*बोधकथा*
एका गावात एक मंदीर होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले.
मंदिराच्या पुजाऱ्यास न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, "पुजारी चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल.
पुजारी म्हणाले, ''मला माझा देवच येऊन वाचवेल.'' जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली .बोटीतील लोक पुजारींना न्यायला आले. पुजारींनी नकार दिला.पाणी इतके वाढले की पुजारींना मंदिराच्या कळसावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरून घिरट्या घालू लागले.त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टर मधले लोक म्हणाले, ''पुजारी आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.''
पुजारी म्हणाले, ''माझा देवच मला येऊन वाचवेल.''
यानंतर एकच मोठी लाट आली आणि पुजारी मृत्यमुखी पडले.स्वर्गात गेल्यावर त्यांनी देवाला विचारले, ''मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.''
देव म्हणाला, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो,नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.'
🍁 *तात्पर्य* :🍁
*देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही. तो माणसातच शोधावा लागतो.*👍👍👍

No comments:
Post a Comment