✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 28/11/2019 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १०९५ - क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले. ● १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला ● २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर. 💥 जन्म :- ● १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री. ● १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी. ● १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता. ● १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ. 💥 मृत्यू :- ● १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक. ● १९६७ - सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना निमंत्रण, विविध जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांना देखील बोलावण्यात आले आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विधानभवनात महाराष्ट्रातील २८८ नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी एखाद्या 'यजमाना'प्रमाणे सर्वांचं स्वागत केलं.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कार्टोसॅट-3 या उपग्रहाचे श्रीहरिकोटा इथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय. पीएसएलव्ही-सी 47' या प्रक्षेपकाद्वारे कार्टोसॅट-3 अवकाशात झेपावलंय. कार्टोसॅट-3 हे पृथ्वीची छायाचित्रं घेणं आणि मॅपिंगसाठी उपयोगी ठरणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *सत्ता स्थापनेच्या घडामोडीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी चर्चेचा केंद्रस्थानी, त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार त्यांची उचलबांगडी करून राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रांची वर्णी लागण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यात भाजप विरोधी बाकावर; देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एएनआय' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रीपदासह १५ मंत्रिपदे, राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदासह १३ खाती तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद न देता विधानसभेचे अध्यक्षपद सोडण्यात आले आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मुंबईत होणारा ट्वेंटी-२० चा आंतरराष्ट्रीय सामना मुंबईवरुन हैदराबाद येथे हलवण्यात आला असून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ११ डिसेंबरला मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना होईल.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले* भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव.......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चिखलदरा* चिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे. महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेत हे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत. चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'प्रकाशवाटा' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?* प्रकाश आमटे 2) *ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?* चित्रपट 3) *टाटा कंपनीचा 'नॅनो कार प्रकल्प' कोठे आहे ?* सानंद ( गुजरात ) 4) *भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ?* SBI 5) *कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला गेला आहे ?* 86 वी *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 राम चव्हाण, नांदेड 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हसत दु:खाचा केला मी स्विकार,* *वर्षिले चांदणे पिऊन अंधार..* *प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,* *आनंदयात्री, मी आनंदयात्री !* *दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?* *दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *ज्ञान ही अशी शिदोरी आहे* *की ती माणसाला नेहमीच* *प्रत्येक क्षेत्रात एका ठराविक उंचीवर* *नेऊन ठेवते.* *अजून अस गुरुत्वाकर्षण तयार झालं* *नाही की ते ज्ञानाला* *नैसर्गिकरित्या आपल्याकडे खेचून* *घेईल.* *त्याला मिळविण्यासाठी प्रयत्न* *करावेच लागतात. एकदा मिळविले* *की कोणत्याही ब्रम्ह* *पंडितांची ताकद नाही की तो* *तुमच्याकडून हिसकावून घेईन.* *ह, एक मात्र नक्की की आता* *एकलव्य बनू नका.* *धर्माचा ,ज्ञानाचा ठेका घेतलेली* *मंडळी तुमच्या मार्गात अनंत अडचणी उभ्या करतात.* *स्वामी विवेकानंद यांना शिकागो येथे बोलण्यासाठीचे प्रमाणपत्र भारतीय* *शंकराचार्य यांनी दिले* *नाही,ते श्रीलंकेच्या बौध्द* *धर्मप्रसारक विद्वानांनी दिले.* *त्यांचे 5 मिनिटे कमी करून* *विवेकानंदांना दिले,आणि त्याच 5* *मिनिटांनी 1893 साली स्वामींनी* *जगभरात नावलौकिक* *मिळवला व आपली* *धर्म पताका जगभर* *फडकावली.* *अजूनही तो दैत्य* *उरात धडधड करतो.* *विनंती-ज्ञानाची भूक प्रचंड* *असुद्या। कुठेही, केव्हाही,कसेही* *फक्त रुचकर ज्ञान मिळेल त्याचे सेवन* *करा,नक्की सुदृढ व्हाल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी. ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रता* राम ,माझा (सिमा) व सुमनचा मित्र आहे. तो आजारी पडला. म्हणून त्याला भेटायला आम्ही निघालो. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो आणि त्याला फळे दिली. “काळजी घे. वेळेवर जेवण कर, औषध घे लवकर बरा हो ”अशी तिकडे सुमन म्हणाली. तू लवकर बरा हो मग आपण खूप खूप खेळू, मजा करू” असे सिमा म्हणाली राम म्हणाला “सीमा ,सुमन तुम्हाला भेटून मला आनंद झाला. आता मला बरं वाटतंय.” रामने आमचे आभार मानले. निघताना रामचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाला. *तात्पर्य : कधी पण मित्राच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. हीच खरी मिञता असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment