✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 16/11/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक सहनशीलता दिवस* *राष्ट्रीय पत्रकार दिवस* 💥 ठळक घडामोडी :- ● २०१३- क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची क्रिकेट मधून निवृत्ती . 💥 जन्म :- ● १९६३-मिनाक्षी शेषाद्री,अभिनेत्री ● १९७३-पुलेंल्ला गोपीचंद,बॅडमिंटनपटू ● १९२२ - जीन ऍमडाल, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ. ● १९४० - क्रिस बाल्डरस्टोन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. ● १९७१ - वकार युनिस, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १२७२ - हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा. ● २००६ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद असल्याचा फलक काढला, ऑफिसला मात्र टाळं, कामकाज अजूनही सुरु नाही, रुग्ण मदतीच्या प्रतीक्षेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचं राज्यपालांनी संचालन करावं, देवेंद्र फडणवीस यांची विनंती, शिवसेना-राष्ट्रवादीकडूनही मुख्य सचिवांना निवेदन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री, काँग्रेस-राष्ट्रवादीला अडीच वर्षे उपमुख्यमंत्रीपद, शिवसेनेने प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती, तर महाशिवआघाडीचे नेते उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपालांना भेटणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मनसे अध्यक्ष राज ठाकरे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या भेटीसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात, प्रकृती स्थिर असल्याची राज यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करा, हायकोर्टाचे रेल्वेला निर्देश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *दिल्लीत प्रदूषणाने गाठली कमाल पातळी; जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर, प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर उपाययोजन राबवल्या जात आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *इंदूर : मयांक अगरवालच्या खणखणीत द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियानं इंदूर कसोटीच्या पहिल्या डावात 343 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सायकल ...........!* लहानपणी सर्वांचीच आवडती अशी सायकल. आपल्या वयाचा कोणी सायकल चालवत असे तर आपल्या मनात देखील सायकल चालविण्याची उत्कट इच्छा निर्माण व्हायची. पण सायकल खरेदी करण्याऐवढं पैसे जवळ असायचे नाही म्हणून एक तर त्या सायकलवाल्या मुलांशी मैत्री करायची आणि एखादं चक्कर मिळवायची. गावात काही दुकानदार छोटी छोटी चार पाच सायकल ठेवायची आणि घंटाच्या हिशोबाने सायकल फिरविण्यास किरायाने द्यायचे. खाऊसाठी दिलेला पैसा ........... पूर्ण लेख खलील लिंक वर वाचता येईल http://nasayeotikar.blogspot.com/2019/10/blog-post_30.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आंधळे लोक कसे परीक्षा देतात ?* 📙 अंध व्यक्ती आजकाल उच्च शिक्षण घेताना आपल्याला दिसतात. पूर्वी मात्र ते शक्य नव्हते. कारण बघता येत नसल्याने अंध लोकांना ज्ञानाची सर्वा दालने बंद होती. सहाजिकच त्यांच्या जीवनात खर्या अर्थाने अंधार होता. अंध व्यक्ती दुसऱयांच्या उपकारावर, सहानुभूतीवर अवलंबून होत्या. त्यांना स्वतःचे कर्तृत्व दाखवायला, स्वतःच्या पायावर उभे राहायला संधी मिळत नव्हती. ब्रेलच्या संशोधनामुळे मात्र अंधांच्या जीवनात आशेच्या किरणांनी शिरकाव केला. अंध व्यक्तीचे स्पर्शज्ञान खूपच चांगले असते. या स्पर्श ज्ञानाच्या कौशल्याचा वापरच ब्रेल लिपीत केला जातो. यात प्रत्येक अक्षर हे कागदावर उंचवट्याच्या (सुई टोचून केलेल्या) स्वरूपात लिहिले जाते. या उंचवट्यांची संख्या, रचना स्पर्शाने लक्षात घेऊन अंधांना अक्षर ओळख करून घेता येते. याला ब्रेल लिपी असे म्हणतात. ब्रेल लिपीत लिहिलेल्या पुस्तकांच्या साहाय्याने अंधांना ज्ञानाच्या विविध दालनात प्रवेश करणे शक्य झाले आहे. त्यामुळेच आता आपल्याला पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अंध व्यक्ती दिसतात. अंध व्यक्तींना सहानुभूती वा दयेपेक्षा संधी मिळण्याची गरज आहे. त्यांची गुणवत्ता व कौशल्य वाढवण्याचे काम ब्रेल लिपीने केलेले आहे. साहजिकच अंध लोक इतरांच्या बरोबरीने विकास साधू शकत आहेत. ब्रेल लिपीच्या आधारेच अंध व्यक्ती परीक्षा देतात. अशी ही ब्रेल लिपी जणू अंधांसाठी वरदानच ठरली आहे. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *'गोविंदाग्रज' हे टोपण नाव कोणाचे ?* राम गणेश गडकरी 2) *'जागतिक तंबाखूविरोधी दिन' केव्हा साजरा करतात ?* 31 मे 3) *पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण ?* कमला सोहनी 4) *राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण ?* डॉ केशव बळीराम हेडगेवार 5) *उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?* 21 जून *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 संतोष पेटेकर, धर्माबाद 👤 छोटू पाटील बाभळीकर 👤 मोहन कानगुलवार 👤 सदानंद बदलवाड 👤 महेश देबडवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एका मुलाने काहीतरी खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फारसा ओरडला नाही किंवा त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत.* *तसेच आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते.* *ज्या दातांनी सिंह मोठ-मोठे प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलून एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेतो, हे लक्षात असू द्यावे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काल आपण जननायक बिरसा मुंडा यांची 144 वी जयंती साजरी केली.* *काय होत या माणसाकडे, अवघे 25 वर्ष आयुष्य, एकटा इंग्रजांशी लढला.* *म्हणूनच आज अजरामर आहे.* *हे जगणे अवघड झाले आता* *सोन्याचा होता धूर,* *आता नुसत्याच उरल्या बाता।* *चकाकत्या खोट्याला कवटाळीती* *सगळे।* *सत्याला इथे वाली न कुणी आता।* *हे विदारक दृश्य आपल्याला समाजात* *पदोपदी अनुभवायला* *मिळते.* *पण अंतिम सत्य काही वेगळेच* *असते.24 कॅरेट लाच नेहमी कस* *लागतो.* *बिरसा मुंडा 24 कॅरेट होते.* *समाजात जो सरळ व सत्याने वागतो* *त्याला नेहमीच अन्यायाचे* *घाव सोसावे लागतात.* *कारण....* *जंगलात लहान मोठी,* *वाकडी तिकडी* *अशी अनेक प्रकारची झाडे* *वाढलेली असतात.* *परंतु अशी झाडे कोणीच* *तोडत नाही.* *पण जी सरळ वाढलेली असतात* *त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव* *सोसावे लागतात.* *रस्ता जर खड्डयांचा आणि कच्चा असला ना तर त्यावर लोड कमी* *असतो.पण तोच प्लेन आणि सुपर असुद्या सगळ्या गाड्या त्याच* *रोडवरून धावतील, त्याच्यावरच जोरजोराने आदळतील.* *तरीही निवड सत्याचीच करा.* *सगळ्यात महत्वाचे म्हणजे* *सत्य मेव जयते।* *सत्य परेशान होता है,पराजित नही।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• वर्तमान स्थितीमध्ये आपण कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी खूप विचार करतो.हे माझ्या हातून पूर्ण होईल का ? पूर्ण होईल का असा जेव्हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा नक्कीच समजून घ्यायचे की,आपला आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.हा आत्मविश्वास जर आपल्याला मजबूत किंवा ठाम ठेवायचा असेल तर आपल्या मनाची कामातली एकाग्रता सातत्याने ठेवायला हवी.सद्यस्थितीत मला हे काम पूर्ण करायचे आहे आणि ते करावेच लागणार त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही अशी मनाची धारणा ठेवली आणि काम केले तर नक्कीच तुमचे काम पूर्ण होईल.त्या कामातून आलेले यश हे तुमच्या पुढच्या कामासाठी आणि पूर्णतेसाठी शुभसंकेत आहेत.त्यामुळे अजून पुन्हा जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.मग ते वर्तमानातील असो की भविष्यातील असो.तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या कामातील सातत्य हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धनाची लालसा* सुंदरपुर गावात शामराव नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याला चार मुले होती . त्याचे चारीही मुलं खूप आळशी आणि खोटे बोलणारे होते. शामराव त्याच्या चारीही मुलाशी खूप परेशान झाला होता. त्याचे मुलं इकडे तिकडे बसून एकमेकांशी गप्पा गोष्टी करायचे. म्हणून आता शामरावांनी ठरवलं होतं, की मी यांचा अल्लडपणा आळशीपणा दूरच करून राहील. त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या बायको ची मदत घेतली. त्यांच्या बायकोने एक उपाय सांगितला. त्याच्यासाठी तो तयार झाला. ते सकाळी तिर्थयात्रेला निघाले त्यांनी त्या चारही भावांना सांगितलं “,, तुम्हाला जर धनाची आवश्यकता राहिली तर तुम्ही शेतामधून पुरलेले धन घेऊन घ्या. ते तीर्थयात्रा निघाले. तसेच पळत असते चारही भाऊ शेतात गेले, त्यांनी खड्डा खोदला तर त्यांना काहीच नाही मिळाले. ते घरी डबल वापस गेले. तेव्हा त्यांच्या मित्र हरिनाथ आले होते. “, ते म्हणाले, तुम्ही खड्ड्यात खोदून घेतला आता त्यामध्ये छोटे छोटे बिया टाकून द्या. त्या चारही भावांनी असेच केले. त्यांच्या शेतातून अंकुर (पिके) निघू लागली. ते आश्चर्यचकित झाले . त्यांना खूप आनंद झाला. बोध: कधीही धनाची लालसा करु नये. परिश्रमाचेच फळ गोड असते. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment