✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 29/11/2019 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर. २०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर. २०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर. 💥 जन्म :- १९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म. १९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता. १९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष. १९७७ - युनिस खान, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार १९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. २०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली शपथ घेतली. शिवतीर्थावर मोठ्या थाटामाटात झालेल्या शपथविधी सोहळा, अनेक दिग्गजांची होती उपस्थिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील युतीचा आधार ठरलेला महाविकासआघाडीचा 'समान किमान कार्यक्रमाचा' मसुदा जाहीर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पेट्रोलियम कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध, खाजगीकरणामुळे 14 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे भविष्य संकटात, बीपीसीएल कर्मचाऱ्यांचा संप, इंधन टंचाईची शक्यता* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *सुवर्ण महोत्सवी इफ्फीचा सुवर्ण मयूर पुरस्कार ‘पार्टीकल्स’ चित्रपटाला, मराठमोळी उषा जाधव सर्वोत्कृष्ट अभिनेत्री* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *2010 मध्ये कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतलेला जगप्रसिद्ध फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची श्रीलंकेच्या उत्तर प्रांताच्या राज्यपालपदी नियुक्ती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षकांना शिकवू द्या ...* शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे........... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙 वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते. चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात. दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• "अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात." *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *संसदेच्या दोन अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त किती कालावधीचे अंतर असते ?* 6 महिने 2) *जागतिक वनदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?* 21 मार्च 3) *भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कम्प्युटर तयार केला ?* परम 4) *माहिती अधिकार अधिनियमांची एकूण किती कलमे आहेत ?* 30 कलमे 5) *भारताची विशेषता कशात आहे ?* विविधतेत एकता *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 साईनाथ बोईनवाड 👤 योगेश खवसे 👤 पोतन्ना गुंटोड 👤 प्रमोद पाटील बोमले 👤 👤 👤 👤 👤 *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संत तुकाराम महाराज यांचा अतिशय सोपा दिसणारा अभंग आहे,'बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ॥' येथे तुकोबा एक खूप मोठं मानसशास्त्रीय गूढ कमीत कमी शब्दांत उकलून देत आहेत. जसे बोलतो तसेच वागणारा माणूस भेटला तर त्याला मी वंदन करीन, असे तुकोबा म्हणतात. म्हणजे अशी माणसे दुर्मिळ आहेत का ? असा प्रश्न पडतो. माणसाचे आचरण त्याच्या चारित्र्याशी विसंगत असेल तर असण्यात आणि भासवण्यात एक दरी निर्माण होते. आपण ज्यांना चांगली माणसं म्हणतो त्यांच्याही असण्यात आणि दाखवण्यात व्यक्तिमत्वात दरी असतेच.* *असण्याच्या आणि भासवण्याच्या मध्ये केवढी दरी आहे हे पाहिले पाहिजे. ती जेवढी मोठी तेवढा माणूस लहान आणि ती जेवढी लहान तेवढा माणूस मोठा, असे एक समीकरण मांडता येईल. असे होण्याच्या मागे एक बाह्य कारण आहे. आपल्या कृतीचे समर्थन करणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी गुन्हेगारही गुन्हा का करावा लागला याचं समर्थन करत असतो. म्हणूनच मग 'बोले तैसा चाले' अशी व्यक्ती दुर्मिळ असते. आणि अशी व्यक्ती सापडलीच तर तो परीस असतो, तो इतरांचेही सोने करू शकतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *एक मराठी सिनेमातील छान बोधपर गीत आठवले.-----* *कोण होतास तू,काय झालास तू।अरे वेड्या कसा वाया गेलास तू.* *आणि दुसरे म्हणजे---कशी नशिबाने* *थट्टा आज मांडली,* *कुत्र्या मांजराची दशा हिने आणली.* *जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे;* *परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात* न *घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ* *यावरून गटतट पडले आहेत.* *समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी* *स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी* *विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार* *वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे.* *सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.** *भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.* *माणूस माणूसच व्हायला हवा.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• घर जेव्हा बांधलं जातं तेव्हा मुख्यत: पायाभरणीचा विचार केला जातो, नंतर भिंतीचा आणि त्यानंतर डोक्यावर असणा-या छताचा.हे जरी खरं असलं तरी यात प्रामुख्याने रेती, सिमेंट,वीटा,गजाळी आणि बांधकाम करणा-या कारागिरांचे कौशल्य लागते.केवळ कोणत्याही एका घटकावर घर पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे.जर व्यक्तिमत्त्व विकासाचे पहायचे झाले तर लहानपणी घरात असणा-या आईवडिलांचे संस्कार, नंतर घरातल्या इतर रक्तातल्या नात्यातील लोकांचे संस्कार,परिसरातील मित्र,शेजारी यांच्या सहवासातून घडलेले संस्कार,शाळेतील शिक्षकांकडून घडवल्या गेलेले संस्कार आणि पुस्तकांच्या माध्यमातून वाचनातून मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडल्या गेलेले संस्कार या सर्व घटकातून मिळालेली उत्तम संस्कारांची पायाभरणी हीच खरी माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे घटक आहेत.यातील एखाद्या जरी घटकांकडून कमतरता भासली तर व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तितका होऊ शकत नाही.हे सारे घटक माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे पायाभूत घटक आहेत.ज्याप्रमाणे घर मजबूत करण्यासाठी पायाभरणी आणि त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असायला हवे तेव्हाच घर कुठे चांगले सुंदर बनू शकते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे वरील उल्लेखिलेल्या घटकांची नितांत गरज आहे.यातला एकजरी घटक कमी पडला तर माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया कच्चा राहू शकतो.म्हणून यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे खरे स्थान आहे हे विसरून चालणार नाही. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कासवाची चतुराई* एकदा एक कासव जंगलाकडे जायला निघाला. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरला. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले," हा तर दगड आहे. “कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला.. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला अरे! शिकार हातची गेली.. *बोध: चतुराईने केलेले काम चांगलेच व उपयोगी असते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment