📝📚📝📚📝📚📝📚📝📚
========================
*🌍 कथेचे बाळकडू 🌏*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*📚अभ्यास कथा भाग ९१ 📚*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*स्वकष्टाची प्रचिती मौलिक*
=========================
*✒प्रमिलाताई सेनकुडे(शिंदे)*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*एक श्रमिक होता. तो पर्वतावर दगड फोडत होता. फोडता फोडता त्याच्या मनात विचार आला. श्रम कमी आणि दाम भरपूर असा काही जीवनाचा मार्ग सापडला तर! डोंगरावर एक देवाची मूर्ती होती तिची तो रोज त्यासाठी पूजा, प्रार्थना करू लागला.त्याचा काही फायदा झाला नाही, या देवापेक्षाही श्रेष्ठ देवतांची पूजा करावी,असे त्याला वाटू लागले. आकाशात त्याने सूर्य पहिला. सूर्याची तो उपासना करू लागला. एके दिवशी त्याच्या लक्षात आले की, सूर्याला ढग झाकून टाकू शकतात,मग ढगाची आराधना करू लागला.त्यानंतर त्याच्या पाहण्यात असे आले की ढग पर्वताने अडवले जातात आणि पाऊस पडतो, पाऊस श्रेष्ठ असे त्याला वाटू लागले.परंतु पाऊस पडल्यानंतरही पर्वतावरचे दगड जसेच्या तसे असतात*.
*ते फोडण्याची शक्ती त्याच्यात नाही .ती शक्ती माझ्यात आहे. तेव्हा श्रमिकच सर्वात श्रेष्ठ! मला स्वतःलाच पुरुषार्थ जागवून महान बनले पाहिजे,याची त्याला जाणीव झाली*.
*आत्मबल, आत्मश्रद्धा व् आत्मजागृती यांच्यामुळे पुरुषार्थाची प्रेरणा लाभते. पुरुषार्थ प्राप्त झालेला मनुष्य दुःखाला, संकटाला घाबरत नाही. सुखासाठी अधीर उतावळा बनत नाही*.
*तात्पर्यः श्रमाचे,प्रयत्नाचे जीवन जगणे ही मनुष्य जीवनाची सार्थकता आहे*.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝 शब्दांकन/संकलन*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃

No comments:
Post a Comment