कथा क्रमांक १४७

बोधकथा *अच्छे दिन*

एक गाढव होते. ते एका मालकाकडे काम करत होते. एकावेळी  5 मीठाची पोती वाहुन नेण्याचे काम त्यास करावे लागत होते, जे त्यास ञासदायक वाटत होते. मीठाची पोती कमी करुन भार हलका करावा असे त्या गाढवाची मागणी होती. ते एकसारखे मालकाकडे मागणी करत होते. पण मालक निष्टूर होता. त्याचे ऐकत नव्हता. बिचारे गाढव ञास सहन करत होते.

ञास असहाय्य झाल्यावर गाढवाने पळ काढायचे ठरवले. एके राञी ते पळून गेले. पण पोटापाण्यासाठी कोणत्यातरी मालकाकडे जायलाच हवे. म्हणून दुसऱ्या गावातील एका मालकाकडे गेले.

नवीन मालकाची भेट घेतली. नवीन मालकाने त्याचे स्वागत केले. पहिले दोन दिवस कोणत्याही प्रकारचे काम न देता काम किती कमी असेल, किती चांगले असेल, ञास कसा होणार नाही या बद्दलच बोलत राहीला. गाढव खूष झाले. त्याला वाटले कमी काम, चांगले रहायला व खायला मग माझे अच्छे दिन येणार. गाढव भविष्यातील अच्छे दिनच्या खूषीत होते.

मालकाने एके दिवशी सांगितले आपण तुला कामास सूरवात करावयाची आहे. अच्छे दिन हवे असतील तर काही दिवस ञास सहन करावा लागेल, आहेस तयार? गाढव म्हणाले हो आहे तयार. मालकाने हे वाक्य त्याच्याकडून तीन वेळा वदवून घेतले. गाढव कामास खूप उत्साहीत होते व ञास सहन करण्यास तयार होते.

नव्या मालकाने कामास सुरवात केली. गाढवाच्या पाठीवर 3 मीठाची पोती टाकली. गाढव आनंदाने पोती टाकून आले. परत तीन टाकून आले, पण मालकाने खायलाच काय दिले नाही. गाढवाने तक्रार करताच "अच्छे दिन" ची आठवण करुन दिली. गाढव आनंदाने उपाशी झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी 6 पोती गाढवाच्या पाठीवर टाकले, गाढवाने उत्साहाने काम पूर्ण केले. परत 12 पोती टाकले, गाढवास खूप ञास होऊ लागला पण अच्छे दिन च्या अपेक्षेने काम पूर्ण केले. गाढव थकले होते, भुकेजले होते, तहानले होते पण नव्या मालकाने काही दिले नाही. गाढव गोठ्यात झोपण्याच्या तयारीत असताना मालक अचानक प्रकट झाले.

मालकाने सांगितले तुझे खूप हाल होत आहेत, आगोदरच्या मालकाने तुझ्या ताकदीचे खच्चीकरण केले आहे. ताकद वाढवावी लागेल तरच आच्छे दिन येतील व तु सूखी होशील.
गाढवाच्या आशा पल्लवीत झाल्या. आच्छे दिन अच्छे दिन.
मालक म्हणाला उद्या पासून ञास वाढणार आहे. तयार आहेस? परत गाढवाकडून तीन वेळा वदवून घेतले. गाढव आनंदाने तयार झाले.

गाढवाचे काम सुरू झाले. मालकाने 20 पोति पाठीवर टाकले. गाढवास चालने मुष्किल होऊ लागले. मालकाने जोरात चाबकाचे फटकारे मारण्यास सूरवात केली. गाढव ओरडू लागले. मालकाने ञास सहन करण्याचे आवाहन केले. गाढव रडत होते पण ञास सहन करत होते.
परत पाठीवर 25 पोती टाकली गाढव खालीच बसले, मालकाने जोरात फटकारे मारण्यास सूरवात केली, गाढव पाणी मागू लागले तर फटकारे देण्यात आले. गाढव घायकुतीला आले होते, पाणी पाणी करत होते त्यावेळी अगदी थोडे पाणी दिले. व सांगितले फक्त 50 दिवस ञास सहन कर. गाढव आनंदाने हो म्हणाले.
परत कामास सूरवात अता 30 पोती उपाशी पोटी टाकण्याचे काम करु लागले. असय्य वेदनेने ओरडत पण भविष्यातील अच्छे दिनासाठी सर्व सहन करत होते.

50 दिवस झाले. मालकाने त्याच्या पाठीवरील ओझे कमी केले. फक्त 10च पोती पाठीवर ठेवले. गाढवास खूप बरे वाटले कारण तीस पोत्यावरुन ओझे 10 पोत्यावर आले. त्याला वाटू लागले हि अच्छे दिनची सुरूवात आहे. मालकाने अगोदर पेक्षा जास्त खायला प्यायला दिले. पोटभर जेवणामूळे गाढव उत्साहीत झाले, पाठीवरील वीस पोत्यांचे ओझे कमी झाल्यामुळे खूष होते.
मालक परत आवतरले व विचारले ञास कमी झाला का? गाढव आनंदाने हो म्हणाले. मालकाने त्यास सांगितले मी अजून एक योजना पुढील 15 दिवसात आणत आहे त्या योजने नुसार तूला पोटभर दोन वेळेस जेवण, पाणी व पाठीवरी ओझे दोन पोत्याने कमी होईल. म्हणजे फक्त 8च पोती न्यावी लागतील, ञास तर कमी झालाच आहे, खूष आहेस? गाढव आनंदाने हो म्हणाले व पुढील 15 व्या दिवसाची वाट पाहु लागले. कारण त्याचे अच्छे दिन येत होते, ञास कमी होत होता, पहिल्या दिवसा पेक्षा जास्त जेवण मिळत असल्याने गाढव खूष होते.

परंतु गाढव अगोदरच्या मालका कडे पाचच पोती उचलायचे हे विसरुनच गेले होते
😝🤓

याला म्हणतात *अच्छे दिन*

No comments:

Post a Comment