माहेरपण भाऊबिज


👰🌹मुली येत नाहीत माहेरी, काही घ्यायला 🌹👰

💠 मुली येतात माहेरी
आपल्या मुळांना प्रेमाचा ओलावा द्यायला....🌾🌾

💠  त्या येतात भावांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला.... 👬
त्या येतात आपलं लहानपण शोधायला....

💠 त्या येतात अंगणात स्नेहाचा दीपक ठेवायला....
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....

💠 मुली येतात काळा दोरा दारावर बांधायला....
कुणाची द्रुष्ट लागु नये म्हणून आपल्या घराला....🏠

💠 त्या येतात मायेच्या झऱ्याखाली स्नान करायला....
त्या येतात सगळ्यांना आपलं थोडं-थोडं प्रेम द्यायला....💚
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....

💠 मुली जेव्हा परत जातात सासरी....
बरंच काही जातात सोडून त्या आपल्या माहेरी....
तीचे गोड हसणें आठवले कि नकळत....
सर्वांचे डोळे होतात ओले काठावरी....😪

💠 जेव्हाही मुली येतात आपल्या माहेरपणाला....
खरंतर त्या येतात आपल्या प्रेमाच्या वैभवाची उधळण करायला....
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला....

खरंच किती छान असतं ना
बहीण-भावाच नातं जगातील खर प्रेमळ आणि निस्वार्थ नातं म्हणजे *बहीण भाऊ*

बहीणीने रक्षाबंधन ला बांधलेल्या रेशमी धाग्यात पण किती ताकत असते की

 भावाने त्या बंधनातून कितीही प्रयत्न केला मुक्त होण्याचा तरी पण तो त्या बंधनातून मुक्त नाही होवू शकत एवढ्या, नव्हे मुक्त होण्याची भावनाही उयत नाही भावाच्या मनात

 प्रेमाने आणि मायेने बांधलेला असतो *हा माझा भाऊ अशी ओळख करून देताना पण तिचा चेहरा अभिमानाने फुललेला*

 असतो बहिणीचं अख्खं माहेर त्या एका भावामध्ये सामवलेलं असतं आणि

 *भावाला बहीणीची खरी किंमत तेव्हा कळते*
जेव्हा ती सासरी जात असते
*तेव्हा कळते की बहीण काय असते...*

ताई तुझा आशीर्वाद🙏🏼

No comments:

Post a Comment