✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 06/12/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महापरिनिर्वाण दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● २०००-थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा 'डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीयपुरस्कार' प्रदान करण्यात आला. ● १९९२ - अयोध्येमध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली.त्यामध्ये उसळलेल्या दंगलीत सुमारे १५०० लोक ठार झाले ● १९९७ - सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार. 💥 जन्म :- ● १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक. ● १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९७६- क्रांतिसिंह नाना पाटील ● *१९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ* ● २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 फलक लेखन आणि वाचन ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचू आनंदे* http://projectforchild.blogspot.com/2019/12/06-2019.html •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला जाणार, पुण्यात आजपासून पोलीस महासंचालकाच्या तीन दिवसीय परिषदेला सुरुवात होत आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी दोन दिवस तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवस पुण्यात असणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुंबई : शहरातील विविध पायाभूत सुविधा, झोपडपट्टी मुक्त मुंबई करणे, मुंबई २०३० दृष्टिक्षेप यात शहराचा सर्वांगीण विकास करण्यावर भर, पूर नियंत्रण आणि हवामान बदल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या महापालिकेतील बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *परभणी रेल्वे स्थानकावरील हेल्थ इन्स्पेक्टर कार्यालयात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन वेटिंग रुम जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पीएमसी बँक खातेधारकांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार, खातेधारकांच्या आरबीआय विरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळल्या, भारतीय बँकांशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार केवळ आरबीआयलाच, तेच सार्वभौम आहेत - हायकोर्ट * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *सिंधुदुर्ग येथील मालवण तालुक्यातील देवबाग सुनामी बेटावर पर्यटकांची बोट बुडाली, ९ पर्यटक बोटीवर असल्याची माहिती, एका महिलेचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *21 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यापूर्वी 17 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय झाला होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्ताने मुंबईतील चैत्यभूमीत देशभरातून 25 लाखा पेक्षाही अधिक अनुयायी अभिवादन करण्यासाठी होणार दाखल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन टीमकडून भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रज्ञासूर्य विशेषांक* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत....... खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा व विशेषांक download करून घ्यावे. https://drive.google.com/file/d/1kosTls7MJZs-ZqpbQIfouieMOvY65wbl/view?usp=drivesdk विशेषांक वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *बाष्पीभवन व उत्कलन* 📙 ****************************** तापमानातील बदल, तापमानातील फरक, द्रव पदार्थांवरील वातावरणातील हवेचा दाब, द्रवपदार्थाचा उत्कलनबिंदू या साऱ्यांचा परिणाम बाष्पीभवन नावाच्या प्रक्रियेवर होत असतो. छोट्या छोट्या उदाहरणांतून हे आपण पाहिले, तर ते समजणे गमतीचे होते. उन्हाळा आल्यावर घरच्या कुत्र्यासाठी ताटलीत घातलेले पाणी संध्याकाळी कदाचित त्याने न पिता देखील नाहीसे झालेले असते. या उलट पावसाळ्यात पाऊस पडायचा थांबला तरीसुद्धा दारातील फरशीवर साचलेले पाणी सुद्धा कित्येक तास तसेच दिसते. कपभर चहा जेमतेम पाच मिनिटात आपण आपल्या गावात बनवतो. पण तोच कपभर चहा बनवायला गिर्यारोहकांना, हिमालयातील आपल्या सैनिकांना किमान पंधरा मिनिटे लागतात. डॉक्टर इंजेक्शन देण्यापूर्वी स्पिरिटचा बोळा फिरवतात; पण इंजेक्शन देऊन होण्यापूर्वीच ती जागा कोरडी झालेली असते. भल्यामोठ्या धरणातील पाणी काटकसरीने वापरूनसुद्धा कमी होत जाते किंवा आपल्याला नियमित पाणी पाऊस मिळतो, याचेही कारण समुद्रातील पाण्याचे, मोठ्या जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन आहे. कोणत्याही द्रवपदार्थाच्या पृष्ठभागावरील कणांचे सतत वायुरूपात रुपांतर होत असते. वातावरणातील आर्द्रता, उष्णता यांचा त्यावर कमी जास्त परिणाम होत राहतो. द्रवाचे तापमान जसे वाढते, तशी ही प्रक्रिया वाढते. मात्र तापमान कमी झाले तरी ती पूर्णत: थांबत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. थंडीच्या दिवसांत तळ्याच्या किंवा नदीच्या काठी उभे राहिलो तर पाण्यातून निघणाऱ्या या कणांनी बनलेल्या वाफा सहज आपल्या दृष्टीला पडू शकतात, त्याही सकाळच्या कडाक्याच्या थंडीत जेमतेम आठ ते दहा सेंटिग्रेड तापमानाला. द्रवाचा उत्कलनबिंदू कमी असला, तर हे बाष्पीभवन वेगाने होत असते. उदाहरणार्थ, पेट्रोल, स्पिरिट, टर्पेंटाइन ठेवलेली बाटली वा मोठा कॅन खोलीत नुसता उघडा राहिला, तरी त्या पदार्थांचा वास काही सेकंदात आपल्याला येऊ लागतो. प्रत्येक पदार्थाचा एक उत्कलनबिंदू ठरलेला असतो. हे अगदी घनपदार्थ वा धातुंनाही लागू आहे. पण आपण येथे मुख्यतः द्रवपदार्थाबद्दलच विचार करणार आहोत. उदाहरणार्थ, पाणी जेव्हा उत्कलनबिंदूएवढे तापवले जाते, तेव्हा त्यानंतर त्याला मिळणाऱ्या उष्णतेतून त्याचे तापमान वाढत नाही, तर पाण्याचे रूपांतर वाफेत होणे सुरू होते. ही वाफ झपाट्याने पाण्याच्या भांड्यातून बाहेर पडताना आपण पाहतो. उत्कलनबिंदूवर हवेच्या दाबाचा परिणाम होतो. दाब कमी झाल्यास उत्कलनबिंदू कमी झाल्याने तापमान कमी राहते. याउलट दाब वाढविल्यास द्रवाचे तापमान अधिक वाढू शकते. या तत्त्वाचा वापर करूनच घरगुती प्रेशर कुकरमध्ये तापमान सुमारे ५ पौंड दाबाखाली ११५ सेंटिग्रेडपर्यंत वाढवून अन्न लवकर शिजवले जाते. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?* 1998 2) *भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केलेली आहे ?* वेंकय्या पिलई 3) *शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 2 वर्ष 4) *शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किती टक्के महिला सदस्य असाव्यात ?* 50 % 5) *शाळा व्यवस्थापन समितीमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून किती विद्यार्थ्यांची निवड करावी लागते ?* 2 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल सेठ येमुल, पुणे 👤 डी. आर. भोसके, येवती 👤 अशोक हिंगणे 👤 शंकर बोंबले 👤 कैलास सोनकांबळे 👤 बालाजी गैनवार, चिकना 👤 नवनाथ राजीवाडे 👤 भगवान चव्हाण 👤 राजेश जाधव उमरेकर 👤 माधव हालकुडे 👤 प्रा. मंगल सांगळे 👤 दत्ता काशेवार 👤 विवेक क्षीरसागर 👤 देवानंद मुरमुरे 👤 नरेश पांचाळ 👤 राजेश आंपलवाड 👤 कैलास सोनकांबळे 👤 बाबासाहेब घागले 👤 लवकुमार मुळे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणसाच्या स्वभावातील 'मी' पणा हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. त्यामुळे 'मी' पणाच्या मगरमिठीतून त्याची सुटका होणे अशक्यप्राय असते. 'मी' पणा म्हणजेच अहंकार. हा अहंकार दगडी भिंतीसारखा असतो. सहज जरी दगडी भिंतीवर आपले डोके आपटले तरी ते रक्तबंबाळ होऊ शकते; परंतु अस्मिता ही खुल्या खिडकीसारखी असते. अशा खिडकीतून स्वच्छ आणि शुद्ध हवा आतून बाहेर खेळत असते. अहंकारी माणसे उगाचच सतत म्हणत असतात की, 'मी हे केले आणि मी ते केले'. 'मी' पणाची अशी वल्गना करण्यापेक्षा अस्मिता बाळगणारी माणसे म्हणत असतात की,'मी देखील हे करू शकतो, मी देखील ते करू शकतो.'* *अस्मितापूर्ण भाषेत सौजन्य असते, नम्रता असते, शहाणपण असते. अहंकार हा एखाद्या महावृक्षासारखा असतो. घोर संकटाच्या वादळात तो मुळासकट जमीनदोस्त होऊ शकतो; परंतु अस्मिता लव्हाळ्यासारखी असते. ती वा-याच्या तालावर आनंदाने डोलत असते. अहंकाराच्या महापुरात मोठ मोठे वृक्ष वाहत जाऊन नाहीसे होतात ; परंतु अस्मितेच्या वाटेवर स्वार होऊन छोटीशी मुंगी पैलतीरावर जाऊन हसत असते. आपले जगणे हसण्यासाठी आहे, रडण्यासाठी नाही. आपल्या जगण्यात आनंद आहे. तो अनुभवायाचा असतो. आपले जगणे आनंदाचे गाणे व्हावे असे वाटत असेल तर अहंकारमुक्त प्रांगणात स्वछंदपणे विहार करायला शिकले पाहिजे. अस्मितापूर्ण आकाशात गरूडभरारी घ्यायला शिकले पाहिजे. आपले जगणे मलयगिरी पर्वतावरील सुगंधित वा-यासारखे व्हावे असे वाटत असेल तर प्रथम आपण अहंकाराचा त्याग केला पाहिजे. कवी बा. भ. बोरकर म्हणतात..."जीवन त्यांना कळले हो । मीपण ज्यांचे पक्व फळापरि गळले हो ॥* ‼ *रामकृष्णहरी*‼ 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काल सायंकाळी एबीपी माझावर बातमी ऐकली, मन पुन्हा सुन्न झालं.उत्तरप्रदेशात उंननाई येथे एका* *तरुणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला.कुठवर चालणार हे मातम?* *रोजचे विविध प्रकारचे करूणादायी मेसेज,वर्तमानपत्रातील लेख वाचून मन उद्विग्न होऊन चाललंय.* *किती दिवस लोकशाहीतील हे विकृत थैमान चालेल कुणास ठाऊक.* *गेली सांगून ज्ञानेश्वरी न* *माणसापरिस मेंढरं बरी।* *हेच मनात घोळवंतय.त्यात उपाय म्हणून नागपूर,बीड,नासिक* *पोलिसांनी होम ड्रॉप, कवच कक्ष,हलो पोलीस हे उपक्रम* *आशादायी, पण* *किती दिवस* *प्रियंका जनावरावर उपचार करायची.त्याचा अंदाज घेऊन एखाद्या* *पशूच्या जवळ जायची.नखे,दात लागतात का? याची काळजी घेऊन* *औषधे,इंजेक्शन द्यायची.कारण ते पशू होते,मात्र त्यांनी तिला माणूस म्हणून कधीच इजा केली नाही.त्या* *काळरात्री माणूस समजून ज्यांच्यावर तिने विश्वास ठेवला ते मात्र कातडे पांघरलेले* *अमानुष लांडगे निघाले.अक्षरशः तिचे लचके तोडले.दिड अब्जांच्या* *जवळपास असलेल्या लोकसंख्येच्या देशात असे चार -सहा सैतान निपजले म्हणजे त्यांचे प्रमाण* *अत्यल्प आहे असे म्हणून स्वतःची समजूत काढूही ,पण त्यांचे उपद्रवमूल्य किती भयंकर आहे* *हे आज सभोवार नजर टाकली तर अनेक* *निष्पाप डोळयांत दाटलेल्या भितीतून दिसून येईल. प्रियांकाने शेवटच्या क्षणी हात जोडून या सैतानांच्या* *नैतिकतेला आवाहन केले असेल,पाया पडली असेल पण ज्या विखारी उन्मादाने त्यांनी क्षणिक* *वासनेपोटी क्रौर्याची परिसीमा गाठली ती क्रूरता त्यांच्यात* *आली कोठून? इतकी अधर्मीवृत्तीअंजना,रिंकू,असिफा,गिता ,ट्विंकल,निर्भया ,इशा* *प्रियंका आणि त्यांच्यासारख्या अनेक* *निष्पापावर झालेल्या अत्याचाराच्या रुपाने का वाढताना दिसत आहे?* *शाळेतून नैतिकतेचे धडे शिकवले जातात,वर्षानुवर्षे पोत्याने पारायणे ऐकली जातात ,तरी* *समाजाचे अधःपतन होताना का दिसतेय?याचे* *एक कारण असे दिसते,मुल्ये सांगून भिनवता येत* *नाहीत.आचरणातूनच बिंबवता येतात.आज असा आचरणशील* *समाज भोवती दिसतोय का? कुठे शोधायचा?आणि कुणी शोधायचा* ? *स्टेजवरुन मूल्यांचे जीभेला न पेलवणारे शब्द ओकले* *जाताहेत.काही नेत्यांच्या आचार विचारातील गैरमेळ* *गाढवालाही लाजवेल असा सर्वांनी बघितलाय .ठराविक सरकारी बाबूंना हरामाच्या पैशांची भूक लागली* *आहे.धान्य सहज उपलब्ध होणार नाही पण दारु मात्र नाक्यानाक्यावर आहे.ग्रंथालये* *शेवटची घटका मोजतांना सगळे डोळसपणे पाहत आहे. इकडे डान्सबार हाऊसफुल्ल* *चाललेत.मैदाने ओस पडत चाललीत.कुशल,मूल्यनिर्धारीत* *खेळाडू तयार होत नाही ,अध्यात्मिक गुरुनींच लैंगिकतेचा बाजार मांडलेला* *उघड डोळ्यांनी बघितला तरी त्यांची पूजा थांबत नाही.विचार जेव्हा* *थांबतत् तेव्हा विकार भडकतात.आज समाजाचे नेमके तेच* *होत चालले आहे.विकार फैलावलेला दिसतोय.* *आज आजी,बाबा,काका,काकू,दादा,ताई* *घराघरातून संपली आहेत.नातवंडावर प्रेम* *करणारे,वर्तनाला वळण लावणारे नाते कुटुंबात उरले नाहीत.* *त्रिकोणी-चौकोनी कुटुंबात पाल्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही.कॉन्व्हेंटचा* *जमाना वाढलाय.पाठीवरचा मायेचा हात लुप्त* *झाला.हातात मोबाईल नावाचा सैतान आला आणि अकाली वयात* *अश्लील व्हिडिओंचे व्यसन अवेळी मुलांना लागले.निसर्ग नियम मोडीत* *काढलाय.काहीही करुन मलाही 'तो'अनुभव घ्यायचा आहे या विकृत भावनेने लोभस मनाचा ताबा* *घेतला.मग एखादी निष्पाप अंजना,रिंकू, प्रियंका,निर्भया,* *असिफा ,ट्विंकल,इशा त्यांना बळी पडली....समाज काही काळ* *हळहळतो,रडतो,मोर्चे काढतो,कोर्टात चेंडू जातो आणि गडद रेषा काही* *काळ पुसट होत जाते .पुन्हा गडद झाली की पुन्हा* *काही काळाने पुसट होते.किती दिवस चालायचं हे पाप.* *पालकांनी ज्याप्रमाणे ते बॅंकेतली रोकड वारंवार चेक करतात त्याप्रमाणे आपल्या पाल्याच्या ही* *बचत डोक्यात ठेवून वेळोवेळी डोकावून,चेक केली* *पाहिजे. एखादीं गोष्ट सडली तर तिचा दुर्गंध पसरतो .इतका* *सैतानी अत्याचार हे काही त्या नराधमांचे तत्कालिन कृत्य नव्हते.मेंदू सडण्याची प्रक्रिया खूप* *अगोदर झाली असली पाहिजे.सजग पालकाला हे सहज जाणवू* *शकते.यासाठी पाल्याशी सुसंवाद ठेवला पाहिजे.मेंदू सडत असलेला दिसला तर वेळीच उपाय केला* *पाहिजे.यासाठी कुटुंबाला वेळ दिला पाहिजे. नाहीतर एखादी निष्पाप (मग* *ती स्वतःच्या घरातीलही असेल) वारंवार बळी* *जाईल.* *समाजात चांगल्या लोकांची संख्या जास्त असली तरी व्यक्तीत लपलेला* *सैतान ओळखणारी 'एक्स-रे व्हिजन 'दृष्टी अजून विकसित झाली नाही.त्यासाठी* *सजगता हाच पर्याय आहे.मुलींनी सावधगिरी बाळगली पाहिजे.* *पालकांनीही दक्ष राहिले पाहिजे.आपल्या घरात ,आप्तांत ,असा गुन्हेगार असेल* *तर त्याला पाठीशी घालता कामा नये.अशा गुन्हेगारांना फाशीच झाली पाहिजे.तरच थोडा वचक* *राहण्याची शक्यता आहे.* *पटलं तर अंमलबजावणी स्वतःपासून करा.किती म्हाताऱ्या मेल्या तरी काळ* *सोकावण्याची वाट बघू नका ही विनंती.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माझा जसा परमेश्वरावर विश्र्वास आहे तसाच परमेश्वरानंतर पुस्तकावर जास्त विश्वास आहे.आणि परमेश्वराखालोखाल मी पुस्तकालाच मानतो. कारणही तसेच आहे.पुस्तके ही वयाच्या अगदी तिसऱ्या चौथ्यापासून साथ धरली आणि आजही त्यांचीच साथ आहे.पुस्तकामुळेच जीवनाला अर्थ आला,त्यानेच अन्नापाण्याला लावले, संस्कारक्षम बनवले,अज्ञान दूर घालवले,माणूस म्हणून जे काही घडलो ते ह्या पुस्तकामुळेच...! अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवले त्या पुस्तकांनीच, जीवन कसे जगायचे,जीवनाचा आनंद कसा घ्यायचा,मन स्थिर कसे ठेवायचे,संयम कसा राखायचा,समोरच्या व्यक्तीसमोर आणि जगासमोर कसा व्यवहार करायचा हे पुस्तकांनीच शिकवले.पुस्तकाचा जन्म कधी झाला हे जरी माहीत नसले तरी पुस्तके ही प्रत्येक पिढीला आदर्शच राहून व्यक्तीला,समाजाला आणि राष्ट्राला चांगले आदर्श दिशा देणारे परमेश्र्वरच आहेत.थोरांचे विचार,संतांचे उपदेश,विचारवंतांचे विचार हे पुस्तंकांच्या किंवा ग्रंथांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे कार्य पुस्तकातूनच होते.म्हणून ज्ञानप्राप्तीचा मूळ पाया हा पुस्तकांचाच आहे.प्रत्येकांनी पुस्तकाच्या सानिध्यात राहायला तर हवेच.आपल्या ज्ञानाची भूक शमविण्याचे काम ही पुस्तकेच करतात.एकवेळ उपाशी राहिले तरी चालेल पण पुस्तके आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही अशी भूमिका जर प्रत्येकाने घेतली आणि आपल्या घरात एक पुस्तकांसाठी छोटा खाणा किंवा एखादी जागा ठेवावी आणि नित्यनेमाने त्यातील एखाद्या पुस्तकाचे वाचन करावे.असे जर केले तर आपल्या मनावर असलेला ताण कमी तर होतोच पण एखाद्या संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग निश्चितच सापडतो.माझे ज्या ज्या वेळी मन कोणत्याही कारणाने अस्थिर झाले असले तरी अशावेळी मी हातात एखादे पुस्तक घेऊन एका कोपऱ्यात वाचत बसतो आणि काही काळानंतर आलेला ताण हळूहळू कमी होतो तो केवळ पुस्तकामुळेच. प्रत्येकाच्या जीवनात जर सुख,शांती,समाधान, संस्कार,योग्य दिशा,जगण्याची आशा यांना मिळवण्याचे एकमेव माध्यम फक्त पुस्तकेच आहेत.त्यांच्या सानिध्यात राहायला शिकले पाहिजे. पुस्तकेच माझ्या खरे जीवन जगण्याचे आशाकेंद्र आहे .अशा पुस्तकरुपी परमेश्वराला शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या हृदयात स्थान आहे हे निर्विवाद सत्य आहे. व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 📚📕📚📕📚📕📚📕📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता* पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ? '' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ? मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment