*दिन कोजागरीचा*!
संपताच वर्षाऋतू
होई निरभ्र आकाश
सण कोजागरी येता
पडे चंद्राचा प्रकाश !
अशा चंद्र प्रकाशात
टाका दुधात साखर
दूध आटीव करता
पिस्ता बदाम केशर!
दुध आटाया लागले
चंद्र पाहे नभातूनं
आला धरेच्या जवळ
असा भेटाया ओढीनं !
होत आली मध्यरात्र
पडले आता किरणं
चांदण्याच्या प्रकाशानं
उजळून आले मनं !
शरदाच्या चांदण्यात
दूध आटून आटून
घेऊ प्रसादा सोबत
सुख -दुःख हे वाटून!
पुजा करून लक्ष्मीची
करा दूधाचे प्राशन
जाई पित्ताचा विकार
आहे आनंदाचा क्षण!
संपताच वर्षाऋतू
होई निरभ्र आकाश
सण कोजागरी येता
पडे चंद्राचा प्रकाश !
अशा चंद्र प्रकाशात
टाका दुधात साखर
दूध आटीव करता
पिस्ता बदाम केशर!
दुध आटाया लागले
चंद्र पाहे नभातूनं
आला धरेच्या जवळ
असा भेटाया ओढीनं !
होत आली मध्यरात्र
पडले आता किरणं
चांदण्याच्या प्रकाशानं
उजळून आले मनं !
शरदाच्या चांदण्यात
दूध आटून आटून
घेऊ प्रसादा सोबत
सुख -दुःख हे वाटून!
पुजा करून लक्ष्मीची
करा दूधाचे प्राशन
जाई पित्ताचा विकार
आहे आनंदाचा क्षण!
No comments:
Post a Comment