✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 14/10/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक प्रमाण(मानक) दिन* *जागतिक दृष्टी दिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆१९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (बाबासाहेब आंबेडकर) यांचा आपल्या सुमारे ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश. ◆१९९८-विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- ◆ १९३१ - निखिल बॅनरजी, भारतीय शास्त्रीय संगीतकार. ◆१६४३-बहाद्दूरशाह जफर(पहिला) मुघल सम्राट 💥 मृत्यू :- ★२०१३- मोहन धारिया ,माजी केंद्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते* *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *वादग्रस्त प्रश्नांवर संवादातून मार्ग काढणार, भारतभेटीवर आलेल्या चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांचं वक्तव्य, व्यापार, गुंतवणूक, सेवा क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *सलग बाराव्या वर्षी मुकेश अंबानी भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्जकडून भारतातल्या कुबेरांची यादी जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अपघातात डॉ. नेहा शेख या तरुणीच्या मृत्यूनंतर झालेल्या जनआंदोलनानंतर भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावरील टोल बंद, कंपनीबरोबरचा रस्त्याचा करारही रद्द* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *जीएसटी मध्ये कमतरता असू शकतात पण टीकेपेक्षा सूचना करा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *राज्यात बी एस एन एल कडून सहाशे पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना सक्तीची व्ही आर एस* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *PMC नंतर महाराष्ट्रात आणखी एका बँकेत कोटींचा घोटाळा, 1 लाख खातेदार पैसे काढू शकणार नाहीत !* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पुणे : टीम इंडियाने रचला इतिहास, दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एक डाव आणि 137 धावांनी विजय, द्विशतक ठोकणाऱ्या विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपले नशीब आपल्या हाती* https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/12.html काय करू राव, माझं नशिबच ख़राब आहे असे वाक्य नेहमी ऐकायला मिळते. ज्याना जीवनात कोणत्याही कामात यश मिळाले नाही किंवा मनासारखे काही मिळाले नाही की, हे वाक्य ठरलेले असते. नशिबात जे असेल ते नक्की मिळणारच असे ही बोलले जाते. परंतु नशीब म्हणजे काय असते आणि नशीब आपल्या हातात आहे की परमेश्वराच्या हातात याविषयी विचार केले असता, नशीब परमेश्वराच्या हाती आहे असे समाजल्या जाते. मात्र खरोखर नशीब कोणाच्या हातात आहे ? याविषयी कधी विचार केले आहे काय ? आपले नशीब आपल्या सवयीवर अवलंबून आहे. चांगल्या सवयी असतील तर आपले नशिब देखील चांगलेच असणार आहे. आपल्याला वाईट सवयी असतील आणि त्यात काही वाईट झाले की आपण नशिबाला दोष देऊन मोकळे होतो. तुम्हाला धोक्याची कल्पना असुनदेखील जीवाची काळजी करत नसाल तर तेथे नाशिबी काय करणार ? सवय चांगली लागण्यासाठी संगत म्हणजे सोबत चांगली असावी लागते. बहुतांश वेळा आपण सोबत निवड करणे चूकतो म्हणूनच आपल्या सवयी बिघडतात. शालेय जीवनापासून कोणत्या प्रकारच्या मित्रांची संगत लाभली यावर आपले नशीब अवलंबून असते. संगतीमधून संस्कार मिळतात जे की आजीवन आपल्या सोबत राहते. त्या संस्कारावरच आपले सर्व जीवन अवलंबून असते. मात्र आपण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. तेवढं मनावर देखील घेत नाहीत. त्यामुळे जीवनात काही तरी विपरीत घडत असते. घरातील वातावरण मुलांना पोषक असावे. घरात जर दूषित वातावरण असेल तर त्याचा परिणाम घरातील लहान मंडळीवर नक्की होतो. जेंव्हा परिणाम दिसायला लागतात तेंव्हा वेळ गेलेली असते. मग नशिबावर खापर फोडून मोकळे होतो. मात्र तसे नाही. आपले नशीब आपल्या हातात आहे फक्त त्यासाठी आपणास चांगली संगत मिळावी म्हणजे चांगले संस्कार होतील आणि चांगल्या सवयी देखील लागतात. यावरून आपले नशीब देखील चांगले आहे असे वाटते. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *धुके कसे तयार होतात ?* 📙 थंडीची चाहूल धुक्याने लागते. धुळे पांघरलेली पहाट उजाडली म्हणजे पावसाळा संपला. असे मानले जाते. दाट धुके पडले की पहाटेपर्यंत त्याचे दवाबिंदूत रूपांतर होते. धुक्यामुळे गव्हाची पेरणी केलेला शेतकरी आनंदीत होतो; कारण दवामुळे पीक चांगले येणार अशी त्याची खात्री पटलेली असते. धुक्यामध्ये आपण कधी प्रवास केला तर काही अंतर गेल्यावर असे लक्षात येते की आपले कपडे ओलसर झाले आहेत. याचे कारण म्हणजे हवेतील बाष्पाचे घनरूप म्हणजेच धुके. पाण्यातून निघणारी वाफ आपण नेहमीच बघत असतो. पण ही वाफ ढगांपर्यंत पोहोचेतोवर सहसा घनरूप होत नाही. थंडीच्या दिवसांत जेव्हा तापमान खाली येते तेव्हा मात्र हवेतील या वाफेचे लहान लहान पाण्याचे थेंब बनतात. थेंब म्हणायचे, पण असतात अगदी सूक्ष्मकणच. हे सूक्ष्मकण म्हणजेच धुके. उत्तर भारतात याला कोहरा म्हणतात. या धुक्याचा म्हणजेच सूक्ष्म कणांचा थर सभोवताली पसरला की आसपासचे कमी दिसू लागते. जे दिसते ते अस्पष्ट असते. दाट धुक्याच्या थरांमध्ये अनेकदा दृश्यमानता चार पाच फुटांपर्यंतही कमी होते. यामुळे रस्त्यांवर वाहने चालवणे, विमानतळावर विमान उतरवणे, उघड्यावरील नेहमीची कामे करणे अशक्य होऊन बसते. अपघातांचे प्रमाण यामुळे खूपच वाढू शकते. भारतात धुके हा प्रश्न काही दिवसांपुरताच असतो. फारतर उत्तर भारतातील हिमालयाचा उतार व काश्मीरचे खोरे येथे धुक्याची शाल पांघरल्याने जनजीवन ठप्प होऊ शकते; पण परदेशात धुके हा नित्याचा त्रासदायक भाग ठरतो. उपनगरांतून पन्नास किलोमीटरवर कामाच्या जागी पोहोचताना वर्षांचे सहा महिने जर धुके त्रास देणार असेल, तर पंचाईतच. पण यावर निसर्गत:च एक उतारा दिला आहे गेला आहे. वारा पडला असला, सूर्यप्रकाश नसला, तर धुके टिकून राहते, नाहीतर वाऱ्याबरोबर धुकेही जाते व सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने हे घनीभूत बाष्प पुन्हा वायुरूप होऊ लागते. धुक्याला मानवी हातभार मात्र काही ठिकाणी लागतो. चहूबाजूंना डोंगर, वाऱ्याला अटकाव, शहरांतील असंख्य वाहनांचा धूर व कारखान्यांच्या धुराड्यांतील रासायनिक धुर यांचे एकत्रित मिश्रण खरोखरच त्रासदायक ठरू लागते. यालाच स्माॅग (स्मोक व फॉग मिळून बनलेले) असाही शब्द तेथे वापरला जातो. दिल्लीमध्ये थंडीच्या दिवसात या स्माॅगचा फटका गेली अनेक वर्षे दिल्लीकर खात आहेत. या स्माॅगचे वजन धुक्यापेक्षा थोडे जास्त असल्याने याचा ढग स्थिरावल्यासारखा शहरावर तरंगत राहतो. युरोपमध्ये व अमेरिकेत जेथे मोठ्या प्रमाणावर वाहने वापरली जातात अशा अनेक शहरांतून सायंकाळच्या वेळी स्मॉगचा थर शहरावर पसरणे हे नवीन राहिलेले नाही. या बाबतीत मेक्सिको सिटी व लॉस एंजेलिस या दोन शहरांचा उल्लेख नेहमीच केला गेला आहे. १९६० च्या दशकापर्यंत लंडनसुद्धा यात सामील होते. पण कोळशाचा वापर खाण कारखान्यांनी बंद केला व लंडनच्या वातावरणात फरक पडला आहे. धुक्यात अपघात घडू नयेत म्हणून खास प्रकारचे हॅलोजन लॅम्प्स वापरले जातात. या दिव्यांचा प्रकाश पिवळसर असल्याने त्यांचे वेगळेपण धुक्यातून जाणवते. विमानांच्या बाबतीत रडारच्या सहाय्याने ऑटो पायलट इन्स्ट्रक्शन्स घेऊनच आता सरसकट विमाने उतरवली जातात. तरीही अनेकदा दाट धुक्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत, अशी बातमी वाचायला मिळतेच ! *'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *'गुरू' या ग्रहाचा शोध कोणी लावला ?* गॅलिलिओ , (1610) 2) *रेड्याच्या तोंडून वेद कोणत्या संताने वदवला ?* संत ज्ञानेश्वर , (1288 ला पैठण येथे) 3) *'भूगोल दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 14 जानेवारी 4) *'शारीरिक शिक्षण दिन' केव्हा साजरा करतात ?* 24 जानेवारी 5) *स्काऊट गाईड चळवळीचे जनक कोण ?* लॉर्ड बेडन पॉवेल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ● डॉ. भास्कर पेरके ● गणेश सिरमेवार ● मिलिंद जाधव ● मुरली थोटे ● अमोल मोरे ● शिवशंकर संगमवार ● सतीश उशलवार ● रत्नाकर सोनवणे ● स्वप्नील वाघमारे ● निखिल थोरमोठे *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !* *भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.* *"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🦆🦆🦆🦆🦆🦆*श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *Listen to your heart* *and take decision,,* *Dont be confused,,* *by other s advice,* *Your heart s voise,* *is my voice.* *हृदयाची भाषा आपापली स्वतःचीच असावी.नाहक उसना आव आणून त्रास करुन घेऊ नये.* *त्यासाठी आपल्याजवळ निस्वार्थी वृत्ती व धाडस असायला हवं.* *फुलोंकी की सुगंध केवल वायू की दिशा मै फैलती है।* *लेकिन एक व्यक्ती की अच्छाई हर दिशा मै फैलती है।* *माणसाने ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे.* *जसा दगडातील नको असलेला भाग काढला की देवाची मूर्ती तयार होते.* *आणि आपण सदैव नतमस्तक होतो.* *तसेच माणसातील स्वार्थीपणा व ढोंग* *बाजूला झाले आणि त्याग जिवंत ठेवला तर मोठं मोठी राष्ट्र भक्कमपणे उभी राहतात.* *1945 मध्ये जपान बेचिराख झाला होता आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाला. आज जपान विकसित देशांच्या यादीत आहे.आपण अजून प्रगतिशील देशात आहोत.* *यासाठी हिरोजी इंदोलकर यांच्या सारखी माणस प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असायला हवी.* *माझ्या राजाने हिरोजीवर रायगडाच्या उभारणीची जबाबदारी दिली* *होती.राज्याभिषेक जवळ आला होता . राजे परत येईपर्यंत काम पूर्ण करणे गरजेचे होते. हिरोजींना दिलेले पैसे संपले होते.* *काय करावे हा प्रश्न निर्माण झाला. हिरोजींनी गावाकडचे घर आणि जमीन विकून काम पूर्ण केले.राजांना खबर मिळाली, खुश होऊन राजांनी हिरोजींना विचारले* *आम्ही खुश आहोत मागा काय पाहिजे ते। हिरोजींनी रायगडाच्या मंदिराच्या पायरीवर माझे नाव टाका ,एव्हढच मागितलं. अमर* *झाले. निस्वार्थी प्रेम,धाडस,मनाचा मोठेपणा,स्व ची ताकद या ठिकाणी व्यक्त होते.प्रयत्न करूया यातील काय आचरता येईल ते.* *अशोक कुमावत, नासिक.* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एखाद्या वाईट विचारासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो तेवढा वेळ चांगल्या विचारासाठी दिला तर त्यातून स्वत:चे आणि इतरांचेही कल्याण होते.चांगल्या विचारांमुळे आपण काहीतरी चांगले केल्याचे समाधान तर होतेच त्याचबरोबर इतरांनाही काही चांगले दिल्यामुळे मनाला आनंद मिळतो.आपण दिलेला वेळ सत्कार्यासाठी लावल्याचेही आत्मिक समाधान मिळते.पण वाईट विचार केला तर आपले स्वत:चेही समाधान होत नाही आणि इतरांचेही समाधान होत नाही याचे शल्य नेहमी सलत राहते. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लहानसे घर* सुप्रसिद्ध तत्ववेत्ता सॉक्रेटीस याने आपल्यासाठी एक अतिशय लहान घर बांधले.त्या घराचा तो लहान आकार पाहून त्याच्या एका ओळखीच्या माणसाने त्याला विचारले, "काय हो सॉक्रेटीस ? तुमचा मित्रपरिवार तर बराच मोठा आहे; मग तुम्ही एवढं छोटंसं का बांधलत ?' सॉक्रेटीस म्हणाला, 'बाबा रे ! माझे मित्र दिसायला बरेच असले, तरी प्रत्यक्षात ज्यांना सच्चे मित्र म्हणता येतील असे मित्र मला फारच थोडे आहेत. मी मोठं घर बांधलं असतं तर काय झालं असतं ? माझे सगळे सच्चे मित्र जरी एकाच वेळी घरात आले असते, तरी ते बरंचसं रिकामं राहिलं असतं. मग तूच मला विचारलं असतंस, 'हे काय ? तुमचे एवढेच मित्र ? सगळे मित्र येऊनही, तुमचं घर रिकामंच राहिलेलं दिसतयं !''पण आता मी घर एकदम लहान बांधल्यामुळं, त्या माझ्या थोडया मित्रांच्या येण्यानंही माझं घर पूर्णपणे भरुन जाईल, आणि तसं ते भरलेलं पाहून, तू मला म्हणशील, 'अरे वा !तुमचे मित्र बरेच आहेत की हो, तुमचं घर कसं अगदी भरुन गेलंय !' आणि बर घर जरी लहान असले तरी मन माञ मोठ असाव हे ही तितकेच खरयं. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment