या लोकांना स्त्री ही उपभोगाची वस्तू* *आहे असे वाटते,ज्यांना ती अबला आहे,स्रियांचे हे काम नाही,* *बाईची बुद्धी हृदयात असते,अशा स्रियांना कमजोर* *समजणाऱ्या बंधुसाठी,आणि ज्या भगिनी स्वतःला स्त्री म्हणून कमजोर* *समजतात त्यांच्यासाठी वाचनात आलेला एक लेख* *पाठवतोय.* *Ad. दीपा चौदीकर यांची ही पोस्ट आहे.खरी गरज स्त्री-पुरुष या दोघांचेही विचार बदलण्याची आहे.* *घाट वळणातली वाघीण ....* . *आज वाघीण भेटली.... कोर्टातुन येत असताना माझ्या पुढे महींद्रा बोलेरो* *पिकअप होती... मला त्या* *गाडीला ओव्हरटेक करायचं होतं म्हणुन थोडं पुढे आले.. तेवढ्यात* *त्या बोलेरो मधुन ड्रायव्हींग सीटच्या बाजुने चक्क हातभर हिरव्या बांगड्यांचा हात* *बाहेर आलां ...... कुतुहलं वाटलं* *म्हणुन अजुन थोडी पुढे आले ....आणी त्या बोलेरोमध्ये नजर* *वळवली तर चक्क एक* *४०/४५ वर्षांची वाघीण महींद्रा पिकअप हाकत होती.....त्यांना* *सांगितलं काकु गाडी साईडला* *घ्या..... मग काय मॅडमनी ट्राफीक* *मधुन गाडी व्यवस्थित बाजुला घेतली.... त्या गाडीतून* *काॅन्फीडन्टली उतरल्या ..... नाव* *सांगितलं नकुसा म्हासाळ......या* *नकुसा काकु कवठेमंहकाळ* *तालुक्यातल्या एका खेडेगावातुन आहेत ज्या रोज कोकणात जातात* *स्वत: ड्राईव्ह करुन रत्नागिरी, लांजा , राजापुर या भागांत चार ते पाच टन भाजी घेऊन जातात* *तिथल्या बाजारात घालतात आणी हे काम त्या गेली वीस वर्ष करतायतं ....कोकणात ते पण* *घाटातुन रोजचा हा प्रवास......... कौतुक वाटलं .... आणी त्याही* *पेक्षा अभिमान जास्त वाटला या वाघीणीचा....कुठलही काम कमी* *दर्जाच कधीच नसतं आपण ज्या मेहनतीने ते करतो ती मेहनत ...... तो* *त्या कामाचा दर्जा वाढवतं* *असतं ......आज त्यांच्या गाडीत मागे* *लोखंडी सळ्या होत्या....म्हंटलं* *मग हे आज काय आहे गाडीत....तर म्हंटल्या गावाकडे बंगला बांधतेय मी त्याचचं सामान* *आहे हे घेऊन चाललीये गावाकडे....आमचीच गाडी* *आहे ही तेव्हा ड्रायव्हर ला पगार देण्यापेक्षा स्वत:च करते मी* *काम म्हणाल्या.......वीस वर्ष घाटवळणातून प्रवास चालुयं* *आयुष्याचा , कष्ट चालुय मग बंगला तो बनेगा ही भाई.....* *नकोशी मुलगी जन्माला आली म्हणुन आई वडीलानी कदाचित नकुसा नावं* *ठेवलं असावं, पण तीच्यात मला आजची सुपरवुमन* *दिसली....जिचं शिक्षण फक्त नववी पर्यंत झालंय पण तिचं कर्तृत्व बघून* *तिला आरटीओ ॲाफीसर नी मोफत लायसन्स काढून* *दिलं.........नकुसा काकू तुमच्या जिद्दीपुढे, तुमच्या* *कर्तुत्वापुढे , तुमच्या आत्मविश्वासापुढे मी खुप तोकडी वाटले मलाच......* *सलाम तुमच्या जिद्दीला आणि घाटवळणाच्या संघंर्षाला* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पडलेल्या घराच्या भिंतीआत्मविश्वासाने आणि परिश्रमाने उभ्या करतायेतात नि घर उभे करता येते,परंतु चार माणसांची मने जर तुटली तर ती माणसं पुन्हा जोडणेआणि त्यांचे हृदयात घर करणे अतिशय अवघड आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनातील तणाव दूर करणे.* एका शिक्षिकेने अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात धरला आणि सर्व विद्यार्थ्यांवर एक नजर टाकली. प्रत्येकाला वाटले की आता मॅडम विचारतील की हा ग्लास भरलेला आहे की रिकामा ? पण एक स्मित हास्य करुन मॅडमने प्रश्न केला, " या ग्लासचं वजन किती असेल कुणी सांगेल का ?" कुणी म्हणालं 100 ग्रॅम तर कुणी 200 ग्रॅम. एक जण तर म्हणाला - मॅडम, अर्धा किलो ! मॅडमने पुन्हा एकदा स्मितहास्य करुन बोलण्यास सुरुवात केली, " याचं वजन मोजमाप करुन सांगितल्याने फारसा फरक पडणार नाही !मुळात वजन काहिही असो, जर का मी हा ग्लास एक मिनीट असाच धरुन ठेवला तर मला काही त्रास होणार नाही. एक तास धरुन ठेवला तर हात दुखेल आणि दिवस भर असाच ठेवला तर . ? तर हात खुप जड होईल, ईतका की बधीर होउन निकामीच ह्वावा ... आपल्या आयुष्यातील तणाव अन् चिंतांच पण असंच असतं. क्षण भर विचार करा , काही वाटणार नाही. पण मनात धरुन बसाल तर ... तुमचं मन पण असंच जड होत होत बधिर होईल ! ईतकं की तुम्ही काही करुच शकणार नाहीत ! तेव्हा व्यर्थ चिंता करणं सोडा व कायम आनंदी रहा. मनाला हलकं करा आणि निरंतर अल्हाददायक जीवन जगायला शिका ... आयुष्य खुप सुंदर आहे .....! आयुष्य जगण्याच्या दोन पध्दती : १) जे आवडते ते मिळवायला शिका. २) जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका. नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment