✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 26/11/2019 वार - मंगळवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय संविधान दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला. ● १९४९: भारताची घटना मंजूर झाली. ● १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली. ● १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. ● १९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर. 💥 जन्म :- ● १९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म. 💥 मृत्यू :- ● १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन. ● १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन. ● २००८ - विजय साळसकर, मुंबईचे पोलिस अधिकारी ● २००८ - हेमंत करकरे, मुंबईचे पोलिस अधिकारी ● २००८ - अशोक कामटे, मुंबईचे पोलिस अधिकारी *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय पेचावर सर्वोच्च न्यायालयात सरकारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या वकिलांनी यावर सुमारे दीड तास युक्तिवाद केला. या दरम्यान सुप्रीम कोर्टाने सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर, आज सकाळी साडे दहा वाजता देणार आदेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *विश्वासदर्शक ठरावासाठी 14 दिवसांची मुदत, बहुमत सिद्ध करण्यासाठी आता सात डिसेंबरपर्यंत मुदत ?* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाराष्ट्रात घडत असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले असताना याच धामधुमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी ५ हजार ३८० कोटींची आर्थिक मदत देण्याची केली घोषणा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुणे: एसटी महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटातील ५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन प्रवासी ठार झाले असून २६ जण जखमी झाले आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *पुणे : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना 'आविष्कार' या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत या संशोधन संकल्पना सादर करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मुदतवाढ दिली असून, संशोधन विद्यार्थी, प्राध्यापकांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *'नगर : शिक्षकांना गुणवत्ता शोधता यायला हवी. शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाहीत तर समाज आणि राष्ट्र देखील घडवत असतात,' असे मत शिक्षणतज्ज्ञ डॉ. स्मिता देशमुख यांनी व्यक्त केले. नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्त बँकेतर्फे १०० सभासद शिक्षिकांचा 'सावित्रीची लेक' पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *भारताने बांगलादेश ला कसोटी क्रिकेटमध्ये 2 - 0 ने मालिका जिंकल्यामुळे आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेत भक्कम स्थितीमध्ये, भारत सध्या 360 गुणासह पहिल्या स्थानावर आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय संविधान दिवस* देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असे सुध्दा म्हटले जाते. संविधानातील तरतुदी लेखी स्वरूपात आहेत. याच आधारावर देशांतील लोकप्रतिनिधी नियमांच्या चौकटीत राहून आपला कारभार करीत असतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची............ वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_24.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतात नोटा कश्या तयार होतात ? खराब नोटांचं काय करतात ?* रुपया शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम शेर शाह सुरीने भारतावर राज्य करीत असताना १५४०-१५४५ च्या कालखंडातकेला होता. सध्या भारतासमवेत इतर ८ देशांमधील चलनाला रुपया म्हटले जाते. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम भारतीय रिजर्व बँकच्या अखत्यारीत येते. भारतात सर्वात पहिली वॉटरमार्क असलेली नोट १८६१ मध्ये छापण्यात आली होती. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त भारतीय नोटांमध्ये इतर १५ भाषांचा वापर केला जातो. *.भारतात नोटा कुठे छापल्या जातात?.* देशात चार नोट प्रेस आणि एक पेपरमिल आहे. देवास (मध्य प्रदेश), नाशिक (महाराष्ट्र), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) या चार ठिकाणी नोटा छापल्या जातात. देवास येथील नोट प्रेस मध्ये एका वर्षात २६५ कोटी नोटा छापले जातात. इथे २०, ५०, १००, ५०० किंमतीच्या च्या नोटा छापल्या जातात नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाईसुद्धा इथेच बनते. नाशिक नोट प्रेस मध्ये १९९१ सालापासून इथे १, २, ५, १०, ५०,१०० किंमतीच्या नोटा छापल्या जातात. सुरवातीला इथे ५० आणि १०० च्या नोटा छापल्या जात नव्हत्या. *.भारतात नाणी कुठे बनवली जातात?.* १. मुंबई २. कोलकत्ता ३. हैदराबाद ४.नोएडा *.नाण्यांच्या चिन्हावरून समजते की ते कुठे बनवले आहेत :.* प्रत्येक नाण्यावर असलेल्या चिन्हावरून समजते की ते नाणं कुठे बनवलं गेलं आहे. नाण्यावर छापलेल्या वर्षाच्या खाली जर स्टारचे चिन्ह असल्यास ते हैदराबादला बनवलं गेलं आहे. जर वर्षाच्या खाली टिंब असेल तर ते नाणं नोएडाला बनवण्यात आलं आहे. वर्षाच्या खाली डायमंड असल्यास ते नाणं मुंबईत बनवलं आहे. कोलकत्ता मध्ये बनवलेल्या नाण्यावर कोणतेच चिन्ह नसते. *.नोटा कोणत्या वस्तूने बनले जातात?.* रिजर्व बँक ऑफ इंडिया नोट बनवण्यासाठी कापसाच्या कागदाचा आणि विशिष्ट प्रकारच्या शाईचा वापर करते. या प्रकारच्या कागदाचे उत्पादन काही प्रमाणात महाराष्ट्रात (सीएनपी) होते, तर मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश मधील होशंगाबाद मध्ये होते. काही पेपर आयत सुद्धा केले जातात. *.भारतात प्रत्येक वर्षी किती नोटा छापल्या जातात?.* रिजर्व बँकेच्या एका अहवालानुसार भारत प्रत्येकवर्षी २००० कोटी नोटा छापतो .यामधील ४० टक्के खर्च कागद आणि शाई आयात करण्यामध्ये जातो. हा कागद जपान, जर्मनी आणि ब्रिटन सारख्या देशांमधून आयात केला जातो. नोटा किती छापल्या पाहिजेत, याविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय रिजर्व बँकेला आहे. नाणी किती तयार केली जावीत याचा निर्णय पूर्णतः सरकार घेते. *.नोटा कशा छापल्या जातात?.* विदेशातून आयात होणाऱ्या आणि होशंगाबाद मधून येणाऱ्या पेपरशीटला एका खास मशिन सायमंटन मध्ये टाकले जाते आणि नंतर इंटाब्यू नावाच्या मशीनने त्यावर कलर केले जाते. याप्रकारे नोट तयार होतात. त्यानंतर चांगल्या आणि खराब नोटा वेगळ्या केल्या जातात. एका वेळेस एका शीट मध्ये ३२ ते ४८ नोटा छापण्यात येतात. *.खराब झालेल्या नोटांना कुठे जमा केले जाते?.* नोटा तयार करतानाच त्यांची ‘सेल्फ लाइफ’ (नोटा योग्य प्रकारे बनण्याचा अवधी) ठरवण्यात येते. हा अवधी संपल्यानंतर किंवा सारख्या वापरणे खराब झालेल्या नोटांना रिजर्व बँक परत घेते. *.फाटलेल्या जुना नोटांचे काय केले जाते?.* खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोटा रिजर्व बँक परत चलनात आणत नाही, कारण तसे करणे योग्य नसते. रिजर्व बँक सर्व व्यावसायिक बँकांकडून फाटलेल्या आणि खराब नोटा मागवून एकत्र जमा करते. सुरवातीला या नोटा जाळल्या जात असतं, परंतु आता RBI ने पर्यावरणासंवर्धनाच्या दृष्टीने ह्या नोटा जाळणे बंद केले आहे. RBI ने एक ९ कोटींची मशीन आयत केली आहे, ही मशीन जुन्या नोटांचे छोटे तुकडे करते. त्यातून मजबूत अशी विट बनवली जाते .ह्या विटा खूप कामांमध्ये उपयोगी येतात. *भारतात प्रत्येक वर्षी ५ दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात, ज्यांचे एकूण वजन ४५००० टन एवढे असते.—.* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हें अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *भारतातील पहिले 'पुस्तकाचे गाव' कोणते ?* भिल्लार ( सातारा ) 2) *'संविधान दिवस' केव्हा साजरा केला जातो ?* 26 नोव्हेंबर 3) *'संविधानाचे शिल्पकार' कोणाला म्हटले जाते ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर 4) *संविधान निर्माण करण्यासाठी किती कालावधी लागला ?* 2 वर्ष ,11 महिने , 18 दिवस 5) *संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली ?* 9 डिसेंबर 1946 *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 संतोष लक्ष्मणराव सज्जन 👤 अर्जुन यनगंटीवार 👤 मुरलीधर हंबर्डे पाटील 👤 संजय बोंटावार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.* *नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *ज्ञान ही अशी शिदोरी आहे* *की ती माणसाला नेहमीच* *प्रत्येक क्षेत्रात एका ठराविक उंचीवर* *नेऊन ठेवते.* *अजून अस गुरुत्वाकर्षण तयार झालं* *नाही की ते ज्ञानाला* *नैसर्गिकरित्या आपल्याकडे खेचून* *घेईल.* *त्याला मिळविण्यासाठी प्रयत्न* *करावेच लागतात. एकदा मिळविले* *की कोणत्याही ब्रम्ह* *पंडितांची ताकद नाही की तो* *तुमच्याकडून हिसकावून घेईन.* *ह, एक मात्र नक्की की आता* *एकलव्य बनू नका.* *धर्माचा ,ज्ञानाचा ठेका घेतलेली* *मंडळी तुमच्या मार्गात अनंत अडचणी उभ्या करतात.* *स्वामी विवेकानंद यांना शिकागो येथे बोलण्यासाठीचे प्रमाणपत्र भारतीय* *शंकराचार्य यांनी दिले* *नाही,ते श्रीलंकेच्या बौध्द* *धर्मप्रसारक विद्वानांनी दिले.* *त्यांचे 5 मिनिटे कमी करून* *विवेकानंदांना दिले,आणि त्याच 5* *मिनिटांनी 1893 साली स्वामींनी* *जगभरात नावलौकिक* *मिळवला व आपली* *धर्म पताका जगभर* *फडकावली.* *अजूनही तो दैत्य* *उरात धडधड करतो.* *विनंती-ज्ञानाची भूक प्रचंड* *असुद्या। कुठेही, केव्हाही,कसेही* *फक्त रुचकर ज्ञान मिळेल त्याचे सेवन* *करा,नक्की सुदृढ व्हाल.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही केलेला संकल्प आणि संकल्पाच्या दिशेने जाणारी वाट ही नक्कीच तुमच्या यशाकडे जाणारी असली पाहिजे.कारण तुमचे संकल्प हे तुमच्या ध्येयपूर्तीसाठीच असतात.तुमच्या इच्छा, आकांक्षा,तुमचे कार्य आणि तुमचा विश्वास त्यात दडलेला असतो.तुमच्या संकल्पामुळे तुमच्या जीवनाचे तर कल्याण होईलच त्याचबरोबर इतरांना संकल्प करण्याची प्रेरणा सुध्दा मिळेल. © व्यंकटेश काटकर, नांदेड संवाद..९४२१८३९५९०. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *धाडसी गीता* गीता नऊ दहा वर्षाची मुलगी होती. ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत रहायचे. तिची आई बाबा शेतात काम करत होते. संध्याकाळ झाली. गीता अभ्यास करत होती. एक कोकरू बांधली होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. आणि गीताला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले. आणि विहिरीजवळ पाणी भरायला गेली. देवळात कोकराचा बँs बँs ओरडण्याचा आवाज आला. तशी गीता धावतच झोपडीबाहेर आली, एक लांडगा दिसला. तो कोकरा कडे येत होता. गीता घाबरली. क्षणभर विचार केला आला आला. ते झटकन झोपडीत गेली. चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरा वर धडक घालणार होता इतक्या गीता ने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला. “पळापळा लांडगा आला, ” गीता जोरात जोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे आई बाबा धावत आले. गीताने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. गीताच्या धाडसी पणाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचानी तिची पाठ थोपटली. शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसा चे कौतुक केले. बोध: आपण कधीही धाडसी राहिले पाहिजे. तरच आपण कोणाला भिणार नाही. समयसूचकता व धाडसीपणा हे दोन महत्त्वाचे गूण आहेत. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment