संत गाडगेबाबा माहिती संकलन

🔵 *संत गाडगेबाबा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा* 🔵
( डेबूजी झिंगराजी जानोरकर )

जन्म :- *२३ फेब्रुवारी १८७६* शेनगांव अंजनगाव, कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र.

मृत्यु :- २० डिसेंबर १९५६. वळगांव, अमरावती, महाराष्ट्र.
               
१४ जुलै १९४१ ला गाडगे महाराजांची प्रकृति ठीक नव्हती. महानंद सामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेंव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंद सामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडूनही काहीही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या स्विकारल्या. पण म्हणाले, "डॉ. तुम्ही कशाला आले?; मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे." तेंव्हा बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसांचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोण विचारणारच नाही. तुमचा अधिकार मोठा आहे. या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.
               
१९५२ साली गाडगे बाबा आणि बाबासाहेबांची निपानी येथे भेट - मातीतला धर्म स्वीकारा.
       
त्यावेळी बाबासाहेबांना गाडगे बाबा म्हणाले, " बाबासाहेब तुम्ही शिकल्या सवरल्याली माणसं, तुम्ही कंचाबी धर्म स्वीकारा, आमच्या सारख्या अडाणी माणसांनी तुम्हाला बोलू नये बाबासाहेब. पण, बाबासाहेब धर्म असा स्वीकारा जो धर्म या मातीशी ईमान राखनारा धर्म असेल.

संत गाडगे महाराजांचे कार्य :-
➡ लोकशिक्षणाचे कार्य हॄनमोचन (विदर्भ) लक्ष्मी-नारायणाचे मंदिर बांधले.
➡ पूर्णा नदीवर घाट ( १९०८ )
➡ १९१७- पंढरपुर येथे धर्मशाळेचे निर्माण
➡ १९२५- मूर्तिजापुर येथे गोरक्षण धर्मशाळा व विद्यालयाचे निर्माण.
➡ मी कुणाचा गुरु नाही व् माझा कुणी शिष्य नाही असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
➡ फेब्रु. ८, १९५२ रोजी श्री गाडगेबाबा मिशन स्थापन करुन महाराष्ट्रभर शिक्षणसंस्था व धर्मशाळा स्थापन.
➡ गाडगे महाराज जातीने परीट व गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
➡ १९३१- हॄनमोचन येथील सदावर्त संत गाडगे बाबांनी सुरु केले.
➡ गाडगे महाराजांनी किर्तनाद्वारे लोकजागृतिचा मार्ग अवलंबला.
➡ गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.

➡ आचार्य अत्रे गाडगे बाबांबद्दल म्हणतात, " सिंहाला पहावे वनात, हत्तीला पहावे रानात, तर गाडगे बाबांना पहावे कीर्तनात!

➡ १९३१- वरवंडे येथे गाडगे बाबांच्या प्रबोधनातुन पशु हत्त्या बंद झाली.

➡ १९५४- जे-जे हॉस्पिटल धर्मशाळा ( मुंबई ) बांधली.

➡ गाडगे बाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.

➡ डॉ. बाबासाहेब त्यांना गुरुस्थानी मानत.

➡ गाडगे बाबा कीर्तनात खुप दंगुन जायचे. त्यांचा मुलगा मरण पावला आहे, ही वार्ता घेऊन बाबांना कुणीतरी सांगितली. पण, गाडगे बाबांनी नाही कीर्तन थांबवले व नाही ते रडले. तेच संत गाडगे महाराज ज्यावेळी विश्वरत्न, बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्यावेळी ते धाय मोकळून रडत होते. व सतत १५ दिवस ते रडत राहिले व २० डिसेंबर १९५६ साली ज्याचा शिष्य या राष्ट्राचा निर्माता होता, अशा या महान फकीराचं म्हणजे संत गाडगे बाबा ( महाराज ) यांचं महापरिनिर्वाण पेढी नदीच्या काठावर वलगांव, अमरावती येथे झालं. गाडगे नगर येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे

*संत गाडगे महाराज आणि त्याची कीर्तने* !!

