✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 10/12/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अल्फ्रेड नोबेल दिन* *मानवी हक्क दिन* 💥 ठळक घडामोडी :- २०१४-भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्थानची युसूफझाई यांना संयुक्तपणे नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००८-प्रा अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. १९०१-नोबेल पारितोषिक चे प्रथमच वितरण करण्यात आले. 💥 जन्म :- १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार. १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक. १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित. १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते. 💥 मृत्यू :- १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस. २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता. १८९६-अल्फ्रेड नोबेल, स्वीडिश संशोधक आणि नोबेल पुरस्काराचे प्रणेते *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नको, अशी भूमिका ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन डी पाटील यांनी घेतली आहे. नामविस्तार झाल्यास विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख शॉर्ट फॉर्ममध्येच होईल, असंही ते म्हणाले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे आणि भूषण गगराणी यांची निवड, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन सुपुत्रांना एकाच वेळी मिळाली संधी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जिल्हा मुख्यालय असलेल्या पालघर शहरातील रेल्वे स्थानकामध्ये आता कायमस्वरूपी भव्य असा राष्ट्रध्वज दिमाखात फडकत राहणार आहे. हा ध्वज ३० फूट लांब आणि २० फूट रुंदीचा आहे. शंभर फूट उंचीवर हा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी, मंदिर बैठक समितीमध्ये निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बृहन्मुंबईसह विविध महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी 9 जानेवारीला मतदान, बृहन्मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान; तर 10 जानेवारी रोजी मतमोजणी, राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबईतल्या 120 डबल डेकर बसेसपैकी 72 बसेस 2020 मध्ये स्क्रॅप होणार, मुंबईतल्या निम्म्यापेक्षा जास्त डबलडेकर बसचं आयुर्मान संपलं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *रणजीचा रणसंग्राम : आदित्य सरवटे आणि रजनीश गुरबानीच्या प्रभावी माऱ्यासमोर विदर्भानं सलामीच्या रणजी सामन्यात आंध्रचा पहिला डाव 211 धावांत गुंडाळला. तर पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेनं रणजी करंडकात बडोद्याविरुद्धच्या सामन्यात दमदार अर्धशतकं साजरी केली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी हक्क दिन* लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_9.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भूगर्भशास्त्र* 📙 ********************* पृथ्वीच्या अंतरंगाचा, पृथ्वीच्या अंतर्बाह्य घटकांचा अभ्यास भूगर्भशास्त्रात (जिआॅलाॅजी) येतो. पृथ्वीच्या उगमापासून आजपर्यंत झालेल्या निर्मितीप्रक्रियेचा अभ्यास त्यात केला जातो. हे शास्त्र वरवर पाहता निरुपयोगी वाटते. कारण पृथ्वीचे थर, दगडगोटे व त्यांचा अभ्यास यात गुंतलेल्या शास्त्रज्ञाचा व्यवहाराशी काय संबंध, असे अनेकांना वाटते. पण तहान लागली, तर त्याच शास्त्रज्ञाला गाठायची वेळ येते. विहीर कुठे खोंदावी, पाणी किती खोलीवर लागेल, वेळ किती लागेल, याचा सल्ला हाच शास्त्रज्ञ देणार असतो. हीच गोष्ट कोळसा, खनिज तेल, खनिज वायूच्या साठ्यांच्या बाबतीत आहे. पण सध्याच्या जगात यांचे काम याहीपुढे गेले आहे. धरणाची जागा, इमारतीचा पाया, पुलाची रचना, मनोऱ्याची उंची व व वजन आणि त्याखालील जमीन या प्रत्येक बाबतीत यांचा सल्ला मोलाचा असतो. भूगर्भशास्त्राच्या प्रगतीनुसार सध्या अनेक शाखा कार्यरत आहेत. पेट्रोलॉजिस्ट हा भूगर्भशास्त्रज्ञ जमिनीचा कस, थर, बांधणी यांचा विशेष अभ्यास करतो. स्ट्रॅटीग्राफर जमिनीखालचे थर, त्यांची रचना, त्यांचे आयुष्य, त्यांचा परिसर यांबद्दल मोजक्या ठिकाणी उत्खननानंतर निष्कर्षावर येऊ शकतो. पॅलिअँटालाॅजिस्टला जिवाश्म, त्यांचा काळ, पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच्या घडामोडी यात रस असतो. जिओफिजिसिस्ट पृथ्वीचे विद्युतचुंबकीय वातावरण, चुंबकीय क्षेत्र, त्यांचे आजच्या जीवनावर होणारे परिणाम यांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. जिआॅमाॅरफाॅलाॅजी ही त्यातल्या त्यात नवीन शाखा उदयाला येत आहे. दऱ्याखोऱ्यांतील जीवन, त्यांचा एकमेकांशी संबंध व नैसर्गिक स्रोत म्हणजे झरे, खनिज, झाडे यांवर ही शाखा अधिक अभ्यास करते. वर लिहिलेल्या स्वतंत्र शाखा म्हणून जरी अस्तित्वात असल्या, तरी मूलतः भूगर्भशास्त्राचा सुसंगत अभ्यास करताना प्रत्येक शाखेतील माहिती असावी लागते. फक्त पूर्ण शिक्षणोत्तर आवडीचा, संशोधनाचा वा कामाचा विषय या दृष्टीने त्या शाखेवर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्या शाखेतील ज्ञानात व माहितीत भर घालायचा प्रयत्न होतो. सध्याच्या भूगर्भशास्त्रज्ञांचा सखोल अभ्यासाचा विषय अगदी वेगळ्याच दिशेने चालू आहे. अंटार्क्टिकावर सतत चाललेले संशोधन व सागराच्या तळाशी असलेल्या खनिज द्रव्यांबद्दल चाललेले संशोधन यांत अनेक मोठे व महत्त्वाचे भूगर्भशास्त्रज्ञ गुंतलेले आहेत. यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा असलेली प्रचंड अवाढव्य बोट कायम समुद्री वास्तव्याला असून ती जगातील अनेक समुद्र सतत हिंदीतच आहे. गरम पाणी भूगर्भात आहे. ज्वालामुखीमुळे तर भूगर्भातील अंतर्भाग गरमच असतो, हेही माहीत आहे. जसजसे खोल जावे, तसतसे तापमान एकेक डिग्री सेंटीग्रेडने वाढत जाते, याचीही नोंद गेली अनेक वर्षे खाणशास्त्रज्ञांनी घेतलेली आहे. या सर्व माहितीचा वापर करून मग भूगर्भातील उष्णतेचा वीजनिर्मितीला का उपयोग करू नये, या दिशेने अनेकांचे प्रयत्न सुरू झाले. जमिनीला खोलवर भोके पाडून तप्त दगडांवर पाणी सोडावयाचे. या पाण्याची वाफ दुसऱ्या पाईपमधून वर घ्यावयाची व तिच्या शक्तीवर जनित्रे चालवून वीज निर्माण करायची, असे या विद्युतनिर्मितीचे स्वरूप आहे. आजमितीला सुमारे वीस देश या पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. अमेरिका, इटली, न्यूझीलंड येथे तर एकापेक्षा जास्त 'जिओथर्मल पॉवर स्टेशन्स' उभारली गेली आहेत. यापुढील प्रगतीची दिशा म्हणजे खोलवरचे बोअरिंगचे पाणी अधिक खोल असलेल्या गरम खडकापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करायची. जमिनीखाली उभारलेल्या वीजनिर्मिती केंद्रातच वीज निर्माण करावयाची व वर फक्त विजेच्या ताराच आणून विजेचे वाटप करायचे, अशी कल्पना शास्रज्ञ मनात खेळवत आहेत. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता ?* गारो ( मेघालय ) 2) *नाशिक - मुंबई मार्गावर कोणता घाट आहे ?* कसारा घाट 3) *भारताचा पहिला सम्राट कोणास म्हणतात ?* चंद्रगुप्त मौर्य 4) *'झेंडूची फुले' या विडंबनात्मक कवितासंग्रहाचे लेखक कोण ?* प्र. के. अत्रे 5) *रशियाच्या संसदेस कोणत्या नावाने ओळखले जाते ?* ड्युमा *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संदीप मस्के, सहशिक्षक 👤 दशरथ एम. शिंदे 👤 अनिल यादव, धर्माबाद 👤 शिवानंद हिंदोले 👤 श्रीकांत म्याकेवार 👤 अमोल पाटील सलगरे 👤 मच्छीन्द्र सपाटे 👤 मिलिंद गायकवाड 👤 स्वप्नील मसाने 👤 दशरथ शिंदे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.* *स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--* *तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।* *तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *जे चांगले जगी या त्यांचा करा स्वीकार,* *जगी भावानेहुनी त्या कर्तव्य थोर जाणा।* *जगतांना आपला गोल निश्चित करा आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करा.* *लसूनकी चटणी, लगे मजेदार* *थोडी थोडी खाना,* *लगे मजेदार।* *कोणती गोष्ट किती प्रमाणात घ्यायची हे ज्याला कळलं योच या जगात टिकू* *शकतो.* *आपलं ध्येय एकदा निश्चित झालं की,* *तेवढ्यापुरतं निश्चित वागायचं. मला चटणी आवडते म्हणजे मी* *चटणी होणार नाहीय. ती* *फक्त नमुन्यापुरती, मसाल्यापुरती* *घ्यायची, त्यात बुडून* *जायचं नाही. चांगल्यातसुद्धा* *तुम्ही बुडून गेलात,* *तर ते बरोबर होणार नाही.* *मला सांगा, दूध हे चांगलं* *असतं की नाही? असतं. ठीक आहे.* *एक पन्नास लिटर दुधाची टाकी आहे, त्यात तुम्हाला बुडवलं,* *आणि पाच मिनिटं वर काढलं नाही तर चालेल का पन्नास* *लिटरच्या टाकीत तुम्हाला उलटं करून बुडवलं, तर चालणार* *नाही! साखर गोड खरी,* *पण साखरेची दोन मोठी पोती* *पाचव्या मजल्यावरून तुमच्या डोक्यावर टाकली; तर चालतील का?* *किंवा तोंड वर करा, आणि एवढी दोन साखरेची पोती* *टाकतो तुमच्या तोंडात; तर* *चालेल का? चालणार नाही.* *नुसती खाल्ली, तरी पचायची नाही,* *एवढी परिस्थिती आहे.* *म्हणून आपण काही एक विवेक केला पाहिजे, की आयुष्याचं* *माझ्या ध्येय काय? हेतू* *काय? मला काय साधायचंय* *त्याच्यापुरतं तेवढं फक्त आवश्यक ते घ्यायचं. आपलं पूर्ण* *चुकलं असं वाटलं, तर बदलावं.* *पण जोपर्यंत आपण* *ज्ञान मार्गाने पुढे पुढे जातो आहोत, तोपर्यंत मनाचा निश्चय म्हणून ढळू देता कामा नये.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• काही माणसे आपल्या जीवनात खूप काही कमवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरंच काही विसरुन जातात. त्यांना कमवण्याच्या मोह आवरत नाही. त्यांना वाटते की, आपल्यासारखे दुसरे कोणी पुढे जाऊ नये व या जगात आपल्यासारखे वैभवसंपन्न दुसरे राहू नये पण ह्या मोहापायी तो रक्ताच्या नात्याला, मित्राला आणि इतरांनाही विसरायला लागतो. अशा त्याच्या हावरट वृत्तीमुळे सारं सारं विसरुन एकटाच सुसाट धावायला लागतो, परंतु अशा कृतीमुळे आणि लालची कृतीमुळे तो स्वत:चेही जवळ आलेले सुख दूर करुन नको त्या सुखासाठी मागे लागल्यामुळे जीवनात असमाधानाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्याला समजायला पाहिजे. कितीही कमावले तरी आपल्यासोबत काहीच घेऊन जाता येत नाही. माणसाने गरजा भागविण्यापुरते प्रयत्न करावेत. इतरांना तोडून, इतरांची मने कलुषित करुन जीवन जगणे म्हणजे मनुष्य जीवनाला काहीच अर्थ नाही. कोणताही मोह अति केल्याने जीवनाला घातकच असतो हे लक्षात असू द्यावे. *व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवन प्रवास* एक महिला एका बसमध्ये बसली होती. पुढच्याच स्टॉपमध्ये एक जाड आणि थोराड वयस्कर बाई आल्या आणि तिच्याजवळ बसल्या. जास्तित जास्त जागा तिने व्यापली आणि तिच्या सोबत तिने मोठमोठ्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली. त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो तिला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?" तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला "अनावश्यक किंवा वायफळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे." ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे. "इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, *आपला प्रवास खूपच छोटा आहे"* आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे; की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे. कोणी आपले मन दुखावलंय का? शांत रहा,कारण जीवन प्रवास खूप छोटा आहे. कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का? सोडून द्या, शांत रहा, कारण *जीवन प्रवास खूप छोटा आहे.* कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की, हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही. आपला प्रवास खूप छोटा आहे. आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू, एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया. एकमेकांच्या आनंदात आपण पण आनंदी होऊया. कारण एकच की, *आपला प्रवास खूप छोटा आहे ..!* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment