भाऊबिज कविता संकलन

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*भाऊबीज -------!!*

*गेली पुनवेची रात*
*आली भरात ग तीज*
*चंद्र झोपडीत माझ्या*
*ओवाळते भाऊबीज*

*गोल गोल तबकात*
*रुपया सुपारी विडा*
*छताविना कवडसे*
*अंगणी चांदणसडा*

*औक्षण भाऊरायाचे*
*दीपदानाचा सोहळा*
*लावू तीट याला कशी*
*चंद्र दिसतो सावळा*

*किती किती माझ्यावरी*
*याची ग आभाळमाया*
*डोंगराआड राहुनी*
*घरात धरतो छाया*

*दे दे आता ओवाळणी*
*रिकामेच माझे सूप*
*पाखडले तसेच मी*
*दुष्काळ पडला खूप*

*वाहत्या घरात माझ्या*
*वारा आभाळाचा नाही*
*परी भावाची माया जी*
*चिखलात माती नाही*

*किती सुख किती सुख*
*नको नको भाऊराया*
*खोपटे इवले माझे*
*कशी सांभाळू ही माया??*

*औक्षण भाऊरायाचे*
*दीपदानाचा सोहळा*
*लावू तीट याला कशी*
*चंद्र दिसतो सावळा*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*भाऊबीजेच्या आपणास व अापल्या कुटुंबास  हार्दिक शुभेच्छा*

*शुभेछुक*
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment