शिक्षक काव्य ( संकलन )

*शिक्षक*

नवा  गडी,  नवीन  डाव
थोड़ा  विचार  करा  राव
सर्वात गरीब  प्राणी  कोण ?
शाळेतले गुरुजी आणखी कोण !!

गुरुजी -गुरुजी  पळा-पळा
माहिती सगळी करा गोळा
भलेही असो उन्हाळा-पावसाळा
तुम्हालाच टिकवायची आहे हो शाळा !!

रोजच निघतोय  नवीन  कायदा
त्याचा कोणाला  होणार  फायदा?
मोठ्या शाळांची चंगळ होईल
लहान शाळांचे  बळी  जाईल !!

संच मान्यतेचे बदलले निकष
शिक्षका विषयीच का बरे आकस?
लाखों शिक्षक  अतिरिक्त होतील
बिचार्यांचे नियोजन ढासळून जातील !!

गुरुजींनी  फार  बोलू  नये
मनाची  दारे  खोलू  नये
फक्त -आम्ही सांगतो तेच करा
नाहीं  तर  जेल  भरा !!

निती, नियम, संस्कार
फक्त -गुरुजींनीच पाळायचे
बिपी,शुगरच्या गोळ्या खात
सांगीतले तिकडेच पळायचे!!

सारे  नियम  गुरुजीसाठी
गुरुजी  फक्त  शाळेसाठी
शाळा  फक्त  राजकारण्यांसाठी
राजकारण  चालते  मतासाठी!!

गुरुजी -गुरुजी  एक  व्हा
संघटनेची  शक्ति  दाखवा !!!

No comments:

Post a Comment