✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 18/11/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९२८: वॉल्ट डिस्ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म. ● १९३३: प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला. ● १९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली. ● १९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले. 💥 जन्म :- ● १९०१: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म. ● १९१०: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म 💥 मृत्यू :- ● १९९८: सातार्याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन. ● १९९९: स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु, मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधलं दुसरं अधिवेशन, वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा विधेयकाकडे लक्ष* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शिवसेना अधिकृतरित्या एनडीएतून बाहेर, भाजपची घोषणा, दोन्ही सभागृहात सेना खासदार विरोधी बाकांवर बसणार, भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *नागपूर-अमरावती महामार्गावर पेट्रोलियम पदार्थाचा टँकर पेटला, ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू, आगीच्या ज्वाळांमुळं महामार्ग काहीकाळ ठप्प* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *देशातील 425 पुलांपैकी 281 पुलांची अवस्था वाईट, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटने हा सर्व्हे केला असून देशात गुजरातमध्ये सर्वाधिक पुलांची स्थिती वाईट असल्याचे नमूद केले आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *श्रीलंकेतील राष्ट्रपती निवडणुकीत श्रीलंका पोडुजाना पेरमुना पक्षाचे उमेदवार गोताबेया राजपक्षे हे विजयी झाले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि सलामीचा फलंदाज मयांक अग्रवाल यांनी आयसीसीच्या अद्ययावत कसोटी क्रमवारीत आपले आजवरचे सर्वोत्कृष्ट स्थान पटकावले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मरावे परी अवयवरूपी उरावे* जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ? गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना ............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *फुप्फुसे* 📙 डावे व उजवे अशी दोन फुप्फुसे छातीच्या पोकळीत असतात. हृदयापूरती जागा सोडून अन्य सारी छातीची पोकळी त्यांनीच व्यापलेली असते. प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी पातळ पिशवीसारखे आवरण असते. त्यालाच 'प्लुरा' असे म्हटले जाते. या आवरणाच्या आत दोन पदरांमध्ये बुळबुळीत पदार्थ असतो. त्यामुळे फुफ्फुसे आकुंचन प्रसरण पावताना घर्षण होत नाही. मात्र या दोन पदरांमध्ये निर्वात पोकळी अस्तित्वात असते. वातावरणातील हवा आपण फुप्फुसांत ओढून घेतो, त्याला त्याची मदत होते. नाकाने आत घेतलेली हवा प्रथम श्वसननलिकेद्वारे व त्यानंतर तिच्या झालेल्या असंख्य शाखांतून फुप्फुसांत पोहोचते. फुप्फुसांचा रंग भुरा करडा असतो. असंख्य वायूकोशांनी फुप्फुस बनते. प्रत्येक वायूकोशाला वेढणारी एक रक्तवाहिनी असते. प्रत्येक वायूकोशापर्यंत श्वासनलिकेची एक अत्यंत सूक्ष्म शाखा पोहोचलेली असते. वायूकोशाभोवती केशवाहिन्यांचे जाळे असते. त्यातील रक्तातील लाल पेशी प्राणवायू शोषून घेतात. कार्बन डायॉक्साइड किंवा कर्बद्विप्राणिल वायू व पाण्याची वाफ वायुकोशात सोडले जातात व उच्छवासाद्वारे ते बाहेर टाकले जातात. आपल्या श्वासातून वाफ बाहेर पडताना जाणवते, त्याचे हेच मूळ होय. वायूकोशांमधील स्थितीस्थापक तंतूंमुळे ते श्वास आत घेताना सहज फुगतात व पूर्वस्थितीला येताना उच्छ्वास बाहेर टाकतात. यामध्ये होणाऱ्या क्रियेलाच आपण प्राणवायू प्रदान असे म्हणतो. श्वास घेतला, तर सुमारे ५०० घन सेंटीमीटर हवा आपण आत ओढतो. त्यातील फक्त ३५० घन सेंटीमीटर हवाच वायूकोशात पोहोचते. अन्य हवा घसा, श्वासनलिका येथेच राहते. श्वास सोडल्यावरसुद्धा ३०० घनसेंटीमीटर हवा फुप्फुसांतच शिल्लक असते. दीर्घ श्वसन, प्राणायाम, भस्त्रिका यांच्या अभ्यासात या साचून असलेल्या हवेला आपण मुद्दाम बाहेर फेकतो. तसेच फुप्फुसांची स्थितीस्थापक क्षमताही या क्रियेत वाढते. म्हणून श्वसनाच्या आजारात त्यांचा उपयोग होऊ शकतो. निरोगी माणसाची श्वसनाची क्षमता वाढते. पाणबुडे, ऍथलेट, खेळाडू यांनी ही क्षमता कमावलेली असते. फुप्फुसांमध्ये जंतूंचा शिरकाव झाल्यास रुग्ण गंभीररित्या आजारी होतो. कारण फुप्फुस व फुप्फुसावरण दाहामध्ये शरीराचा प्राणवायू पुरवठा खंडित होऊ लागतो. अशा वेळी कृत्रिमरीत्या प्राणवायू देऊन किंवा तीव्र आजारात कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या यंत्राचा (व्हेंटिलेटर) वापर करून रुग्णाला मदत करणे आवश्यक ठरते. *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?* 1 जुलै 1961 2) *'चले जाव'ची घोषणा कोणी केली ?* महात्मा गांधी 3) *'लोकशाहीर' , 'फकिराकार' कोणाला संबोधले जाते ?* अण्णाभाऊ साठे 4) *महात्मा फुले यांनी अस्पृश्याच्या मुलांसाठी पहिली शाळा केव्हा उघडली ?* 3 जुलै 1886 5) *महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो ?* 1 जुलै *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 अरविंद काळे, सहशिक्षक पीपल्स हायस्कूल, नांदेड 👤 नितीन रायपुरे, अकोला 👤 पिराजी भूमन्ना, धर्माबाद 👤 दत्ताहारी पाटील पवार 👤 अनुराधा ताल्लू 👤 धनंजय पापनवार, नांदेड *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी जीवन म्हणजे नंदनवनच. त्यात श्रमाचं बीज पेरून घामाच्या धारांनी सिंचन केलं पाहिजे. तरच त्याला यशाची सुंदर फळं लागतात. माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला आणि कोणासाठी जगला यालाच आधिक महत्व. शंभर वर्ष स्वत:साठी जगला तर तो मेल्यासारखाच असतो. पण इतरांसाठी जगण्याचा आनंद काही वेगळाच. माणसाला चांगल्या कामाचं फळ चांगलं मिळतं. वाईट कामाचं फळ वाईटंच मिळतं. 'जसं करावं तसं भोगावं'! या संदर्भात संत कबिरांचा एक दोहा लक्षात ठेवण्यासारखा आहे.* *"क्या खूब सौदा नकद है,* *इक हाथसे दे, इक हाथसे ले!"* *चांगलं काम करता करता मृत्यूचं चुंबन घेण्यात मजा आहे. नाही तर मरत नाही म्हणून जगण्यात काय अर्थ आहे. माणसानं जगावं तर प्रतिष्ठेनं! त्यासाठी जीवनाचा क्षण आणि क्षण परिश्रमानं सजविला पाहिजे. तरच जगण्यात आनंद. ती बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही. मनाच्या गाभा-यातून आनंदाच्या उर्मी उसळतात. मनाला सतत आनंदी ठेवण्यासाठी काय करावं? कामाच्या वेळी काम करावं आणि खेळाच्या वेळी खेळावं, हाच आनंदाचा खरा मार्ग. मग आनंदी जीवन म्हणायचं तरी कशाला? जे प्रेमानं ओथंबलेलं, ज्ञानानं भारावलेलं आणि विश्वासानं परिपूर्ण असतं ते 'आनंदी जीवन'.* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●•• 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *एक फिल्मीगीत मनाला खूप भावलं* *होत.ते अस,* ----- *जिना है तो, हसके जियो,* *जीवन मे एक पल भी खोना ना।* *हसना ही तो, है जिंदगी,* *रो रोके* *जीवन बिताना ना।* *खरच आहे,जीवन क्षणभंगुर आहे,* *म्हणतात ना पाण्याचा बुडबुडा आहे.* *मग जगताय ना?* *हसत राहिलात तर संपूर्ण जग*. *तुमच्या जवळ आहे*, *तस नाही* *केलं तर डोळ्यातील अश्रुंना** *देखील डोळ्यात जागा राहत नाही*. | *जीवन जगताना जगाचा जास्त* *विचार करू नका..