✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 25/11/2019 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी* *आंतरराष्ट्रीय महिलाविरुद्ध हिंसा निर्मूलन दिन* *शाकाहार दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● २०१२ - बांगलादेशच्या ढाका शहरात कपडे बनविणाऱ्या कारखान्यात आग लागून ११७ ठार. ● १९९१-कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळले 💥 जन्म :- ● १८४४ - कार्ल बेंझ, जर्मन उद्योजक आणि अभियंता. ● १८८२ - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार. ● १९५३ - जेफ्री स्किलिंग, एन्रॉनचा मुख्याधिकारी. ● १९५२-इम्रान खान ,पाकिस्तान चे प्रधानमंत्री. ● १९२६- रंगनाथ मिश्रा ,भारताचे २१ सरन्यायाधीश. 💥 मृत्यू :- ● १९७४ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस. ● १९८४ - यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱 9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *बहुमताचा दावा करणारं आणि सरकारस्थापनेचं निमंत्रण पत्र सादर करा ; सर्वोच्च न्यायालयाचे महाधिवक्त्यांना आदेश,आज होणार उद्या सुनावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *खाजगी नोकरधारकांसाठी मोठी बातमी, नोकरी गेल्यास सरकार 2 वर्ष उचलणार खर्च, खाजगी नोकरधारकांसाठी मोदी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुणे : शैक्षणिक गुणवत्तेच्या दर्जाची माहिती होण्यासोबतच, तो सुधारण्यासाठी राज्यातील सर्व शाळांनी स्वयंमूल्यमापन आणि बाह्यमूल्यमापनाची प्रक्रिया तातडीने अंमलात आणण्यासाठी कार्यवाही करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *कोल्हापूर : विधापरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी शनिवारी (ता. २३) प्रसिद्ध करण्यात आली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवाचा रंगमंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारा ठरला* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचं निधन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचा एक डाव आणि 46 धावांनी पराभव करून 2-0 ने मालिका जिंकली, रचले नवे विश्वविक्रम, मायदेशात सलग बारावा कसोटी मालिका विजय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लघुकथा - भूक* आभाळ गच्च भरून आलं म्हणून रेल्वे स्टेशनला जाण्याच्या घाईत तो ऑटो पाहू लागला. पावसाच्या धास्तीने प्रत्येकजण मिळेल त्या ऑटोमध्ये बसून जात होते थोड्याच वेळांत त्याला देखील ऑटो मिळालं. तसं तो रेल्वे स्टेशनला चला म्हणून ऑटोमध्ये बसून घेतलं. ऑटोत बसल्याबरोबर जोराचा पाऊस सुरू झाला. ऑटोमध्ये बसून देखील त्याच्या अंगावर पावसाचे पाणी पडतच होतं. पाऊस तसं खूप जोरदार पडत होता. ...........….. https://storymirror.com/read/story/marathi/yk8b6w78/bhuuk/detail कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *तापाने फणफणलेल्या मुलाला पांघरून द्यावे का ?* 📙 एकदा घरी एक व्यक्ती बोलवायला आली. तिच्या मुलाला ताप होता. त्यांच्यासोबत घरी गेलो. पाहतो तो काय घराची दारे खिडक्या बंद होत्या, पंखा बंद होता, भर उन्हाळ्यात घरातील सर्व लोक घामाघूम होऊन मुलाकडे चिंताक्रांत नजरेने पाहत बसले होते. मुलाकडे बघितले तर त्याला कानटोपी स्वेटर घातला होता. अंगावर उबदार शाल घातली होती. मुलगा अंथरुणावर तळमळत होता. गेल्या गेल्या सर्वप्रथम मी आई वडिलांना जवळ बोलावून पंखा लावायला सांगितला. नंतर मुलांचे स्वेटर कानटोपी काढली. शाल काढून टाकली. माठातील गार पाणी आणायला सांगितले. एक स्वच्छ फडके आणले. ते ओले करून मुलाची पाठ, छाती, हात पाय कपाळ वारंवार ओल्या फडक्याने पुसले. नंतर मुलाला पातळसर कपडे घातले. एवढे झाल्यावर आईला थर्मामीटरने मुलाचा ताप पाहायला सांगितला. तिला आश्चर्याचा धक्काच बसला वीस मिनिटात ताप १०३ वरून १०० पर्यंत खाली उतरला होता. असा प्रसंग तुमच्याही घरात होऊ शकतो! ताप आल्यावर शरीरात जास्तीची उष्णता निर्माण झालेली असते. ती शरीराबाहेर टाकणे आवश्यक असते. त्यामुळे अशा मुलाला स्वेटर वा उबदार कपडे घातल्याने ताप कमी होणार नाही. याउलट गार पाण्याच्या पट्ट्या ठेवल्याने व पाण्याने पुसल्याने ताप कमी होतो. त्यामुळे ताप आलेल्या मुलाला पांघरूण देखील घालू नये. पंख्यांमुळेही गारवा निर्माण होऊन ताप कमी व्हायला मदत होते. या उपायांमुळे तापामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे ताप हा रोग नाही. ते एक लक्षण आहे. वर सांगितलेल्या उपायाने ताप तात्पुरता उतरेल. पण रोग बरा होणार नाही. त्यासाठी त्या त्या रोगाचा विशिष्ट उपचारच घ्यायला हवा. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल, पण तुमचे यश देखील कायमचे झोपेल - कर्मवीर भाऊराव पाटील *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नगरपरिषद व महानगरपालिका यांच्या निवडणुकांचे नियंत्रण कोण करते ?* राज्य निवडणूक आयोग 2) *महेंद्र व संघमित्रा यांना श्रीलंकेत बौद्ध धर्म प्रचारासाठी कोणी पाठवले होते ?* सम्राट अशोक 3) *भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोण ?* पं जवाहरलाल नेहरू 4) *माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला ?* स्वीडन 5) *भारताचा पहिला व्हाइसरॉय कोण ?* लॉर्ड कॅनिंग *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 👤विलास ढवळे, कार्यक्रमाधिकारी सर्व शिक्षा अभियान, नांदेड 👤 नितीन देशमुख, पत्रकार, धर्माबाद 👤 शिवाजी पाटील कदम 👤 अंकुश बल्लेवार 👤 नरसिंग येनद्रलवार 👤 शिवलिंग गंटोड 👤 महेश मुधोळकर 👤 विनोद महाबळे, वृत्तपत्र छायाचित्रकार *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *'मैत्री' विषयीच्या अनेक कल्पना आपल्या मनात असतात. मैत्रीची वेगवेगळी रूपे आपण अनुभवत असतो. अनेकांना सगळे मिळते पण मित्र मिळत नाहीत व अनेकांना ते मिळतात पण लाभत नाहीत.* *कधी कधी मैत्रीत 'आपेक्षा' निर्माण होते व तिथेच घोटाळा होऊन मैत्रीला तडा जातो. आपण ज्याच्याशी मैत्री करतो तो माणूस 'एक स्वतंत्र व्यक्तिमत्व' आहे, हे आपण लक्षातच घेत नाही. आपल्या वाट्याला जे येते तेवढेच आपण महत्वाचे मानत नाही, त्याही पलिकडे आपल्याला हवे असते.* *'मैत्री' ही संकल्पना कुठल्याही नात्यापेक्षा महत्वाची असते. असे म्हणतात... मैत्रीकडे विधायक वृत्तीने पाहिले तर आपला मित्र हाच आपल्या घराचा पत्ता असतो.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो,* *दगडाचं तर ठिक आहे हो* *थोडा शेंदुर फासला* *म्हणजे* *" एकदा देव तरी तयार* *करता येईल* *पन "* *माणसाला असा कोणता* *रंग द्यावा* *म्हणजे माणसाचा* *" माणुस " बनवता येईन* *एक पत्थर बेचने वाले से पचास हजार का बड़ा पत्थर लेकर, एक* *मूर्तिकार ने उसे कांट-छांट कर, तराश कर, एक मूर्ति बना दी और वो पाँच लाख में बिकी।* *पत्थर वाले ने उससे पूछा कि, पहले तो पत्थर भी बड़ा था व् वजन भी* *ज्यादा था और मूर्ति बनने के बाद वजन भी कम हो गया व्* *साईज भी बहुत छोटा हो गया। फिर भी पत्थर की कीमत पचास हजार और मूर्ति की कीमत* *पाँच लाख कैसे हो गई ? तो मूर्तिकार ने बहुत सुन्दर जवाब दिया कि, "अब उस पत्थर में जो वेस्टेज था, जो काम* *का* *नहीं था, उसे निकाल कर फेंक दिया गया है।* *अब सार बचा है। तभी वो मूल्यवान है।"* *जीवन को भी हमने तमाम फिजूल उपाधियों व् बिना सार वाली बातों को* *ढ़ोते हुये, इसका मूल्य कम कर दिया है। अगर हम* *इसमें से ईर्ष्या, द्वेष, कामनायें तथा फिजूल उपाधियों जैसे अमीरी, ज्ञान,* *सुन्दरता, देखा-देखी के आराध्य, मनगढ़ंत पुजा-पद्धतियों* *आदि से मुक्त करके अपनी वास्तविक मूल स्थिति में आ* *जायेंगे, तभी हमारी कीमत है।* *और हमारी मूल स्थिति यह है कि, हम सभी परम भगवान् श्रीविष्णु के अंश* *हैं, उनके दास हैं और हमारा एकमात्र कार्य है, उनकी* *निष्काम और निःस्वार्थ भाव से भक्ति और सेवा करना। अगर हम* *तमाम झूठी उपाधियों से मुक्त होकर हमारी इस सच्ची पहचान* *_को समझ जायेंगे, तभी हमारी कीमत है।_* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते* ) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकालाच वाटते की,जीवनात सुख,शांती,समाधान असावे.ह्या तीनही गोष्टी आपल्या जवळच असतात पण आपण उगीचच ओरडत असतो की, जीवनात कधीही सुख नाही,शांती नाही आणि समाधानही नाही.असे म्हणण्यामागे आपणच कारणीभूत आहोत आणि त्यामागचे मूळ कारण आहे म्हणजे ती मनाची अस्वस्थता.या अस्वस्थ मनामुळेच तर आपल्या स्थिर जीवनाला अस्थिर करुन टाकले आहे.मनाच्या खूप अपेक्षा असतात त्या पूर्ण नाही झाल्या की,जीवनातल्या सगळ्याच गोष्टींना अस्थिर करतात आणि आहे त्या गोष्टींना मुकावे लागते.माणसाजळ सुख आहे त्या सुखासाठी मनातून परिश्रम करावे लागते.मन लावून परिश्रम केले आणि कसल्याही प्रकारचा कामामध्ये कामचुकारपणा केला नाही तर मनाला समाधान वाटते आणि कोणत्याही कामात मन स्थिर ठेवून जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले आणि कसल्याही प्रकारची जास्त अपेक्षा न ठेवता समाधानाने जीवन जगले तर जीवनात शांती टिकून राहील.शेवटी खेळ तर आपल्या मनाचाच आहे ना.आपल्या जीवनाची तुलना इतर लोकांच्या जीवनाशी करायला लागलो तर आपल्या जीवनातले सुख, शांती आणि समाधान हे हळूहळू पाय काढतात आणि नैराश्यमय जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करतात.म्हणून आपल्या मनाला कुणाच्याही गोष्टींची तुलना करण्यासाठी प्रेरणा देऊ नका.आपण आपल्या जीवनात जे आपल्याने शक्य आहे त्यासाठी करायला तयार रहा आणि जे काही प्रयत्नाने,परिश्रमाने आणि स्थिर मन ठेवून समाधानाने मिळेल त्यात आनंदात जीवन जगण्याचा मंत्र स्वीकारा यातच आपले खरे जीवन जगणे आहे. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁 ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी आई* एकदा दोन बायका एका लहान मुलावरून भांडत होत्या. “मीच या मुलाची खरी आई आहे” असे त्या दोघीही सांगत होत्या. त्या दोघींना न्यायाधीशांसमोर आणले गेले. त्या दोन्ही बायकांचे म्हणे न्यायाधीशाने लक्षपूर्वक ऐकले खरीआई नक्की कोणती? हे ठरवण खरोखरचे अवघड होते. न्यायाधीशाने खूप विचार केला. अखेर त्याला एक युक्ती सुचली. सेवकाला आज्ञा केली, “या मुलाचे दोन भाग करा आणि प्रत्येकीला एक एक भाग द्या.” न्यायाधीशाची ही आज्ञा ऐकताच त्यातील एका बाईने हंबरडा फोडून म्हटले, “नको, नको. न्यायाधीश महाराज दया करा. या मुलाला त्या बाई जवळ राहू द्या. मी मुलावर चा माझा हक्क सोडते .” दुसरी आई मात्र काहीही बोलली नाही. न्यायाधीशाने खरी आई कोण हे ओळखले. मुलाचे तुकडे होण्याऐवजी हक्क सोडायला जी बाई तयार होती, न्यायाधीशाने ते मूल त्या बाईस दिले. दुसऱ्या बाईला मात्र तुरंग वासाची शिक्षा ठोठावली. *बोध: सत्याचानेहमी विजय होतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment