कथा क्रमांक १३९

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
*तीन शब्दापासून गोष्ट तयार करणे*
●●●●●●●●●●●●●●●●●
*जंगल, हरीण, शिकारी*
◆◇◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
      एक *जंगल*होते.त्या जंगलात एक *हरीण*त्याच्या पिलासह राहत होते.इकडे तिकडे बागडणे, मजेत फिरणे असे छान दिवस चालले होते.
      अचानक एका दिवशी एक *शिकारी*बंदूक घेऊन त्या जंगलात आला.त्याला ते हरीण दिसले.शिकाऱ्याने हरिणावर नेम धरला.तेवढ्यात हरणाच्या पिल्लाचे लक्ष शिकाऱ्यावर गेले.तो हरणाच्या पुढे येऊन उभा राहिला.जणू तो शिकाऱ्याला सांगत होता की,"माझ्या आईला मारू नको,हवे तर मला मार."त्याच्या डोळ्यातले ते आईबद्दलचे प्रेम पाहून शिकारी गहिवरला.त्याने शिकार न करण्याचे ठरवले.
तो जंगलातून निघून गेला.
   *तात्पर्य*◆◆
   आईवर प्रेम करा,तुमचे भलेच होईल.
 
🌸🌸💐💐🌸🌸💐💐

No comments:

Post a Comment