* *कारण जग ज्याच्याकडे काही नाही* *त्याला हसत आणि* *ज्याच्याकडे सर्व काही आहे* *त्याच्यावर जळतं...हाच तर सृष्टीचा* *नियम आहे, मग या* *लोकांसाठी आपण का कुढायचं, घ्या* *जगून.* *तर मग हसा ,हसवत रहा,* *जगा आणि जगुदया।* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मृत्यू हा अटळ असला तरी काही लोकांना त्याची खूप भीती वाटते.मृत्यूची भीती वाटते म्हणून तो काही चुकणार आहे का ? तो तर कधी ना कधी येणारच.त्याच्या भीतीने काही लोक खाणेपिणे,काम न करणे,आपल्याच विचारात गढून जाणे, कुणाशीही नीट वागायचे नाही,कुणाला व्यवस्थित बोलायचे नाही.स्वत:चेच स्वत:ला चिडचिडेपणा करुन घ्यायचा असे कितीतरी प्रकार मनावर ताण आणून जीवन जगत असतात.असे केल्याने काही फरक पडतो का ? विनाकारण आपणही दुःखी व्हायचे आणि इतरांनाही दुःखी करायचे.यातून काही मृत्यू टाळण्याचा मार्ग सापडतो का ? नाही ना. मग मृत्यूला तर हसत हसत स्वीकारावे.त्याचे भय बाळगायचे तरी कशाला ? तो आजही येणार आणि उद्याही येणार.पण आपण आपल्या मनाला विचारात, दुःखात टाकून आहे त्या जीवनसुखापासून दूर रहायचे का ? अशामुळे आपण आपला आनंद मिळवायचा नाही आणि इतरांनाही आनंद मिळवू द्यायचा नाही असेच ना ! असा विचार कधीही मनात येऊ द्यायचा नाही.तुम्ही ही आनंदाने जगा आणि इतरांनाही आनंदाने जगू द्या.हीच तर खरी जीवनाची गुरुकिल्ली आहे. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🦋🍂🦋🍂🦋🍂🦋🍂🦋 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्याचा शेवट* एका व्यापाऱ्याला वाईट सवयी होत्या. त्याला या सवयींपासून सुटका करून घ्यावयाची होती. मात्र अनेक प्रयत्नानंतरही तसे होवू शकले नाही. त्याला कुणीतरी संत फरीद यांचे नाव सुचविले, तो तत्काळ त्यांच्याकडे गेला. आणि आपल्याविषयीची सर्व माहिती सांगून विचारू लागला, "माझ्या वाईट सवयी कशा सुटतील?" संतानी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तरी तो व्यापारी हट्टाला पोहोचला. त्याने रोजच येवून संताना विचारणे चालू केले. संत फरीद यांनीही त्याला रोजच टाळले. एके दिवशी व्यापारी अटटहासाला पेटला तेंव्हा फरीद म्हणाले,"मी तुला काय मार्ग दाखवू? तुझे जीवन आता ४० दिवसांचे उरले आहे. इतक्या कमी दिवसात तू कसा सुधारशील? तुझ्या वाईट सवयी कशा काय सुटतील?" हे ऐकताच व्यापारी तणावात आला. त्यानंतर त्याच्या वागण्यात फरक पडू लागला. इतके दिवस केलेल्या वाईट कर्मांची त्याला लाज वाटू लागली, सारखा पश्चाताप करू लागला. संत सहवासात राहणे, भजन पूजन करणे, सात्विक खाणे पिणे, शुद्ध आचरण करणे इत्यादी क्रिया तो करू लागला. शेवटी ४० वा दिवस उजाडला, व्यापारी मरणाची वाट पाहत होता. अचानक त्याला संत फरीद यांनी बोलावले व सांगितले," मुला, या ३९ दिवसांचा विचार करता तूच मला सांग कि या ३९ दिवसात तू किती वेळेला दुष्टपणे वागला, खोटे बोलला, वाईट कर्म केले?" व्यापारी म्हणाला," हे जे तुम्ही म्हणता ते एकदाही केले नाही. पण त्याचा माझ्या मरणाशी काय संबंध?" संत म्हणाले, " यालाच मरणाची भीती म्हणतात, कि रोजचा दिवस हाच जर आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणून घालविला तर वाईट कृत्ये माणसाकडून होत नाहीत. माणसाने असे काम केले पाहिजे कि त्याच्या मागेसुद्धा त्याचे नाव निघाले पाहिजे." यानंतर व्यापारी सुधारला व त्याच्यातील वाईट सवयी निघून गेल्या. त्याच्यातील चांगल्या गुणांना संतानी वेगळ्या पद्धतीने जागृत केले. *तात्पर्य- मानवी जीवनाचा भरवसा नाही. तेंव्हा आता मिळालेल्या क्षणातुनच सदवर्तन आणि सत्कर्म केले जावू शकते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment