✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 30/11/2019 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १८७२ - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला. 💥 जन्म :- १८१७ - थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक. १८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ. १८६९ - गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ. १९१५ - हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ. १९३५ - आनंद यादव, मराठी लेखक. 💥 मृत्यू :- २०१२ - विजय देवधर, मराठी लेखक. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *आरेतील वृक्षतोड आणि या कारशेडला शिवसेनेने पहिल्यापासून विरोध केला आहे. आता या कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या सरकारच्या निर्णयाला पहिला दणका दिला आहे. मेट्रोला स्थगिती नाही, पण कारशेडला स्थगिती दिली असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील विधानसभेचे नवे हंगामी अध्यक्ष बनले आहेत. कालिदास कोळंबकर यांच्या जागी वळसे पाटील यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात विकासदर पुन्हा घसरला, भारताचा जीडीपी गेल्या सात वर्षातील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विधानसभेचे कामकाज दोन दिवस चालणार, आज बहुमत चाचणी तर उद्या अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेता निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *देशातील सर्वात भ्रष्ट राज्यांची यादी जाहीर, देशातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी राज्यांमध्ये राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, तेलंगणा, पंजाब, कर्नाटक, तमिळनाडूचा समावेश आहे. या भ्रष्ट राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *नवी दिल्ली: मोदी सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्री संदर्भात घेण्यात आला मोठा निर्णय, या निर्णयानुसार आता हॉलमार्कशिवाय सोन्याच्या दागिन्यांची विक्री होऊ शकणार नाही. १५ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती केंद्रीय उपभोक्ता मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : एमएस धोनीने त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवर अखेर भाष्यं केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत जानेवारी महिन्यापर्यंत बोलणार नाही, असं धोनीने सांगितलं आहे. मुंबईतल्या एका कार्यक्रमात धोनीला हा प्रश्न विचारण्यात आला होता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रतिलिपी डॉट कॉम वरील गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *सोन्याचे बिस्कीट* माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........ http://nasayeotikar.blogspot.com/2019/11/blog-post_81.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मद्यपानामुळे काय दुष्परिणाम होतात ?* 📙 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' हे खरे असले तरी बोलताना व चालताना सारखेच अडखळणाऱ्या दारुड्याच्या बाबतीत मात्र हे सपशेल खोटे ठरते. मद्यपान करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तरुण वयातच या दारूचे व्यसन लागते. पिक्चरमधील हिरोचे अनुकरण, मित्रांचा प्रभाव, कुतूहल, नाविन्याची आवड, साहसी वृत्ती, मानसिक अस्थिरता अशा अनेक कारणांमुळे लोक मद्यपानाला सुरुवात करतात. एकदा सुरुवात केली कि मग त्याला मर्यादा राहत नाही. आरोग्यावर मद्यपानाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात यकृताचा कर्करोग, मधुमेहासारखा रोग लवकर होणे, रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन हृदयाला रक्त पुरवठा होण्यात अडथळा निर्माण होणे व हृदयविकाराचा झटका येणे हे रोग दिसून येतात. मद्यपान केलेल्या व्यक्तीचे स्वत:वर नियंत्रण नसते. त्यामुळे असे लोक अपघातात सापडतात व मृत्युमुखीही पडतात. मद्यपानाचे आरोग्याखेरीच सामाजिक व आर्थिक परिणामही फार होतात. घरे उद्ध्वस्त होतात. नातीगोती तुटतात. आर्थिक विपन्नावस्था येते. दारू पिऊन व्यक्ती पत्नीला मुलांना मारहाण करते. घराकडे त्या व्यक्तीचे दुर्लक्ष झाल्याने मुलांचे शिक्षण नीट होत नाही. साहजिकच मुले अशिक्षित राहतात. समाजात बेरोजगारी वाढते व गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होते. दारूमुळे यकृत खराब होते आता पायांवर सूज येते पोटात पाणी होते. मेंदूवर परिणाम होऊन मानसिक रोग होतात. अशी ही सर्वनाशक दारू. आधी माणूस दारू पितो व नंतर हळूहळू ती त्याला त्याच्या घरादाराला पिऊन टाकते (संपवते); हे म्हणतात, ते खरेच आहे. त्यामुळे मद्यपानाच्या सवयीपासून दूर राहिलेले चांगले. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'सत्यमेव जयते' हे कशातून घेतलेले आहे ?* मुंडक उपनिषदातून 2) *'क्रांतिकारकांचे बायबल' असे कोणत्या कादंबरीला म्हटल्या जाते ?* आनंदमठ 3) *हरिजन संघाची स्थापना कोणी केली ?* महात्मा गांधी 4) *महाराष्ट्रातील पहिले वायफाय शहर कोणते ?* पुणे 5) *स्वामी दयानंद सरस्वती यांचा कोणता वेदावरील ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाण आहे ?* सत्यार्थ प्रकाश *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 राजेश दरेकर, सहशिक्षक, गडचिरोली 👤 राजेश्वर येवतीकर, येवती 👤 विलास वाघमारे, भैसा, तेलंगणा 👤 रवी बुगावार, धर्माबाद 👤 देविराज पिंगलवार, भोकर 👤 उमेश खोकले *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तुम्ही दु:खाचा स्विकार कराल तेंव्हाच सुखाच्या निकट पोहचाल. आयुष्याचा खरा अर्थ कळेल. राजपुत्र सिद्धार्थ दु:खाचा शोध घेतो, म्हणून ते तथागत गौतम बुद्ध होतात. हेच फार मोठं उदाहरण जगाच्या पाठीवर लिहून ठेवलं गेलंय, ते कुणीच पुसून टाकू शकत नाही. संकटातून, समस्यांतून बाहेर कसे पडायचे, हे विद्यापीठात शिकविले जात नाही. माणसाने स्वयंअध्ययनातून खूप काही शिकायचे असते. आजच्या नव्या पिढीला हे अध्ययन करू द्यायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. खुशी काही सेकंदांची असते. समाधान हे काही दिवसांचं असतं आणि ज्ञान अर्थात जीवन-जाणिवा ह्या आयुष्यभरासाठी असतात.* *दुर्दैवाने मुलांना पाच रूपयांची कॅडबरी देऊन किंवा पाच-पन्नास पैशांचं चाॅकलेट देऊन खुश करण्याचं काम घरादारातून जोरकसपणे सुरू आहे. दु:खापासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे. त्यांना दु:खाची तोंडओळख करून दिली जात नाही. एक सुरक्षाकवच त्यांच्याभोवती पालक उभे करताहेत. सहाजिकच मुलांना दु:खाचा सराव होत नाही. मग जराशा दु:खाने ही मुले हडबडून जातात अन् आत्महत्येचे अर्थही माहीत नसलेले हे कोवळे जीव मारणारा कवटाळून बसताहेत. म्हणून दु:ख कळण्यासाठी दु:खाची उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, हे आपणांस ठाऊक, पण त्यांच्यापर्यंत ते पोहचत नाही. माणूस दु:खातून उभा राहून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतो. हीच दु:खाच्या रियाजाची सामुग्री आहे. तिचा अवलंब करणे म्हणजे दु:खाचा रियाज करणे होय.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *जशी टाळी दोन्ही हातांनी वाजत नाही, तसा संवाद दोन्ही बाजुंनी झाला नाही तर व्यर्थ.* *चांगली आंतरक्रिया व्हावी असे वाटत असेल तर काही नियम लागू होतात.* *वक्ता आणि श्रोता याची कर्तव्य* *वक्ता जर श्रोत्याला म्हणत असेल अवधान देऊन माझे म्हणणे ऐका सुखाला पात्र व्हाल तर वक्त्याचे कर्तव्य आहे की तसे म्हणण्यात त्याची शेखी दीसू नये. तसे म्हणतांना त्याची विणवणी दीसली पाहीजे व श्रोत्यांना त्याने सर्वज्ञ समजले पाहीजे. ते सर्वज्ञ आहेत म्हणजे त्यांना आपले बोलणे कळेल ही जबाबदारी धरावी. बोलण्यात श्रोत्याप्रती लळा असला पाहीजे. आपले बोलणे त्याचे मनोरथ पूरविणारे आहे ही त्यांना खात्री वाटली पाहीजे.* *सासरवासीनीकडे माहेरचं कोणी आलं तर तीला आनंदाचे भरते येते व वाटते माझ्यासाठी याने माहेरची श्रीमंती आणली असावी. तसे श्रोत्यांसाठी माहेरच्या लाडक्या गोष्टी आणल्यात असे वक्त्याचे बोलण्यात वाटले पाहिजे.* *तुम्ही श्रोत्याना म्हणावं, तुमच्या कृपादृष्टिने माझी प्रसन्नता आहे. तुम्ही म्हणजे माझे संसाराची सावली तुम्ही अमृत सुखाच डोह आहात.* *वक्त्याने म्हणावं मी आपल्या ईच्छेने यां अमृत डोहात बूडी घेणार. आपण वक्ता असलो तरी बोबडे बोल बोलणारे बालक आहोत बालकाचे बोल वाकडे असले तरी तुम्ही माय बाप कौतूक करणार याची खात्री आहे, असं वक्त्याच्या बोलण्यात प्रतीबिंबीत व्हावं.* *बोलण्यातून सलगी आहे हे श्रोत्यांला वाटावं. तुम्हा सर्वज्ञाना मी उपदेश काय करणार असं आपलं निरागसपण श्रोत्यांना दीसाव.काजवा वा टेंभा जसा सूर्याला उजळुशकत नाही वा चंद्राला थंड करायला पाणी लागत नाही वा सूस्वराला सूरेख आवाजाची साथ लागत नाही,अलंकाराची शोभा वाढवायला अलंकार घालावा लागत नाही, सुगंधाला सूगंध देउन सुगंधी करावे लागत नाही, समूद्राला कोठे जाउन आंघोळ करावी लागत नाही, आकाशाला व्यापणारी वस्तू आणता येत नाही, अशा अवधान असणाऱ्या तूम्हाला जाणीव मी काय करून देणार? ही भावना वक्त्यात सदैव असावी.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• संकल्प करा अथवा करु नका शेवटी निर्णय तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज रहा.कारण ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करा म्हणजे तुमचे तुम्हाला निश्चितच मिळेल.मी असे करणार आहे मी तसे करणार आहे असे जगाला सांगत सुटू नका.जग काही म्हणतील त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही किती दिवस चालणार ?चार दिवस तुम्ही त्यांच्यासमोर करणार आणि काही दिवस निघून गेले की, पुन्हा तेच करणार.म्हणजे तुमचा तुमच्यावर विश्वास नाही असेच होईल ना ! संकल्प असे करा की,ते आयुष्यभर आपल्या जीवनासाठीच आहेत.मग तुम्हाला वर्षाची किंवा वर्ष संपल्यानंतर नवीन वर्षाच्या प्रारंभी करायची काही गरजच नाही.दिवस,महिने,वर्ष येतात जातात याकडे लक्ष देऊ नका,पण आयुष्य हे एकदाच येते आणि ते अमर्यादित म्हणजेच आयुष्याच्या शेवटपर्यंत असेल.आपण केलेले संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या मनाचा ठाम निर्धार असला की,काही दर वर्षी शेवटी सोडायचे आणि नवीन धरायचे किंवा करायचे असेही करायचे नाही.काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही तर आपण काळाची पावले ओळखून आपण आपले जीवन आनंदमय आणि सुखमय कसे जाईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.तुम्ही निर्माण केलेले आणि प्रत्यक्ष जीवनात अनुसरलेले संकल्प हे इतर लोक आपोआपच अनुकरण करतील आणि करायलाही लागतील.हा तुमचा तुम्ही सुरवातीपासून केलेला आदर्श संकल्प नवीन वर्षासाठी इतरांना अनुकरणीय ठरेल यात शंकाच नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सिंह व बेडूक* एका जंगलात एक सिंह राहायचा.त्याला त्या जंगलात कंटाळा आला तो दुसऱ्या जंगलात राहायला गेला .एकदा सिंह मोठया ने गरजला.त्या जंगलात अनेक पशु-पक्षी तसेच काही बेडूक ही राहत होते .त्यांनी यापुर्वी सिंह पाहिले नव्हते .त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला ,"कोणीतरी मोठा आवाज काढत आहे .आता मीही मोठा आवाज काढतो ."बेडकानी मोठा आवाज काढला . सिंहासाठी हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले , कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे.' सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठ्या मोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाचे डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिल. बेडूक आनंदाने पाण्यात गेला. बोध: आव्हान पेलण्याची ताकद असावी मग कोणी कितीही सामर्थ्यशाली असले तरी. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment