मी कां होते नकोशी ?
मी नकोशी झालीय
म्हणून एक नामी उपाय शोधलाय मला संपवण्याचा
लिंग निदान करून
निकाल लावला जातोय माझ्या गर्भाचा
रोपट्याला झाडही होऊ न देता
निर्णय घेताहेत ते रोपटच उखडण्याचा
कुठल्याच जाणिवांशी ओळख झालेली नसतांना
शरीरही न आकारता मनही निद्रिस्त असतांना
मला संपवलं जातंय
काय हित आहे यात समाजाचा
फक्त वारस हवा
म्हणून मला संपवनाऱ्यांना
विचारावस वाटत मग मी कां अनौरस ?
तो हक्क माझा नाही कां ?
माझ्यात प्रचंड उर्जा असतांना
कुठेही मी कमी नसतांना
साऱ्या नात्यांशी माझी
नाळ जोडलेली असतांना
न माझ्याशिवाय घराला घरपण नाही
हे म्हणत असतांना
कां मला संपवलं जातंय जन्मण्याआधीच .
वाईट तर याच वाटत
मी स्री जातीची असतांना
स्रीलाच मी नकोशी होते
न तो हवा या हट्टापोटी
तीच माझं अस्तित्व खुर्डून टाकते
तेव्हा यातनांचे अश्रूही गोठून जातात
माझंच माणूस मला मारतंय म्हटल्यावर
मी दाद तरी कोणाकडे मागायची ?
प्रत्येक बापाच्या मनात मुलगी असते
मग दुसरी झाली तर
मी कां होते नकोशी ?
किती स्रि-पुरुषांना वांझोटपण येत
तेव्हा मलाच दत्तक घेतात ना
आता माझं प्रमाण कमी झालंय म्हणून
मला वाचवायला सरकार न समाज पुढे सरसावतोय
मुली वाचवा हो ! असा टाहो फोडताय
पण ते माझ्यातल्या माणूसपणाची
जाणीव झाली म्हणून नाही
तर प्रत्येक नराला मादी हवी म्हणून !
मला जन्म घ्यायचाय फक्त माणूस म्हणून
मी वाट पाहीन त्या क्षणाची
तोपर्यंत मी झगडतच राहीन
स्वतःशीही अन इतरांशीही .
🙏🙏🙏🙏🙏
मी नकोशी झालीय
म्हणून एक नामी उपाय शोधलाय मला संपवण्याचा
लिंग निदान करून
निकाल लावला जातोय माझ्या गर्भाचा
रोपट्याला झाडही होऊ न देता
निर्णय घेताहेत ते रोपटच उखडण्याचा
कुठल्याच जाणिवांशी ओळख झालेली नसतांना
शरीरही न आकारता मनही निद्रिस्त असतांना
मला संपवलं जातंय
काय हित आहे यात समाजाचा
फक्त वारस हवा
म्हणून मला संपवनाऱ्यांना
विचारावस वाटत मग मी कां अनौरस ?
तो हक्क माझा नाही कां ?
माझ्यात प्रचंड उर्जा असतांना
कुठेही मी कमी नसतांना
साऱ्या नात्यांशी माझी
नाळ जोडलेली असतांना
न माझ्याशिवाय घराला घरपण नाही
हे म्हणत असतांना
कां मला संपवलं जातंय जन्मण्याआधीच .
वाईट तर याच वाटत
मी स्री जातीची असतांना
स्रीलाच मी नकोशी होते
न तो हवा या हट्टापोटी
तीच माझं अस्तित्व खुर्डून टाकते
तेव्हा यातनांचे अश्रूही गोठून जातात
माझंच माणूस मला मारतंय म्हटल्यावर
मी दाद तरी कोणाकडे मागायची ?
प्रत्येक बापाच्या मनात मुलगी असते
मग दुसरी झाली तर
मी कां होते नकोशी ?
किती स्रि-पुरुषांना वांझोटपण येत
तेव्हा मलाच दत्तक घेतात ना
आता माझं प्रमाण कमी झालंय म्हणून
मला वाचवायला सरकार न समाज पुढे सरसावतोय
मुली वाचवा हो ! असा टाहो फोडताय
पण ते माझ्यातल्या माणूसपणाची
जाणीव झाली म्हणून नाही
तर प्रत्येक नराला मादी हवी म्हणून !
मला जन्म घ्यायचाय फक्त माणूस म्हणून
मी वाट पाहीन त्या क्षणाची
तोपर्यंत मी झगडतच राहीन
स्वतःशीही अन इतरांशीही .
🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment