आनंदी रहाणे आवश्यक कविता संकलन

हल्ली आनंदी आणि समाधानी माणसं दुर्मिळ झाली आहेत...

कोणाशी जरा बोलायला जा,
तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा

‘माझ्याकडे वेळ नाही,
माझ्याकडे पैसे नाहीत,
स्पर्धेत टिकाव कसा लागेल,
आज पाऊस पडतोय,
माझा मूड नाही !’....

आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत...

काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे...
पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय

Isn't it strange ?

मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?

सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय,

कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?

पाऊस पडतोय ?
सोप्पं आहे - भिजायला जा !

अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?

माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात....

परमेश्वराने एका हातात
'आनंद'
आणि एका हातात
'समाधान'
कोंबून पाठवलेलं असतं....

माणूस मोठा होऊ लागतो,
वाढत्या वयाबरोबर
'आनंद' आणि 'समाधान'
कुठे-कुठे सांडत जातात....

आता 'आनंदी' होण्यासाठी
‘कोणावर’ तरी,
‘कशावर’ तरी
अवलंबून राहावं लागतं....

कुणाच्या येण्यावर...
कुणाच्या जाण्यावर...
कुणाच्या असण्यावर...
कुणाच्या नसण्यावर...

काहीतरी मिळाल्यावर...
कोणीतरी गमावल्यावर...
कुणाच्या बोलण्यावर...
कुणाच्या न बोलण्यावर...

खरं तर,
'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय....

कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं...

इतकं असून...

आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत,
पाण्याच्या टँकरची वाट बघत...
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !....

इतरांशी तुलना करत
आणखी पैसे,
आणखी कपडे,
आणखी मोठं घर,
आणखी वरची 'पोजिशन',
आणखी टक्के.. !

या 'आणखी' च्या मागे
धावता धावता त्या
आनंदाच्या झऱ्यापासून
किती लांब आलो आपण !....

🚩आनंदी दिवसाच्या आनंदी शुभेच्छा

No comments:

Post a Comment