*डोळस प्रेम*
(दि.२१-१२-१९)
प्रेम कुणावरही कधीही करावं
हे जरी खर असलं तरीही
प्रेम हे कधी आंधळं नसावं
प्रेम करताना ते सहज डोळस असावं
जीवनाचा सारीपाट खेळताना
हातचा डाव राखून खेळलेल बर
म्हणजे आपण हरलो कधी तरीही
खेळण्याचा आनंद नक्कीच मिळू शकेल
असच प्रेमात ही आपण एकमेकांना
ओळखून असलेलं नेहमी बर
म्हणजे कडाक्याच्या भांडणातही
कधी जास्त अबोला होणार नाही कधी
सरासरी प्रेमा मध्ये प्रेमभंग हा बहुतेकांच्या नशिबी ठरलेला असतो
असा प्रेम भंग कुणाचा कधी होऊ नये
म्हणून म्हणतो प्रेम हे डोळस असावं....
〰〰〰〰〰〰
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
No comments:
Post a Comment