गाडगेबाबा हे आधुनिक राष्ट्रीय संत म्हणून ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात पदयाञा करून त्यांनी लोकशिक्षणाचे प्रबोधनाचे कार्य केले. स्वच्छता, करुणा आणि शिक्षण विवेकनिष्ठ मूल्ये समाजात रुजविण्याचे कार्य केले. बाबांचे काही वैचारिक कीर्तने..

*किर्तन १*

बाबा :-  देव किती?
श्रोते :-  एक.
बाबा :-  तुमच्या गावी खंडोबा आहे का?
श्रोते :-  आहे
बाबा :- मग देव किती झाले
श्रोते :- दोन
बाबा :- तुमच्या गावी भैरोबा आहे का?
श्रोते :- आहे
बाबा :- मग आता देव किती झाले?
श्रोते :-  तीन
बाबा :- तुमच्या गावी मरीआई आहे का?
श्रोते :- आहे
बाबा :- मग देव किती झाले
श्रोते :- चार
बाबा :- वेड लागले जगाला देव म्हणती धोंड्याला । बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला।

*किर्तन २*

बाबा :- श्रीखंड चांगले का बोकड?
श्रोते :- श्रीखंड
बाबा :- बासुंदी चांगली का बोकड?
श्रोते :- बासुंदी
बाबा :- दूध चांगले का बोकड?
श्रोते :- दूध
बाबा :- इथं असं बोलता अन् घरी जाऊन बोकडाचे मटण खाता. काय म्हणावं तुम्हाला? गुजराती मारवाडी कधी देवाला बकरे कापतात का?
श्रोते :- नाही
बाबा :- मग त्यांना देव कसा पावतो? अन् तुम्हाला का पावत नाही? एकेका गुजरातीच्या दहा दहा मजली इमारती आहेत अन् तुम्ही फूटपाथवर झोपता. शेटजीच्या बायकोचे पाच फुटी पातळ पाचशे रुपयांचे त्यातला परकर तीनशेचा अन् तुमच्या बायकोच्या नऊवारी पातळाची किंमत किती? पाच रुपये अन् पावली.

देवाला बकरे द्यायचे तर त्याच्या देवळात सोडून द्या त्याच्या पोटात सुरी कशाला खुपसता? तुम्ही त्याचा इकडे मसाला वाटता अन् यम तिकडे तुमचा मसाला वाटणार. बोला गोपाला गोपाला� देवकी नंदन गोपाला।

*किर्तन ३*

बाबा :- देव कसा आहे? जसं वारं.
वायु असे सकळ ठायी परि त्याचे बि-हाडची नाही ।
वारं आहे ना वारं पृथ्वीवर आहे घरात दारात झाडात जिकडे तिकडे वारं आहे. पण कोणी असं नाही सांगत की रात्री वा-याचा मुक्काम बंबईच्या ठेसनावर होता. सांगतं का कोणी?
श्रोते :- नाही
बाबा :- परवाच्या रोजी वारं साता-याच्या ठेसनावर होतं असं सांगत का कोणी?
श्रोते :- नाही
बाबा :- ते वारं लाल, हिरवं, पिवळं, काळं ते समजत नाही तसा परमेश्वर आहे. अन् तीर्थात देव बसवले ना जगन्नाथ रामेश्वर हे पोट भरण्याचे देव आहेत. जञा में फञा बिठाया तीरथ बनाया पाणी..
भटजी म्हणतो तांब्याभर पाण्याचे पंधरा रुपये.. दोन आणे चमचा तीर्थ घ्या तीर्थ मग सांगा जञेत देव कशाचा आहे?
श्रोते :- दगडाचा
बाबा :- तीर्थाले जाणे देवाचा संबंध नाही पैशाचा नाश खाना खराब आ�हे. गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला।

*किर्तन ४*

बाबा :- देवळात देव नाही
नहीं मसजिद में नहीं देवलमे
देऊळ तयार झाले मूर्ती आणावी लागती का नाही?
श्रोते :- होय
बाबा :- बोला
श्रोते :- होय बाबा
बाबा :- मग मूर्ती इकात का फुकट?
श्रोते :- विकत
बाबा :- देव विकत भेटतो का? त्यापेक्षा सूर्यनमस्कार घ्यावा? जेवढे पैसे पडतील तेवढे पडूद्या. अन् आपल्या घरात आणून बसवून टाका. देव विकत भेटतो का? तो काय मेथीची भाजी आहे का कांदे बटाटे आहेत? हे ज्या माणसाले समजत नाही तो माणूस कसला? बरं आणले देव बसवले देवळात. तुमच्या देवाले अंग धुता येते का?
श्रोते :- नाही
बाबा :- ज्याले अंग धुवायची अक्कल नाही त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाले धोतर नेसता येते का?
श्रोते :- नाही
बाबा :- ज्याले धोतरही नेसता येत नाही त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाला निवद ठेवला अन् कुञ भिडलं तर त्याला हाणता येते का?
श्रोते :- नाही
बाबा :- अरे कुञाही हाणायची ताकद ज्याच्या अंगात नाही त्याला देव म्हणता? बरं तुमच्या देवाचा देवळापुरता तरी आत उजेड पडतो का?
श्रोते :- नाही
बाबा :- इजला दिवा मंडळी आली बापू दिवा लावा दिवा. मंडळी दर्शनाला आली. आणा दिवा. मग सांगा देव कोणी दावला?
श्रोते :- दिव्यानं दावला.
बाबा :- मग दिवा मोठा का देव?
श्रोते :- दिवा मोठा
बाबा :- मग कळलं ना देव देवळात नाही या जगात आहे तुमच्या माझ्यात आहे. जगाची सेवा करा?
बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला...
           
*किर्तन ५*

बाबा :- ब्रिटिश सरकारने आपल्यावर एक मोठं अरिष्ठ आणलं होतं. मग सत्याग्रह केला का नाही लोकांनी?
श्रोते :- होय केला
बाबा :- का कोणी देवळातले देव आले होते मदत कराले? वान्द्रयाचे राम, दादरचे इठोबा का वरळीचे पहिलवान मारूती आले होते?
श्रोते :- कोणी नाही आले
बाबा :- शिंगणापूरचे महादेव आले होते का?
श्रोते :- नाही
बाबा :- मग कोण सत्याग्रह आंदूलन केला?
श्रोते :-  माणसांनी केलं
बाबा :- कोणी कोणी ब्रिटिशाच्या गोळ्या झेलले?
श्रोते :- माणसांनी झेलले
बाबा :- मग त्या ब्रिटिशाले कोणी हाकलून लावले बप्पाहो?
श्रोते :- माणसांनी बाबा
बाबा :- मग देव कुठे राहतोय?
श्रोते :- माणसात
बाबा :- मग माणसाची सेवा करा बप्पाहो. एकवेळ पोटाले नाही मिळलं तरी चालेल पण पोरांना साळा शिकवा. देवा दगड धोंड्याच्य नादी नका लागू. आपला जवळपास घाणकचरा नको टाकू. परिसर चांगला ठेवा. हरामचं खाऊ नका. तानलेल्याला पाणी पाजा भूकेल्याला घास द्या बप्पाहो तेच देव हाये त्याचा आशिर्वाद घे. बोला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला..

मिञांनो किती आशयपूर्ण किर्तन बाबांनी मांडले आहे. अक्षर ओळख नसताना सुद्धा बाबांना खऱ्या देवाचा शोध लागला होता. चला, आपणही एक पाऊल अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने टाकूया. देवळातल्या दगडापुढे आपण आपला माथा टेकवून लोकांना लाथा मारण्यापेक्षा पुरोगामी  भारताची निर्मिती करुया. तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवूया.
संकलन

🙏🌴🌴🌴🙏

1 comment:

  1. राष्ट्रसंत सदगुरु गाडगे महाराजांना माझे शतशा नमन

    ReplyDelete