विचार ध्येय

अपेक्षा अशी असावी ,जी ध्येयापर्यंत नेईल..ध्येय असं आसावं , जे जीवन जगणे शिकवेल.. जगणं अस असावं , जे नात्यांची कदर करेल.नाती अशी असावीत , जी रोज आठवण काढण्यास भाग पाडावीत..!
*कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी  स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं*,  *प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं*..
*पाण्यापेक्षा* " *तहान* " *किती आहे याला जास्त किंमत असते*
*मृत्यू पेक्षा "श्वासाला "जास्त किंमत असते*
*या जगात नाते तर सर्वच जोडतात*..
*पण नात्यापेक्षा*" *विश्वासाला* " *जास्त किंमत असते*
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं...
पण  संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!
कारण  जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे.
समुद्र गाठायचा असेल...,
तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!
 जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
ह्रदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे,
अंतःकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!

No comments:

Post a Comment