✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 27/11/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर. ● २०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला. 💥 जन्म :- ● १८८८: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म. ● १८४३ - कॉर्नेलियस व्हान्डरबिल्ट तिसरा, अमेरिकन उद्योगपती. ● १९०३ - लार्स ऑन्सेगर, नोबेल पारितोषिक विजेता नोर्वेचा रसायनशास्त्रज्ञ. ● १९८६ - सुरेश रैना, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● १९७८ - लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका. ● २००८: भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळं बहुमत चाचणी आधीच अल्पमतात आलेलं फडणवीस सरकार अवघ्या साडेतीन दिवसात कोसळलं, अखेर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *येत्या एक डिसेंबरला शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार आहे. ठाकरे घराण्यातील या पदावर विराजमान होणारे उद्धव ठाकरे पहिले नेते ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने मिळून तयार केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय या तिन्ही पक्षांनी घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भाजपा आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली आहे. राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे : अजिंठा लेण्यांसंदर्भात संशोधन करून लेखनाद्वारे भारतीय कला आणि वास्तुशिल्पकलेतील अजोड कलाकृती असलेल्या अजिंठा लेण्याची जगभराला ओळख करून देणारे ज्येष्ठ अभ्यासक वॉल्टर एम. स्पिंक (वय ९१) यांचे अमेरिकेमध्ये नुकतेच निधन झाले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई: राज्याच्या नव्या विधानसभेचे आज होणार गठन, त्यासाठी आज सकाळी ८ वाजता आमदारांना विधानसभेत हजर राहण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या असून नवनिर्वाचित आमदारांचाही शपथविधी होणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *फिरकीपटू रविचंद्रन आश्विनने नुकत्याच झालेल्या मालिकेत चांगली कामगिरी केल्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत बढत मिळाली असून तो नवव्या क्रमांकावर आला आहे. ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *निवृत्तीबद्दल महेंद्रसिंग धोनीने घेतला अंतिम निर्णय, IPL नंतर क्रिकेटला रामराम करण्याची शक्यता क्रिकेट वर्तुळात व्यक्त केली जात आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कथा - सुंदर* त्याचं नाव सुंदर, तसं त्याचं कामही सुंदर त्याप्रमाणेच मन ही सुंदरच होतं. परंतु सारेच जण त्याला बंदर म्हणायचे. कारण ही तसेच होते, मूळात तो दिसायचा आफ्रिका देशातील निग्रो लोकांसारखा एकदम काळाकुट्ट, अगदी बारीक नाक आणि गरगरीत लहान डोळे गालात खोल........ वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_90.html कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🐤गोष्ट नव्या कावळा चिमणीची 🐧 कावळा चिमणीचा शेजारी .कावळ्याचं घरं शेणाचं , चिमणीचू घर मेनाचं.पाऊस झाला .कावळ्याचं घर गेलं वाहून, तो गेला चिमणीकडे धावून .चिमणी पिलातचं होती व्यस्त, कावळा भिजभिजला मस्त . दिवस गेला , महिने गेले , वर्षे गेली .चिमणीचे पिलू भरारी घेऊन गेलं परदेशी .त्याच्या आठवणीनं चिमणी रोज रडे, फोटो त्याच्या घेऊन उशाशी . पिल्लू परदेशातून पैसे पाठवी , चिमणीला पिलूचं हवे होतं , पैसे नको म्हणून खर्च न करता नुसतेच साठवी ...! चिमणी अखेर आजारी पडली , तेव्हा कोणी नाही आले धावून .शेवटी कावळ्यानेच मदत केली , तर चिमणीचे डोळे गेले अश्रूंनी वाहून . कावळा म्हणाला चिमणीला , "विचार करु नको फार, लक्षात ठेव मात्र, घरासोबत जोडावे मित्रही चार . मित्र जर असतील पक्के ,त्यांच्यासोबत काढता येते, आपले आयुष्य अख्खे .....! *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *राष्ट्रीय कांग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?* मुंबई 2) *महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मागणी आधारित कोणता प्रकल्प राबविण्यात आला ?* जल स्वराज्य प्रकल्प 3) *डॉ अभय बंग व राणी बंग आदिवासीकरिता कोणत्या जिल्ह्यात आरोग्य विषयक कार्य करीत आहेत ?* गडचिरोली 4) *नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना ही केव्हापासून नियुक्त झालेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे ?* 1 नोव्हेंबर 2005 5) *कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ कोठे आहे ?* रामटेक ( नागपूर ) *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 डॉ. बबन जोगदंड, यशदा पुणे 👤 गायत्री सोनाजे, साहित्यिक 👤 राहुल कुमार 👤 पंकज सेठिया 👤 ओंकार बच्चुवार 👤 ऍड. निलेश भाऊ पावडे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.* *भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *नवीन वर्षाला एक महिना अवधी उरलाय.* *जीवनात नवे संकल्प करण्याची वेळ आली. काहीतरी नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प करा.* *तुम्ही केलेला संकल्प आणि संकल्पाच्या दिशेने जाणारी वाट ही नक्कीच तुमच्या यशाकडे जाणारी* *असली पाहिजे.कारण तुमचे संकल्प हे तुमच्या* *ध्येयपूर्तीसाठीच असतात.तुमच्या इच्छा, आकांक्षा,तुमचे कार्य आणि* *तुमचा विश्वास त्यात दडलेला असतो.तुमच्या संकल्पामुळे तुमच्या* *जीवनाचे तर कल्याण होईलच त्याचबरोबर इतरांना संकल्प करण्याची प्रेरणा सुध्दा* *मिळेल.* *आखताय ना मग योजना,* *आणि सफलतेच्या दृष्टीने वाटचाल सुध्दा करा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवन* *समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली*... *तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि* *"समुद्र चोर आहे".* *त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि* *"समुद्र पालनकर्ता आहे".* *एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते* *"समुद्र खुनी आहे".* *एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो* *"समुद्र दाता है".* *अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते* *लोकं काही म्हणू द्या*... *परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो*... *आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो* *जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...* *भूतकाळातील विचार करत बसू नये*. *यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये*. *जर जीवन सुख शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता* *जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात...* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment