✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/11/2019 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय बालदिन* 💥 ठळक घडामोडी :- ◆ १९९८-इंटरनॅशनल स्पेस स्टेशन चे (ISS) प्रक्षेपण झाले. ◆ १९९७-अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली. ◆ १९८४ - सेटीची स्थापना. ◆ १९८५ - मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.० ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली. 💥 जन्म :- ◆ १८५४ - मराठी कवी, निबंधकार व नाटककार मोरो गणेश लोंढे ◆ १९१० - विलेम जेकब व्हान स्टॉकम, डच भौतिकशास्त्रज्ञ. ◆ १९२४ - बेनुवा मँडेलब्रॉट, फ्रेंच गणितज्ञ. ◆ १९२५ - रॉबर्ट एफ. केनेडी, अमेरिकेचा सेनेटर. 💥 मृत्यू :- ◆ १९१० - रशियन साहित्यिक लिओ टॉल्स्टॉय ◆ १९७३ - केशव सीताराम ठाकरे *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर, नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *धुक्यामुळे शिर्डी विमानसेवा मागील पाच दिवससा पासून ठप्प आहे. मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरु, कोलकाता, इंदूर या शहरांमधून रोज 28 विमानांद्वारे साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या दोन हजार प्रवाशांना बसत आहे त्याचा फटका* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पीएमसी खातेदारकांच्या प्रश्नासाठी काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला, एकनाथ गायकवाड, भाई जगताप आणि जिशान सिद्दीकी राजभवनात दाखल. खातेदारकांना न्याय देण्यासाठी राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी करणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *पुण्यातील दिवे घाटात वारकरी दिंडीत जेसीबी घुसल्याने झाला अपघात, नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूरवरुन आळंदीला जात असताना अपघात, तर संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा मृत्यू* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबईतील वाहनतळांची टंचाई दूर करण्यासाठी शहरातील 13 मॉलमधील वाहनतळ यापुढे बाहेरील वाहनांसाठी खुले करण्याचा निर्णय मुंबई वाहनतळ प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानंतर आता रिलायन्सच्या जिओने देखील मोबाईल सेवांचे दर वाढवणार असल्याची मंगळवारी घोषणा केली. कंपनीच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पीटीआयने याबाबत माहिती दिली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *शुक्रवारी 22 नोव्हेंबर रोजी कोलकाता इथल्या इडन गार्डन्स स्टेडियमवर पहिल्यावहिल्या डे-नाईट टेस्टच्या निमित्ताने पिंक बॉलमुळे भारतीय क्रिकेटमधला नवा अध्याय लिहिला जाणार आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *विशेष बातमी - दिल्ली येथे 27 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलसाठी नांदेड येथील संतोष केंद्रे यांच्या ऑक्सिजन टेलीफिल्मची देशपातळीवर निवड* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शून्यातून विश्व साकारणाऱ्या सरकारी शाळा* जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा म्हटले की, प्रत्येकांच्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्या चित्रात त्या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्येकाची बनलेली आहे. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्हणून यास गरिबांची शाळा असे सुध्दा संबोधले जाते. सरकारी यंत्रणेमार्फत चालविण्यात येणारी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील............. वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_15.html www.nasayeotikar.blogspot.com लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मूत्रपिंडाचे (किडनीचे) कार्य कसे चालते ?* 📙 बर्याच जणांना मुत्रपिंड म्हणजेच जननेंद्रिय असे वाटते. हे चुकीचे आहे. मूत्रपिंडाचा संबंध शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी आहे. तर जननेंद्रियांचा संबंध पुनरुत्पादनाशी आहे. माणसाच्या शरीरात घेवड्याच्या 'बी'च्या आकाराची दोन मूत्रपिंडे असतात. ३ x २ x १ इंच असा त्यांचा आकार असतो. मूत्रपिंडाचे कार्य गाळणीसारखे असते. शरीरात चयापचयामुळे अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. यात युरिया, युरोबिलीनोजेन, मृत पेशीतील घटक आदींचा समावेश होतो. मूत्रपिंडामध्ये रक्त गाळले जाते. शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी रक्तातच राहतात; पण अतिरिक्त पाणी, क्षार व टाकाऊ किंवा विषारी पदार्थ रक्ताबाहेर काढले जातात. यालाच आपण लघवी म्हणतो. मूत्रपिंडातून मूत्रवहिन्यांद्वारे लघवी मूत्राशयात गोळा होते. मुत्रसंचयानंतर लघवी करण्याची इच्छा निर्माण होते व मूत्रमार्गाद्वारे लगेच शरीराबाहेर पडते. विषारी, टाकाऊ पदार्थ शरीराबाहेरील टाकण्याखेरीज शरीरात पाणी व क्षार यांचे संतुलन राखण्याचे महत्त्वाचे कार्य मूत्रपिंडे करतात. मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रोगात मूत्रपिंडावर परिणाम होऊन ती अकार्यक्षम बनतात. काही सांसर्गिक रोगांमुळेही त्यांचे कार्य बंद पडू शकते. असे झाल्यास रक्तातील विषारी पदार्थांचे (जसे युरिया, अमोनिया) प्रमाण वाढते व यांचा मेंदू तसेच इतर इंद्रियांवर परिणाम होतो. त्यामुळे व्यक्ती कोमात जाते व मरण पावते. जिवंत राहण्यासाठी मूत्रपिंडे कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे. एक निरोगी मूत्रपिंडदेखील दोन मूत्रपिंडांचे कार्य करू शकते. मूत्रपिंडांच्या कायमस्वरूपी रोगांमध्ये ज्यात त्यांचे कार्य पूर्णपणे बंद पडते. डायलिसिस वा मूत्रपिंडावरोपण हे दोन उपचार करता येतात. या दोन्ही पद्धतीत काही धोके असले तरी त्यामुळे रुग्णाचे आयुष्य आणि काही वर्षांनी वाढण्याची शक्यता असते. *डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *'केशवसुत' हे टोपण नाव कोणाचे आहे ?* कृष्णाजी केशव दामले 2) *'केशवकुमार' हे टोपण नाव कोणाचे आहे ?* प्रल्हाद केशव अत्रे 3) *'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक कोण ?* साने गुरुजी 4) *'वायुसेना दिवस' केव्हा साजरा करतात ?* 8 ऑक्टोबर 5) *'राष्ट्रीय एकता दिन' केव्हा पाळला जातो ?* 31 ऑक्टोबर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤 डॉ. शैलेश उमाटे, मानसोपचार तज्ञ, मुंबई 👤 चंद्रकांत पाटील पांगरीकर 👤 डी. वाय. शिंदे, मुख्याध्यापक के.एम. पाटील विद्यालय, पाटोदा बु. 👤 संदीप पटकोटवार, प्राथमिक शिक्षक 👤 परमेश्वर कोरनुळे 👤 सदा पाटील पुयड 👤 सुधीर गोरे 👤 पवनकल्याण पानदवार 👤 लक्ष्मण जोंधळे 👤 वाजीद अली 👤 विशाल स्वामी 👤 शुभदा सुभाष दरबस्तेवार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'मनुष्यस्वभाव' अगदी विपरित असतो. तो कायम दुस-याचे अनुकरण करण्यात मग्न असतो. त्याला 'स्वधर्म' पाळण्यापेक्षा परधर्माचे आकर्षण जास्त असते. जसे गुलाबाच्या झाडाने कमळाचे फूल उगवण्याचा अट्टहास करणे. परंतु अशा प्रयत्नात अपयश हे ठरलेले असते. खरं म्हणजे गुलाबाच्या झाडाने उत्तम गुलाबाचे फूल उगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तोच त्याचा 'स्वधर्म' असतो. कमळाचे फूल उगवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ परधर्माचे अनुकरण करणे होय. स्वत:ची फूले लहान निपजली तरी चालतील, परंतु दुस-याची मोठी फुले आपली मानणे हा अधर्म होय.* *मनुष्याने आपला धर्म ओळखून, सारी क्षमता पणास लावून कार्य केले तर त्याचे 'कल्याणच' होईल. अन्यथा स्वधर्म सोडून नको त्या गोष्टींच्या मागे लागत राहिले तर वाट्याला केवळ दु:ख येईल. "दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचे नसून त्याचा स्वधर्म आहे प्रकाश देणे !"* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *काल, एफ.एम.वर 'अनोखी रात'* *सिनेमातील एक सुंदर गीत ऐकले.मन भारावून गेले.गीत असे* *होते--* *ओह रे ताल मिले नदी की जल मे।* *नदी मिले सागर से,* *सागर मिले कौनसी जल मे,* *कोई जाने ना।* *किती मोठा अर्थ सामावला आहे.* *माणूस छोटा आहे की मोठा त्याची किंमत कुणीच करू शकत नाही.* *झरे लहान असतात,पण हाहाकार माजवणाऱ्या, प्रचंड मोठ्या नद्यांचा* *उगम त्यातूनच होतो.* *वाळूचा कण किती छोटा ,नाही का* ? *पण हेच कण समुद्राच्या किनाऱ्यावर महासागराच्या प्रचंड* *लाटा अडवतात.* *छोटी खिळे आणि खुंट्या किती लहान दिसतात ना?पण त्यांनीच मोठं* - *मोठ्या इमारती, जहाजे आणि* *पुल जोडली जातात. स्क्रू* *अन पिना किती-किती लहान पण ते जर नसतील तर मोठाली यंत्र* *कशी बनणार.* *बघा छोट्याशा गोष्टी पण किती मोठा सहभाग.* *तसेच मित्रांनो आयुष्यात घडणाऱ्या छोट्या घटना,छोटी -छोटी माणस* *खूप काही देऊन जातात.* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण जर आपल्या हाताने मुठभर रेती घेतली तर ती मुठभर रेती काही वेळच राहील.त्यानंतर मुठीत असलेली रेती हळूहळू मुठीतून बाहेर निसटून जाईल आणि त्यानंतर बाकीची हाताला चिकटून राहील.जी चिकटून राहते ते माणसाच्या दु:खासारखी समजायची.कारण सुखाचे दिवस मुठीतल्या रेतीसारखे निसटून जाणारे असतात तर दु:ख मुठीत चिकटून राहणा-या रेतीसारखे हृदयाच्या कप्प्यात घट्ट घर करून राहतात आणि सतत ते आपल्या मनाला आठवण करून देतात.मग त्यांचे पडसाद आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतात.अशावेळी झालेल्या दु:खाचे मंथन करुन त्यातून सुख शोधले पाहिजे आणि सुख शोधून काढून जीवनाला आनंदाने जगण्यासाठी प्रोत्साहन द्यायला शिकले पाहिजे.दु:खाची कारणे शोधून पुन्हा दु:खाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. © व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍂🍃🍂🍃🍂🍃🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोहित चा अनुभव* मोहित ची शाळा सुटली. तो घरी निघाला. वाटेत त्याला आई दिसली. तिच्या हातात दोन मोठ्या पिशव्या होत्या त्या खूप जाड असाव्यात, असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. “अग आई, काय घेऊन चाललीस एवढं? ” मी आईला विचारले. तिच्या हातातील एक पिशवीघेऊ लागलो. “अरे हळू सामान सांडेल त्यातलं.” ती म्हणाली. “अगं आई, किती जड आहे पिशवी! काय आहे एवढ्यात ? मी म्हणालो. “हे आपल्या महिन्याभरच्या किराणा आहे ” आई म्हणाली. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले, तीही किती जाड होते, आणि त्याने आईचे हात लालेलाल झाले होते. “एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई?” किती लागले असावेत? असे आईच मला उलटून प्रश्न विचारून राहिली. मी सांगितले रक्कम एकूण आई हसू लागली आणि म्हणाली “, वा रे वा, तुझं ध्यान! वस्तूचे भाव गगनाला भिडले कुठे आहेस तू? बाजारात फिरत जा, मग तुला समजेल. मग महेश म्हणाला “आई जेव्हा माझ्या शाळेला सुट्टी असते तेव्हा आपण किराणा दुकान मध्ये जाऊ म्हणजे मला तुला मदत करता येते व माझे व्यवहार ज्ञान ही वाढते. *तात्पर्यः वेळेचा सदउपयोग करून अनुभव मिळवणे व ज्ञान वाढविणे,कामात मदत होणे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment