कथा क्रमांक १४१


        🌻 तीन शब्दापासून गोष्ट तयार करणे.  🌻

 शब्द खाणावळ,शेजारणी,हार
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹बालाजीनगर नावाची एक वसाहत होती .त्या वसाहतीत नोकरी करणारे लोक राहत असत.रस्त्याच्या कडेला खाणावळ चालवणाय्रा गरीब बाईचे घर होते .घर छोटेसेच पण टापटीप होते .
          हळूहळू पैसे जमवून त्या बाईने सोन्याचा सुंदर हार विकत घेतला .आगाऊ शेजारणींना ते काही बरे दिसले नाही.त्या एकेक भेटली,की तिला हाराबद्दल काहीबाही बोलत असत.शेजारणींच्या या वागणुकीला ती बाई कंटाळून गेली .तिचे मन खूप दुखावले.तिने  त्यांच्यासोबत न बोलण्याचा निर्णय घेतला .काही दिवसानंतर त्या शेजारणींना आपली चूक लक्षात आली.
🌷बोध🌷
कोणाचे मन दुखावले जाईल असे कधीही वागू नये.

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺
   

No comments:

Post a Comment