✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 31/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वर्षातील शेवटचा दिवस* 💥 ठळक घडामोडी :- ● १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 💥 जन्म :- ● १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव ● १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर ● १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला ● १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान ● १९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स 💥 मृत्यू :- ● १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ● १९९७: स्वरराज छोटा गंधर्व *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा विधिमंडळ परिसरात संपन्न झाला. एकूण ३६ आमदारांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह २६ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर दहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची घेतली शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड होताच काटेवाडीत आनंदाला उधाण गुलालाची उधळण , फटाक्याची आताषबाजी करत आनंदोत्सव साजरा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *दोन लाखांवरच्या शेतकरी कर्जदारांसाठी कर्जमाफीची नवी योजना आणणार तर, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठीही विशेष योजना राबवणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *बिपीन रावत भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, केंद्र सरकारकडून घोषणा, लष्करप्रमुखपदावरून रावत आज निवृत्त होणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी पोलिसांचा 'मास्टर प्लान', पोलिसांकडून 250 व्हॉट्सअॅप ग्रुप्सना नोटीस तर फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईतून तब्बल 26 खासगी रेल्वे धावणार, रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा प्रयत्न, 10 ते 15 दिवसात खासगी रेल्वेसाठी निविदा निघणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसेसावळी (खटाव) शाखेत रविवारी अज्ञात व्यक्तींनी धाडसी दरोडा टाकला. यामध्ये बँकेतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे १ कोटी ६५ लाख ९६ हजार १५९ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे सातारा आणि सांगली जिल्हा परिसरात एकच खळबळ उडाली आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा* अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मुरमान्स्कचे बंदर* 📙 जगातील सर्वात उत्तरेकडचे बंदर म्हणजे मुरमान्स्कचे बंदर. रशियाच्या उत्तरेकडच्या भागातील बव्हंशी भाग कायमचा गोठलेला असतो. विशेषत: हिवाळ्यात तर विचारायलाच नको. बॅरेंट्स समुद्रातील कोला खाडीजवळील एक भाग मात्र तेथील समुद्रप्रवाहामुळे बाराही महिने गोठतच नाही. संपूर्ण उत्तरेकडील समुद्राचे निरीक्षण करताना हा न गोठणारा बिंदू शोधून काढला तो दुसर्या निकोलस झारने. १९१६ साली बंदराची जागा नक्की केली जाऊन बंदर उभारणीसाठी तंत्रज्ञ तेथे पाठवले गेले. या शेवटच्या झारला भूगोल व विज्ञान दोन्हींची विलक्षण जाण होती. देशाला बारमाही बंदर हवेच, या कल्पनेने त्याला पूर्ण झपाटले होते. त्यातूनच या बंदराची उभारणी त्याने सुरू केली. मात्र बंदर पूर्ण होण्यापूर्वीच त्याची सत्ता जाऊन क्रूर हत्या झाली. १९१६ साली बंदरबांधणी झाली. त्या वेळी जेमतेम लाकडी घरातून उभारले गेलेले छोटेसे गाव आज आता मोठे शहर झाले आहे. सहा लाख वस्तीचे परिपूर्ण नांदते, रसरसते शहर ही सुद्धा या टोकाच्या हवामानातील एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागेल. झारची सत्ता गेली, तरी बंदर मोठ्या चिकाटीने उभे राहिले. ६९ अंश उत्तर अक्षांश व ३३ अंश पुर्व रेखांशांवर हे बंदर उभे आहे. आसपासचे वातावरण बहुधा वर्षभर शून्याच्या आसपास असते. रात्रीच्या वेळी उणे पंधरा ते उणे तीस सेंटिग्रेड यादरम्यान ते खाली जाते. आर्क्टिक प्रदेशातील झोंबरे वारे सतत वाहत असतातच. नोव्हेंबर महिन्यात इथला सूर्य शेवटचा मावळतो, तो एकदम संक्रांतीनंतरच उगवतो. प्रत्यक्ष बंदराच्या आसपास समुद्र जरी गोठत नसला तरी थोडा लांबचा टप्पा क्वचित गोठू लागतो. बंदरातील हिमफोड्या नौका ताबडतोब त्या दिशेने जाऊन रस्ते मोकळे करून देतात. अन्नधान्य, इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाहेरून आणावा लागतो. पण मुरमान्स्क येथे दोन गोष्टींची उणीव नाही. खनिज तेल व मासे यांची प्रचंड साठवण व निर्यात या बंदरातून जगभर होते. सैबेरियन भागातून तेलाच्या विहिरीतून काढलेले तेल पाइपातून येथे आणून मग ते ठिकठिकाणी पाठवले जाते. या बंदराची भरभराट याच कारणामुळे होत गेली आहे. दोन्ही महायुद्धांमध्ये रशियाची रसद व नाविक हालचालींची ताकद मुरमान्स्क बंदरातच एकवटली होती. तिथपर्यंत पोहचायची सवय व या हवामानाला तोंड देण्याची ताकद फक्त रशियन नौदलातील नावीकांना होती. रशियाची पश्चिम बाजू जर्मनांनी व्यापली असल्याने या बंदरातून सर्व आवश्यक तो पुरवठा केला गेला व रशिया महायुद्धातून सुखरूप बाहेर येऊ शकला. आज भौगलिक उपयुक्ततेनुसार मुरमान्स्कचे स्थान अढळ बनले आहे, ते युरोपकडून जपानकडे वा जपानकडून युरोपकडे होणाऱ्या मोठ्या जलवाहतुकीमुळे. या वाहतुकीला मार्ग दोन. दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून. मध्यंतरी अनेक वर्षे सुवेझचा कालवा बंद होता, तेव्हा ही वाहतूक उत्तरेकडून वळवली गेली होती. आजही जेव्हा जेव्हा मध्य आशियात अस्वस्थपणा येतो, तेव्हा हाच रस्ता वापरला जातो. त्या प्रत्येक वेळी रसदीसाठी, मधल्या मुक्कामासाठी, दुरुस्तीसाठी मुरमान्स्कचा थांबा अटळ राहतो. दोन्ही ध्रुवांवर मानवाने पाय रोवला असला तरी जवळपास तितक्याच दुर्गम हवामानात पाय रोवून बारमाही व्यावहारिक जीवन जगायचे म्हणजे मुरुमान्स्कमध्ये काम करायचे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात. ~ वपु काळे | पार्टनर *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *कलकत्याहून वंदेमातरम हे वृत्तपत्र कोण प्रकाशित करत असे ?* अरविंद घोष 2) *महाराष्ट्राचे वर्तमान उपमुख्यमंत्री कोण आहेत ?* अजित पवार 3) *'माझे सत्याचे प्रयोग' या आत्मकथनात्मक ग्रंथाचे कर्ते कोण ?* महात्मा गांधी 4) *संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीतील नकाराधिकार (व्हीटो) असलेल्या कायमच्या सदस्य राष्ट्राची संख्या किती ?* 5 5) *महाराष्ट्रात शेकरू ( उडणारी खार ) कोठे आढळते ?* भीमाशंकर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 रामचंद्ररेड्डी सामोड, येताळा 👤 ताहेर पठाण, धर्माबाद 👤 किरण अबुलकोड, समराळा 👤 अमोल बुरुंगुले 👤 शशांक पुलकंठवार 👤 सचिन चव्हाण *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्याला कोणी विचारले, कसे आहात, की आपले उत्तर असते "ठिक आहे, बरं चालले आहे" पण, झकास चालले आहे, मजेत आहोत." असे म्हणणारे कमीच असतात. परंतु शेजा-याचे, परिचिताचे कसे काय चालले आहे, असे विचारले तर मात्र आपले उत्तर बदलते. अर्थात तेही शेजारी किती सख्खे आहेत, परिचित किती जवळचे आहेत वगैरेवर अवलंबून असते. "ते एकदम मजेत आहेत. त्यांना काय धाड भरली आहे." वगैरे उत्तरे आपण देतो. आपल्याबद्दल बोलताना असणारी सावधगिरी इतरांच्या बाबतीत फारशी नसते.* *अर्थात हेही सारे सगळ्यांच्याच बाबतीत खरे असते असे नाही. स्वत:बद्दल गैरसमज असणारी मंडळीही असतात. आपण खूप विद्वान आहोत, खूप यशस्वी आहोत, खूप सुखी आहोत, असे मानणारे लोकही असतात. 'सुख' म्हणजे काय ? एक कल्पना? मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे, असे म्हटले जाते. पण सुखाच्या कल्पनेमागे धावणा-या माणसाला पाहून ते खरे वाटत नाही. समर्थ रामदास म्हणतात--* *"जगी सर्व सुखी असा कोण आहे.* *विचारी मना तूचि शोधूनी पाहे."* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *आज 31 डिसेंबर* *2019* *गेल्या दोन वर्षांपासून मी अखंड सुप्रभात ही लेखन मालिका चालू* *चालू ठेवली आहे.काही* *वाचतात,काही बघतात, काही डिलीट करतात,काही कॉपी पेस्ट करून* *फॉरवर्ड करतात,काही प्रतिसाद देतात,काही आठवण* *_काढतात.काहीही असो पण निमित्ताने भेटतात.जी जी_* *माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!* *चला..* *या वर्षाचा हा अखेरचा दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्री व नात्यांबद्दल खुप सारे धन्यवाद..!!* *तुमच्या या मैत्रीची साथ* *अशीच कायम असू द्या...* *नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...* ✳ *आपला सदैव ऋणी* - *अशोक लक्ष्मण कुमावत.* *एम.ए. एम.एड.* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे प्रत्येक वस्त्रामध्ये आडवा आणि उभा तागा एकमेकांच्या साथीने मिळून घेतलेला असतो तेव्हा ते वस्त्र किंवा कापड तयार होते.त्याचप्रमाणे संसारातही पती-पत्नी आपल्या संसाररुपी वस्त्राला नेहमी जपत असतात.कुठे जरी फाटले तरी त्या संसाररुपी वस्त्राला आपल्या विचाररुपी सुईने आणि समजदारीच्या दो-याने सतत त्या संसाररुपी वस्त्राला शिवत राहतात.कितीही त्याला ठिगळ लागले तरी चालेल पण त्या ठिगळरुपी,वस्त्ररुपी संसारुपी गोधडी जीवनाच्या शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी ही दोन धागे कार्यरत असतात.जर का त्यापैकी एकजरी धागा कमकुवत झाला तर ते संसारुपी वस्त्र वस्त्र म्हणून राहत नाही किंवा त्याला वस्त्रही म्हणत नाही.मग त्याला वापरुन वापरुन राहिलेली चिंधी म्हणून बाजूला फेकून दिली जाते.मग संसाररुपी वस्त्र एकसंघ राहत नाही.संसारात दोघांनाही तेवढाच अधिकार आहे तेवढा वस्त्रामध्ये आडवा आणि उभा धागा एकमेकांत गुंतून आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🏠🌷🏠🌷🏠🌷🏠🌷🏠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परीस* एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा.... शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले... ती साखळी सोन्याची झाली होती..... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही.... तात्पर्य: प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्या नात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी मार्गदर्शकाच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किंवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो ....... पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment